सालुमरद थिम्माक्का

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सालुमरद थिम्माक्का

सालुमरद थिम्माक्का या कर्नाटक राज्यातील बेंगळूरूपासून ८० किमी अंतरावर असणाऱ्या हुलिकल या गावातील पर्यावरण संरक्षणासाठी कार्यरत व्यक्ती आहे. त्यांचे वय १०५ वर्षे असून अलीकडेच बी.बी.सी.ने जगातील १०० प्रभावी पर्यावरणवादी महिलांच्या यादीत समावेश केला आहे.[१] त्यांनी ८००० पेक्षा जास्त झाडे लावून त्यांचे उत्तम संगोपन केले आहे.या कामाबद्दल त्यांना राष्ट्रीय नागरी सन्मान (नॅशनल सिटीझन अवार्ड) देण्यात आला.

पार्श्वभूमी[संपादन]

थिम्माक्कांचा जन्म कर्नाटकच्या रामनगर जिल्ह्यातील मगाडी तालुक्यातील हुलिकल या गावात झाला. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्यांना शिक्षण घेता आले नाही. बालपणापासून मजुरी करावी लागली.

हुलिकल व कुडूर या गावांना जोडणाऱ्या राज्य महामार्ग क्र.९४ वरील वडाची झाडे

सल्लुमाराडा या कन्नड भाषेतील शब्दाचा अर्थ 'एका रांगेतील झाडे' असा होतो. ते रहात असलेल्या खेड्यात वडाची रोपे पुष्कळ होती. ती रोपटी काढून त्याचे महामार्गालगत प्रत्यारोपण करण्याचे काम त्यांनी केले.ते दांपत्य रोज पाण्याच्या चार डबक्या घेऊन निघायचे व त्या झाडांना पाणी द्यायचे.झाडे मोठी झाल्यावर ती जनावरांनी खाऊ नयेत म्हणून त्याभोवती काट्यांचे कुंपणही त्यांनी तयार केले.रोपणानंतरच्या दुसऱ्या पावसाळ्यानंतर ती झाडे मुळं धरून जोमाने वाढत असत.दर वर्षी दहा ते वीस इतकी झाडे लावण्याचे व त्यांना जगविण्याचे काम त्यांनी केले.त्यांनी लावलेल्या झाडांची किंमत सुमारे १५ लाख भरली.

कार्य[संपादन]

त्यांचे पती बेकल चिक्कय्या यांच्यासोबत त्यांनी झाडे लावण्याचा ध्यास घेतला. हुलिकल व कुडूर या गावांना जोडणाऱ्या राज्य महामार्ग क्र.९४ वरील सलग ४ किमी अंतरात ३८४ वडाची झाडे त्यांनी वाढविली आहेत. पतीच्या निधनानंतरही त्यांचे काम सतत चालू आहे.कर्नाटक राज्य सरकारने त्यांच्या कामांची दखल घेत ही सर्व झाडे जगविण्याचे काम आपल्याकडे घेतले आहे.

दखल[संपादन]

त्यांच्या या कामाची दखल लॉस एंजेलिस ऑकलंडकॅलिफोर्निया या संस्थांनी घेतली आहे. त्यांच्या नावाने ओळखला जाणारा प्रयोग तेथील विद्यार्थ्यांना शिकविला जात आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविले जात आहे.

पुरस्कार[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ https://thelogicalindian.com/story-feed/get-inspired/saalumarada-thimmakka/