सारा अबोबकर
सारा अबोबकर | |
---|---|
जन्म |
३० जून, १९३६ कासारगोड, दक्षिण कॅनरा, मद्रास प्रेसिडेन्सी, ब्रिटिश भारत (आता केरळ, भारत) |
मृत्यू |
१० जानेवारी, २०२३ (वय ८६) मंगळूर, कर्नाटक, भारत |
भाषा | कन्नड |
साहित्य प्रकार | लेखक आणि अनुवादक |
वडील | पुडियापुरी अहमद |
आई | झैनाबी अहमद |
सारा अबोबकर (कन्नड: ಸಾರಾ ಅಬೂಬಕ್ಕರ್; ३० जून १९३६ - १० जानेवारी २०२३)[१] ह्या कादंबरी आणि लघुकथांचे भारतीय कन्नड लेखिका[२] आणि अनुवादक होत्या.[३]
प्रारंभिक जीवन आणि शिक्षण
[संपादन]सारा यांचा जन्म केरळमधील कासारगोड येथे ३० जून १९३६ रोजी झाला.[२] त्यांचे पालक पुडियापुरी अहमद आणि झैनाबी अहमद होते. त्यांना चार भाऊ होते.[४] त्या कासारगोड येथील मुस्लिम कुटुंबातील तिच्या समाजातील पहिल्या मुलींपैकी एक होती ज्यांनी स्थानिक कन्नड शाळेतून पदवी प्राप्त केली होती. त्यांचे शाळेनंतर लग्न झाले होते आणि त्यांना चार मुलगे झाले. साराने एकदा सांगितले की त्यांची अजून शिक्षण घेण्याची इच्छा मुस्लिम समाजाच्या नियमांमुळे पुर्ण झाली नाही. मुस्लिम समाजाच्या नियमांनुसार महिलांना उच्च शिक्षण घेणे प्रतिबंधित आहे. या नियमांमुळे त्या केवळ १९६३ मध्ये लायब्ररी सदस्यत्व मिळवू शकल्या.[४]
कारकिर्द
[संपादन]लेखक म्हणून
[संपादन]लेखन शैली आणि थीम
[संपादन]सारा अबोबकरांची पुस्तके मुख्यत्वे केरळ आणि कर्नाटक या भारतीय राज्यांच्या सीमेला लागून असलेल्या कासारगोड प्रदेशात राहणाऱ्या मुस्लिम महिलांच्या जीवनावर केंद्रित आहेत. त्या मुस्लिम समाजातील समानता आणि अन्यायाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करते. मुस्लिम धर्माच्या आणि कौटुंबिक गटांमधील पितृसत्ताक प्रणालींवर टीका करतात.[२][५] त्यांची लेखनशैली थेट आणि सोपी आहे. त्यांनी असे म्हणले आहे की त्या साहित्याकडे वास्तववादी दृष्टीकोनाने बघणे पसंत करतात. शैलीत्मक अलंकारांपेक्षा सामाजिक चिंता व्यक्त करण्यास प्राधान्य देतात.[५] त्यांच्या पुस्तकांमध्ये वैवाहिक बलात्कार, सांप्रदायिक आणि मुस्लिम समाजातील धार्मिक हिंसाचार आणि वैयक्तिक स्वायत्तता यासारख्या गुंतागुंतीच्या विषयांवर चर्चा केलेली आहे.
प्रकाशित कामे आणि रुपांतरे
[संपादन]१९८१ मध्ये, सारा अबोबकर यांनी त्यांचा पहिला लेख, लंकेश पत्रिका या स्थानिक मासिक कन्नड भाषेतील मासिकात, सांप्रदायिक सलोख्यावरील संपादकीय प्रकाशित केला होता.[४] यानंतर त्यांनी कथा आणि कादंबऱ्या लिहिण्यास सुरुवात केली. त्यांच्या स्वतःच्या मुस्लिम समुदायावर, बेअरी लोकांवर, कर्नाटक आणि केरळ या भारतातील काही भागांमध्ये राहणारा मुस्लिम समुदाय यावर लक्ष केंद्रित केले.
सारा अबोबकर यांची पहिली कादंबरी चंद्रगिरीया थेराडल्ली (१९८१) साठी प्रसिद्ध आहेत. ज्याचे नंतर वनमाला विश्वनाथा यांनी ब्रेकिंग टाईज[३][५] नावाने इंग्रजी भाषांतर केले. १९९१ मध्ये शिवरामा पडिक्कल यांनी मराठीत केले. ही कादंबरी सुरुवातीला लंकेश पत्रिका या स्थानिक मासिकात क्रमिक स्वरूपात प्रकाशित झाली आणि नंतर ती कादंबरी म्हणून पुन्हा प्रकाशित झाली.[५] ही कादंबरी नादिरा या तरुण मुस्लिम महिलेच्या जीवनावर केंद्रित आहे. जी प्रथम तिच्या वडिलांपासून आणि नंतर तिच्या पतीपासून स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न करते.[५] २०१६ मध्ये रूपा कोटेश्वर यांनी लिहिलेल्या स्क्रिप्टसह चंद्रगिरीया थेराडल्ली हे थिएटरसाठी रूपांतरित केले गेले आहे.[६] २०१९ मध्ये बायरी चित्रपटाच्या निर्मात्यांविरुद्ध कॉपीराइट उल्लंघनासाठी दाखल केलेल्या दाव्यात एका जिल्हा न्यायालयाने सारा अबोबकरच्या बाजूने निर्णय दिला.[७] या चित्रपटाला २०११ मध्ये ५९ व्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्वर्ण कमल पुरस्कार मिळाला होता. जिल्हा न्यायालयाला असे आढळून आले की ते मुख्यतः अबोबकर यांच्या चंद्रगिरीया थेराडल्ली या पुस्तकावर आधारित आहे आणि निर्मात्यांनी त्यांच्या चित्रपटासाठी पुस्तक रूपांतरित करण्यासाठी तिची परवानगी घेतली नव्हती.[८]
त्यांची कादंबरी, व्रजगालू (१९८८) सध्या देवेंद्र रेड्डी निर्मित, सारवज्रा नावाचा चित्रपट बनत आहे. [९] या चित्रपटात अभिनेत्री अनु प्रभाकर मुखर्जी नायक, नफिसा या भूमिकेत आहे आणि ती कासरगोडमधील मुस्लिम समाजात लग्न आणि घटस्फोट घेत असताना तिचे बालपण ते वृद्धापकाळापर्यंतचे जीवन रेखाटले आहे. यात मुस्लिम समाजात असणाऱ्या स्त्रिया आणि मुलींवर होणाऱ्या भदभावावर प्रकाश टाकतो. [९]
१९९४ पासून, सारा अबोबकर त्यांच्या स्वतः च्या प्रकाशन कंपनी, चंद्रगिरी प्रकाशन अंतर्गत त्यांची कामे प्रकाशित करत आहेत.[१०]
अनुवादक म्हणून
[संपादन]सारा अबोबकर यांनी टीव्ही इचारा वॉरियर, कमला दास आणि बीएम सुहारा यांच्या कन्नड पुस्तकांमध्ये अनुवादित केले आहे.[३]
पुरस्कार आणि सन्मान
[संपादन]सारा अबोबकर यांना त्यांच्या साहित्यातील योगदानाबद्दल अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
- १९८४ मध्ये कर्नाटक साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.[२]
- १९८७ मध्ये अनुपमा निरजन पुरस्कार मिळाला.[२]
- १९९० ते १९९४ पर्यंत, त्यांनी स्थानिक लेखकांच्या संघटनेच्या, करवली लेखकियारा मट्टू वाचकियारा संघाच्या अध्यक्षा म्हणून काम केले.[४]
- १९९५ मध्ये कन्नड राज्योत्सव पुरस्कार मिळाला.[४]
- १९९६ मध्ये रथनम्मा हेगडे महिला साहित्य पुरस्कार मिळाला.[२]
- २००१ मध्ये कर्नाटक सरकारचा दाना चिंतामणी अतिमब्बे पुरस्कार
- २००६ मध्ये साहित्यातील योगदानाबद्दल हंपी विद्यापीठाचा नाडोजा पुरस्कार मिळाला.
- २००८ मध्ये मंगळूर विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली.[४]
साहित्यिक कामे
[संपादन]कादंबऱ्या
[संपादन]- १९८१ - चंद्रगिरी तेरादल्ली (बेंगळुरू: पत्रिके प्रकाशन, १९८१. याचे इंग्रजीत भाषांतर वनमाला विश्वनाथ यांनी ब्रेकिंग टाईज (१९८२) म्हणून केले आहे[५]
- १९८५ - सहाना (बेंगळुरू: चंद्रगिरी प्रकाशन)
- १९८८ - वज्रगालू (बेंगळुरू: नवकर्नाटक प्रकाशन)
- १९९१ - कदाना विरामा
- १९९४ - सुलियाल्ली सिक्कावरू (बेंगळुरू: चंद्रगिरी प्रकाशन, २०१३)
- १९९७ - ताला ओडेडा डोनियाली (कन्नड आणि संस्कृती संचालनालय)
- २००४ - पांजरा
लघुकथा संग्रह
[संपादन]- १९८९ - चप्पलीगालू (बेंगळुरू: चंद्रगिरी प्रकाशन)
- १९९२ - पायना
- १९९६ - अर्ध रात्रिअल्ली हुट्टीदा कुसू
- १९९९ - खेडाह
- २००४ - सुमय्या
- २००७ - गगनसखी
भाषांतर (मल्याळम ते कन्नड)
[संपादन]- १९९२ - कमला दास यांची मनोमी
- १९९८ - बीएम सोहरा द्वारे बाले
- २००० - पीके बालकृष्णन यांचे नानिन्नू निद्रिसुवे
- २००९ - आरबी श्रीकुमार यांचे धर्मदा हेसरीनल्ली
नॉन-फिक्शन
[संपादन]- २०१० - होट्टू कंथुवा मुन्ना (आत्मचरित्र)
संदर्भ
[संपादन]- ^ Kannada writer Sara Aboobacker passes away
- ^ a b c d e f "Sara Aboobacker, 1936-". Library of Congress. 29 April 2016 रोजी पाहिले."Sara Aboobacker, 1936-". Library of Congress. Retrieved 29 April 2016.
- ^ a b c Raghaviah, Maleeha (1 August 2007). "A votary of women's cause". The Hindu. 29 April 2016 रोजी पाहिले.Raghaviah, Maleeha (1 August 2007). "A votary of women's cause". The Hindu. Retrieved 29 April 2016.
- ^ a b c d e f Sahitya Akademi (2011). "Sara Aboobacker - Meet the Author" (PDF). Sahitya Akademi.Sahitya Akademi (2011). "Sara Aboobacker - Meet the Author" (PDF). Sahitya Akademi.
{{cite web}}
: CS1 maint: url-status (link) - ^ a b c d e f Kurian, Anna (5 October 2006). Texts And Their Worlds - I Literature Of India An Introduction (इंग्रजी भाषेत). Foundation Books. p. 236. ISBN 978-81-7596-300-9.Kurian, Anna (5 October 2006). Texts And Their Worlds - I Literature Of India An Introduction. Foundation Books. p. 236. ISBN 978-81-7596-300-9.
- ^ Karnoor, Maithreyi (16 June 2016). "By the banks of Chandragiri". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 27 June 2020 रोजी पाहिले.
- ^ "Writer Sarah Aboobacker wins plagiarism case against makers of 2011 National Award-winning film 'Byari'". The Economic Times. 2 July 2019. 26 June 2020 रोजी पाहिले.
- ^ "Infringement case: Court bans screening of 'Byari' film". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 1 July 2019. 26 June 2020 रोजी पाहिले.
- ^ a b "It was challenging to switch to different moods and age groups, says Anu Prabhakar Mukherjee". The New Indian Express. 26 June 2020 रोजी पाहिले.
- ^ "Sarah Aboobacker". The Hindu (इंग्रजी भाषेत). 26 January 2013. ISSN 0971-751X. 26 June 2020 रोजी पाहिले.
- CS1 maint: url-status
- इ.स. १९३६ मधील जन्म
- इ.स. २०२३ मधील मृत्यू
- २१व्या शतकातील भारतीय लघुकथा लेखक
- २१व्या शतकातील भारतीय लेखिका
- भारतीय महिला अनुवादक
- २०व्या शतकातील भारतीय लघुकथा लेखक
- २०व्या शतकातील भारतीय लेखिका
- २०व्या शतकातील भारतीय अनुवादक
- २०व्या शतकातील भारतीय कादंबरीकार
- भारतीय लघुकथा लेखिका
- भारतीय महिला कादंबरीकार
- कन्नड लेखक
- कासारगोड जिल्ह्यातील लोक
- केरळमधील कादंबरीकार
- केरळमधील लेखिका
- कन्नड भाषांतरकार
- २१व्या शतकातील भारतीय कादंबरीकार
- २१व्या शतकातील भारतीय अनुवादक
- २१व्या शतकातील भारतीय लघुकथा लेखिका
- मल्याळममधील अनुवादक