साचा चर्चा:कल्याण–भुसावळ रेल्वेमार्ग
या साच्यातील स्थानकांची नावे पडताळून पहावी.
अभय नातू (चर्चा) ०५:१७, ३० नोव्हेंबर २०१७ (IST)
सर्वच नावे पडताळून पाहता आली नाहीत, पण सकृत् दर्शनी यादीत दोन दोष दिसले. हे थान्सिट बहुधा ट्रान्झिट असावे, आणि माझ्या आठवणीप्रमाणे खर्डीच्या अगोदर कल्याणच्या दिशेला एक शहापूर नावाचे स्टेशन होते. भातसा धरणाला जाताना खर्डीऐवजी शहापूरला उतरूनही जाता यायचे. ही फक्त आठवण आहे, वेस्टर्नप्रमाणे सेन्ट्रल रेल्वेचेही लोकलचे टाईम टेबल घरी होते, पण शोधूनही सापडले नाही....ज (चर्चा) २३:१५, ३ डिसेंबर २०१७ (IST)
- धन्यवाद. अधिक शोध घेउन पाहतो.
- अभय नातू (चर्चा) ००:१३, ४ डिसेंबर २०१७ (IST)
@ज: तानशेत येथे थानशिट नावाचे रेल्वे स्थानक आहे. --अभय होतू (चर्चा) ०७:१४, ४ डिसेंबर २०१७ (IST) --- मी ते पाहिले. ते मुंबईपासून २१ आणि २२ क्रमांकांदरम्यान येते, त्याचा क्रमांक २१.१ असा दिला आहे. तेथे फक्त एक गाडी थांबते असे वाचले. .....ज (चर्चा) १८:२३, ४ डिसेंबर २०१७ (IST)
कल्याण - कसारा दरम्यान धावणाऱ्या सर्व लोकल येथे थांबतात. --अभय होतू (चर्चा) २२:२६, ४ डिसेंबर २०१७ (IST)