सरफराज अहमद (लेखक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सरफराज अहमद
जन्म ५ नोव्हेंबर, इ.स. १९८३
सोलापूर, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
भाषा मराठी, हिंदी, इंग्रजी

सरफराज अहमद महाराष्ट्रातील महत्त्वाचे इतिहास अभ्यासक आहेत. ते मध्ययुगीन इतिहासकार म्हणून प्रसिद्ध आहेत.[१] त्यांनी आत्तापर्यंत ५ पुस्तके लिहिली आहेत. तर काही पुस्तकाचे त्यांनी संपादन केलेले आहे. सफराज अहमद हे मराठीत लिहिणारे लेखक आहेत.[२] मराठीशिवाय ते हिंदी, उर्दू आणि इंग्रजीतही लेखन करतात.

सरफराज अहमद बहुचर्चित हैदर अली टिपू सुलतान स्थापित सल्तननत ए खुदादाद या पुस्तकाचे लेखक आहेत. आत्तापर्यत या पुस्तकाचे पाच आवृत्त्या प्रकाशित झालेले आहे. २०१८ साली पुण्यातील डायमंड प्रकाशनाने याची बहुचर्चित पाचवी आवृत्ती प्रकाशित केली आहे.[३] मध्ययुगीन मुस्लिम विद्वान हे त्यांचे अलीकडे प्रकाशित झालेले महत्त्वाचे पुस्तक आहे. ते मुक्तशब्द, परिवर्तनाचा वाटसरू, साप्ताहिक शोधन, सत्याग्रही विचारधारा, नजरिया, अक्षरनामा[४] इत्यादी सामिक व वेबपोर्टलवर नियमित लेखन करतात. मध्ययुगीन इतिहासाचे वस्तुनिष्ठ लेखन व्हावे व इतिहास अभ्यासाला चालना मिळावी यासाठी त्यांनी सोलापूरला ॲड. गाजियोद्दीन रिसर्च सेंटरची स्थापना केली आहे. स्थापनेपासून ते संस्थेत सदस्य म्हणून कार्यरत आहेत.[५]


प्रकाशित पुस्तके[संपादन]

  • इतिहासाशी इमान आहे कुठे? (२०१३)
  • भारतीय इतिहासलेखन विपर्यास (२०१४)
  • मुसलमान राज्यकर्त्यांचा इतिहास (२०१४)
  • सल्तनत-ए-खुदादाद (टिपू सुलतान याच्या जीवनावर आणि कारकिर्दीवर संशोधनपूर्वक लिहिलेला ग्रंथ). (२०१५)
  • मध्ययुगीन मुस्लिम विद्वान (२०१८)
  • सामाजिक समतेचा प्रवाह (२०१९) [६]
  1. ^ TwoCircles.net. "How a research centre in Solapur is trying to remind Indians of their common, secular history – TwoCircles.net" (इंग्रजी भाषेत). 2019-11-25 रोजी पाहिले.
  2. ^ "'मुस्लिमांनी वर्तमानासह इतिहासाचेही आकलन भक्कम करावे'". 2019-11-25 रोजी पाहिले.
  3. ^ "Samajik Samatecha Pravah : Prof. Fakrooddin Bennur Smrutigrantha: Buy Samajik Samatecha Pravah : Prof. Fakrooddin Bennur Smrutigrantha by Dr. Suryanarayanan Ransubhe, Prof. Fakrooddin Bennur at Low Price in India". Flipkart.com (इंग्रजी भाषेत). 2019-11-25 रोजी पाहिले.[permanent dead link]
  4. ^ "अयोध्येत राममंदिर पाडून बाबरी मसजिद बांधल्याचा उल्लेख मध्ययुगीन इतिहासाच्या साधनात कुठेच आढळत नाही!". www.aksharnama.com. 2019-11-25 रोजी पाहिले.
  5. ^ "इक्बालांचे चिंतन". 2019-11-25 रोजी पाहिले.
  6. ^ TV9 Marathi, [https://www.youtube.com/watch?v=dPcKSpmxwtc पà¥�णे | महाआघाडीचे चेहरा बहà¥�मतानं ठरेल : सà¥�शीलकà¥�मार शिंदे-TV9], 2019-01-22 रोजी पाहिले replacement character in |title= at position 6 (सहाय्य)