समाजस्वास्थ्य (नियतकालिक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
समाजस्वास्थ्य
प्रकार
विषय कामजीवन
भाषा मराठी
संपादक डॉ. प्रदीप पाटील
माजी संपादक र. धो. कर्वे
पत्रकार डॉ. विठ्ठल प्रभू
खप मर्यादित
पहिला अंक १५ जुलै १९२७
देश भारत

समाजस्वास्थ्य हे मराठी भाषेमधील नियतकालिक आहे.

इतिहास[संपादन]

संततीनियमनाचे उद्दिष्ट समोर ठेवून रघुनाथ धोंडो कर्वे यांनी १५ जुलै १९२७ रोजी या मासिकाची सुरुवात केली. समाजाच्या कट्टर विरोधाला तोंड देत या मासिकाने २७ वर्षे अखंड वाटचाल केली. लैंगिक संबंध, कामप्रेरणा, कुटुंबनियोजन असे नुसते शब्दसुद्धा चारचौघात उच्चारण्यास समाजमान्यता नव्हती त्या काळात रघुनाथ धोंडो कर्वे यांनी आपल्या 'समाजस्वास्थ्य' मासिकाद्वारे या विषयांची खुली चर्चा केली. कामव्यवहाराबाबत अज्ञानी असलेल्या समाजाचे स्वास्थ्य धोक्यात येते असे ठणकावून सांगत कामप्रेरणा, समागम, कुटुंबनियोजनाच्या पद्धती, प्रजनन, स्त्रियांचे विकार, स्त्रीपुरुष संबंध आणि समाजव्यवहार असे विषय त्यांनी धाडसीपणे हाताळले. तत्कालीन समाजाच्या कुचेष्टेचे आणि उपहासाचे धनी झालेल्या र. धों.च्या कार्यात त्यांच्या पत्नी मालतीबाई यांचीही साथ होती. र.धों.च्या निधनानंतर हे मासिक बंद पडले.[१]

पुनरुज्जीवन[संपादन]

४ ऑक्टोबर २००८ रोजी हे मासिक पुन्हा प्रकाशित व्हायला सुरुवात झाली आहे. सांगली येथील डॉ. प्रदीप पाटील (संपादक) हे या मासिकाचे संपादक आहेत. गोंधळलेल्या तरुण वर्गाला कामजीवनाविषयी योग्य मार्गदर्शन मिळत नाही. विवाहित-प्रश्नैढांनाही ज्ञान नाही, अशी आज कामजीवनाची दशा आहे. त्यासाठी महाराष्ट्रात स्वतंत्र व्यासपीठ उभे राहावे म्हणून समाजस्वास्थ्य ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे.[२]

डॉ. विठ्ठल प्रभू यांचा र.धों. कर्वे यांच्यावरील लेख, सेक्स आणि भारतीय समाज हा चित्रा पालेकर यांचा लेख ही पहिल्या अंकाची वैशिष्ट्ये आहेत.


संदर्भ[संपादन]

  1. ^ Google's cache of http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3585177.cms. It is a snapshot of the page as it appeared on 21 Nov 2009 09:25:33 GMT.
  2. ^ Google's cache of http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=14962:2009-10-10-15-44-42&Itemid=1. [मृत दुवा] It is a snapshot of the page as it appeared on 8 Jan 2010 02:54:13 GMT.