समतावादी साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


महाराष्ट्र समतावादी सांस्कृतिक चळवळ नावाची संस्था ही ’समतावादी साहित्य संमेलने’ भरवते.

 • २रे राज्यस्तरीय समतावादी साहित्य संमेलन कराड येथे २०/२१-डिसेंबर २०१० या काळात झाले. संमेलनाध्यक्ष लक्ष्मण माने होते.
 • ३रे राज्यस्तरीय समतावादी साहित्य संमेलन सांगली येथे ७ मे २०११ला झाले. संमेलनाध्यक्षा डॉ. गेल ऑमवेट होत्या.
 • ४थे राज्यस्तरीय समतावादी साहित्य संमेलन लातूर येथे २६ ते २८ नोव्हेंबर २०११ या काळात झाले. संमेलनाध्यक्ष ज्ञानेश महाराव होते.

विशेष : ही सर्व समतावादी नावाची संमेलने जातिजातींमधील द्वेष वाढवणारी आणि राजकीय स्वरूपाची असतात. या संमेलनांचा साहित्याशी बहुधा संबंध नसतो, हे या संमेलनांत जे ठराव पास होतात, त्यांवरून दिसून येईल.
उदा० कऱ्हाड येथे भरलेल्या दुसऱ्या समतावादी साहित्य संमेलनात पास झालेले ठराव :

 • सत्यशोधक अण्णा भाऊ साठे, यशवंतराव चव्हाण आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे.
 • संयुक्त महाराष्ट्रातील योगदानाचा विचार करून अमर शेख, आण्णा भाऊ साठे, गव्हाणकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा.
 • अण्णा भाऊ साठे यांचे वाटेगाव येथे व स्व. यशवंतराव चव्हाण यांचे जन्मगावी ढवळेश्र्वर येथे उचित स्मारक व्हावे.
 • दलित, आदिवासींवरील अत्याचार रोखण्यासाठी ॲट्रॉसिटी कायदा कडक करावा, सामूहिक अत्याचार करणाऱ्यांना मोक्का लावावा.
 • महिलांसाठीचे ३३ टक्के आरक्षणाचे विधेयक त्वरित मंजूर करावे.
 • स्त्रियांच्या शोषणासंदर्भातील कायदे अधिक कडक करावेत.
 • शेतमजुरांची मजुरी प्रतिदिन ५०० रुपये करण्यात यावी.
 • सर्व जातीधर्मातील विद्यार्थ्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत व सक्तीचे करावे.
 • महापुरुषांचे इतिहास चुकीचे लिहिले असून त्यांच्याबद्दल विकृत लिखाण केले आहे. त्यामुळे हे संमेलन छत्रपती शिवरायांचे दादोजी कोंडदेव आणि रामदास स्वामी हे गुरू नसल्याचाही ठराव संमत करत आहे.
 • याशिवाय अनेक चित्रपटात दलितांची अवहेलना करणारे वास्तव मांडले जाते. त्याच चित्रपटांना पुरस्कार दिला जात असल्याने सेन्सॉर बोर्डाच्या निषेधाचा ठरावही मंजूर करण्यात आला.

ज्या संमेलनात मनुस्मृतीची प्रत जाळण्यात आली, त्या सांगलीत भरलेल्या तिसऱ्या संमेलनात पास झालेले ठराव :

 • राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही दहशतवादी संघटना असल्याने तिच्यावर कायमची बंदी घालावी.
 • नथुराम गोडसे हा देशातील पहिला दहशतवादी आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतातील अलकायदा संघटना आहे, असेही ठराव मंजूर झाले.
 • विषमतावादी विचार जाळून जळत नाहीत. ‘मनुस्मृती’ला पराभूत करणारे साहित्य निर्माण होणे आवश्यक आहे. जातीचे वळवळणारे किडे ठेचण्याची गरज आहे, असे वक्तव्य राज्याचे गृहमंत्री रा.रा. पाटील यांनी या तिसऱ्या समतावादी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी केले.
 • संमेलनाध्यक्षांच्या भाषणाचा एकूण रोख ब्राह्मणांच्या विरोधात गरळ ओकणे असाच होता. ‘वेद, पुराणे इत्यादींचा विचारप्रवाह विषमतावादी ब्राह्मणी आहे. वारकरी संप्रदायाची चळवळ ब्राह्मणी फळीने दाबून टाकण्याचा प्रयत्न केला, असे अकलेचे तारेही त्यांनी तोडले !

या कोणत्याही ठरावाचा साहित्याशी संबंध नाही, हे वेगळे सांगायची गरज नाही.पहा : साहित्य संमेलने