ज्ञानेश महाराव
ज्ञानेश महाराव | |
---|---|
जन्म नाव | ज्ञानेश रामकृष्ण महाराव |
टोपणनाव | महाराव |
जन्म |
जून ११ , १९६० मुंबई, महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | संपादक, पत्रकार, लेखक, साहित्य, नाटककार, अभिनेता |
भाषा | मराठी |
वडील | रामकृष्ण महाराव |
ज्ञानेश महाराव हे मराठी साप्ताहिक "चित्रलेखा"चे संपादक आहेत. ते १९८५ सालापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ते १९८५ ते १९८९ सालापर्यंत "विवेक" या मराठी साप्ताहिकाचे सहाय्यक-संपादक होते. जून १९८९ पासून आजपर्यंत ते मराठी साप्ताहिक "चित्रलेखा"चे संपादक म्हणून काम बघत आहेत.[१] त्यांनी २० पेक्षा अधिक मराठी पुस्तके लिहिली आहेत. परखड लेखक, वक्ते - व्याख्याते अशीही त्यांची ओळख आहे. त्यांनी विविध विषयांवर सडेतोड लेखन केले आहे.
लातूर येथे २६ ते २८ नोव्हेंबर २०११ या काळात झालेल्या ४ थ्या राज्यस्तरीय समतावादी साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते.
अनुक्रमांक | पुस्तकाचे नाव | भाषा | प्रकाशन वर्ष | प्रकाशक | पुस्तकाचा आशय / विषय |
---|---|---|---|---|---|
१ | देव-धर्म-संस्कृती भक्तीच्या नावाने प.पुंच्या लीला | मराठी | सप्टेम्बर १९९८ | साकेत प्रकाशन मुंबई | गणपतीला दूधखुळा करणाचा चमत्कार करणाऱ्यासारख्या महाराजांच्या सोंगा ढोंगावर प्रहार करणाऱ्या लेखांचा संग्रह |
२ | उत्तरक्रिया | मराठी | जानेवारी २००० | पुष्प प्रकाशन मुंबई | सामाजिक राजकीय सांस्कृतिक साहित्यिक घडामोडींवर माहितीपूर्ण लेखांचा संग्रह |
३ | फक्त राष्ट्रभक्तांसाठी | मराठी | नोव्हेंबर २००० | पुष्प प्रकाशन मुंबई | राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घटना, दुर्घटना आणि समस्यांवरील मर्मभेदी लेखांचा संग्रह |
४ | अस्सल मऱ्हाठ्यांसाठी | मराठी | नोव्हेंबर २००० | जातीपातीचा अहंकार माजवणाऱ्या धर्मवाद्यांना गाडणाऱ्या आणि सामाजिक समतेच निशाण फडकवणाऱ्या मराठ्यांच्या महतीच जागरण करणारा लेखसंग्रह | |
५ | उठावा महाराष्ट्र देश | मराठी | नोव्हेंबर २००० | मराठी बाणा आणि महाराष्ट्रधर्म जगवणाऱ्या घणाघाती लेखांचा संग्रह | |
६ | उजळावी ज्ञानाची दिवाळी | मराठी | नोव्हेंबर २००० | पुष्प प्रकाशन मुंबई | तारुण्य, वृद्धावस्था, मृत्यू, ज्योतिष, अंधश्रद्धा, भाषा, धर्म, जातीयता आदी विषयांवरील विचारप्रेरक लेखांचा संग्रह |
७ | असं घडलं | मराठी | जानेवारी १९९६ | पुष्प प्रकाशन मुंबई | अयोध्याकांड, महाआरती, महापूर, महाभूकंप, बॉम्बस्पोटांची मालिका आदि अपूर्व घटनांचा माहितीपूर्ण थरारक लेखांचा संग्रह |
८ | हिंदू - हिंदुत्व - हिंदुस्तानी | मराठी | नोव्हेंबर २००० | लोकशाहीला तारक मारक विचारांचा समाचार घेणाऱ्या घणाघाती लेखांची पुस्तिका | |
९ | सामाजिक आणि राजकीय बदलांसाठी लोकशक्ती | मराठी | नोव्हेंबर २००० | नव्या राजकीय आणि सामाजिक बदलास हिंमत देणारा लेखसंग्रह | |
१० | भुता पेक्षा भट भारी | मराठी | २००५ | ||
११ | धर्मांचा विचार विचारांचा धर्म | मराठी | नोव्हेंबर २००२ | लोकशक्ती प्रकाशन मुंबई | जगभरच्या धर्मांतील जाणीव आणि उणीवा दाखवत लोकधर्माची आवश्यकता सांगणारी प्रेरणादायी चिकित्सा |
१२ | धरिले पंढरीचे चोर | मराठी | नोव्हेंबर २००० | बडवे आणि 'हभप' बुवांच्या पंढरपूर आणि आळंदी येथील बनवेगिरीचा समाचार घेणारा लेखसंग्रह | |
१३ | बहुजनांचे देव आणि त्यांचे दुश्मन | मराठी | नोव्हेंबर २००० | छत्रपती शिवराय, महात्मा फुले, महात्मा गांधी, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची नेमक्या शब्दात ओळख करून देणारी पुस्तिका | |
१४ | ठाकरे फमिली : लाईफ आणि स्टाईल [२] [३] | इंग्लिश / इंग्रजी | ऑगस्ट १९९५ | ||
१५ | प्रबोधनकारांचे ज्वलंत हिंदुत्व [४] [५] [६] | मराठी | नोव्हेंबर २००० | पुष्प प्रकाशन मुंबई | प्रबोधनकार ठाकरे यांच्या दुर्मिळ पुस्तकांचा आणि भाषणांचा दीर्घ प्रस्तावनेसह संपादित संग्रह |
१६ | गर्जे शिवरायांची तलवार | मराठी | मार्च २००४ | दर्पण प्रकाशन मुंबई | 'भांडारकर संस्थे'वरील हल्ल्याच्या आधी व नंतर उमटलेल्या क्रिया-प्रतिक्रियांचा घेतलेला घणाघाती समाचारांचा लेखसंग्रह |
१७ | लोकशक्तीची चिंता आणि चिंतन | मराठी |
अनुक्रम | वर्ष | नाटकाचे नाव | भाषा | भूमिका | नाटकाचा प्रकार | नाटकाचे लेखक |
---|---|---|---|---|---|---|
१. | ऑगस्ट २००६ | जिंकू या दाही दिशा [७] | मराठी | शाहीर, चीत्रवाला | संगीत नाटक | ज्ञानेश महाराव |
२. | डिसेंबर २००९ | संगीत घालीन लोटांगण [८] [९] [१०] | मराठी | चिलटे महाराज | संगीत नाटक | ज्ञानेश महाराव |
३. | ऑगस्ट २०१२ | संगीत सौभद्र [११] [१२] [१३] [१४] [१५] | मराठी | नारद | संगीत नाटक | बळवंत पांडुरंग किर्लोस्कर (अण्णासाहेब किर्लोस्कर) |
अनुक्रमांक | वर्ष | पुरस्काराचे नाव | पुरस्कार देणारी संस्था |
---|---|---|---|
१. | २००३ | कृषीवलकार प्रभाकर पाटील पुरस्कार - २००३ [१६] | अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद |
२. | २००५ | माधवराव बागल पुरस्कार – २००५ [१७] | राजर्षी छत्रपती शाहू स्मारक ट्रस्ट आणि भाई माधवराव बागल विद्यापीठ कोल्हापूर |
३. | २००८ | शिवनेरकार विश्वनाथराव वाबळे पत्रकारिता पुरस्कार २००८ | दैनिक शिवनेर |
४. | २००९ | वि. वा. शिरवाडकर उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मिती पुरस्कार - नाटक - (जिंकू या दाहीदिशा) [१८] | महाराष्ट्र सरकारचे मराठी साहित्य पुरस्कार २००८-०९ - नाटक [१९] |
५. | २००९ | 'आचार्य अत्रे स्मृती पुरस्कार' [२०] | मुंबई मराठी पत्रकार संघ [२१] [२२] |
६. | २०१० | नानासाहेब वैराळे स्मृती पुरस्कार [२३] | महाराष्ट्र संपादक परिषद |
७. | २०११ | चिंतामणराव देशमुख पत्रकारिता पुरस्कार २०११ | रोहा पत्रकार संघ |
८. | २०१२ | अत्रे प्रतिष्ठानचा पुरस्कार पत्रकारितेसाठी [२४] | आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान सासवड |
९. | २०१२ | विद्याधर गोखले ललितलेखन पुरस्कार - २०१२ [२५] | मुंबई मराठी पत्रकार संघ |
१०. | २०१३ | "दीनमित्र मुकुंदराव पाटील पत्रकारिता पुरस्कार" [२६] [२७] | दीनमित्र-विचारपत्र |
नाटक - संगीत जिंकू या दाही दिशा
[संपादन]२००६ मध्ये ज्ञानेश महाराव ह्यांनी स्वतः लिहिलेले संगीत "जिंकू या दाही दिशा" हे महानायकांचे महानाटक मराठी रंगमंच्यावर उतरविले. त्यांचे हे पहिलेच नाट्य लेखन आहे. ह्या नाटकातून त्यांनी अस्सल कलावंताची सामाजिक जाणीव, राजकीय व सामाजिक वर्तमानाबद्दलचा तीव्र असंतोष प्रकट केला आहे. ह्या नाटकात त्यांनी इतिहासातील आदर्श व्यक्तिमत्त्वांची सध्या त्यांनाच बोलावून जणू त्यांची साक्षच घेतली आहे. त्यांच्या नावाने आज बाजार करणाऱ्यांना अशा व्यक्तींच्या खऱ्या कर्तुत्वाचा पुराव्यानिशी वर्तमानाचा अन्वयार्थ लावून नामोहरम केले आहे. छत्रपती शिवाजी, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तसेच सावित्रीबाई फुले व जिजाबाई ह्यांच्या सारख्या व्यक्ती आज जर हयात असत्या तर त्यांनी आजचे समाजकारण किंवा राजकारण कसे हाताळली असती हे या नाटकातून सर्वांना बघायला मिळते. हे नाटक सादर करतांना त्यांनी पोवाडे, शाहिरी कवनं, लावणी या सारख्या पारंपारिक लोककलाकृतींचा उपयोग करत एकूण चरित्र कथनाचा उद्देश आणि मथितार्थ रोमहर्षक व तडफदारपणे मांडून मनोरंजनातून समाज प्रबोधनच केले आहे.
नाटक - संगीत घालीन लोटांगण
[संपादन]"संगीत घालीन लोटांगण" [२८] हे त्यांनी लिहिलेले दुसरे नाटक. या नाटकात बुवाबाजीचा दंभस्फोट करून, आजचे भोंदुबाबा, त्यांचे स्वार्थी शिष्यगण, भोळे भाविक, राजकारणी आदींची उत्कृष्ट चित्रण करून भोंदुगिरी व अंधविश्वासावर नाटकात सडकून टीका करण्यात आली आहे. एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाला हे नाटक हात घालतं व सर्वसामान्यांना भोंदूगिरीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत. केवळ सस्तं मनोरंजन न करता मनोरंजनाच्या अवगुंठनातून लोकांना शहाणं करण्याचा प्रयत्न करतं. हे नाटक ६०-७० च्या दशकातील कलापथकाच्या नाटकप्रकाराप्रमाणे मुक्तनाट्यात रंजनाबरोबर प्रबोधनाचा जनजागरणाचा प्रयत्न करतांना दिसत. झी गौरव पुरस्कार २०१० च्या नामांकनात व्यावसायिक नाटक विभागातील "उत्कृष्ठ पार्श्वसंगीत" साठी चंद्रकांत कोळी व सुभाष खराटे ह्यांचे "संगीत घालीन लोटांगण" साठी नामांकन झाले होते.[२९]
बाह्य दुवे
[संपादन]- मराठी साप्ताहिक "चित्रलेखा"
- मराठी साप्ताहिक "विवेक" Archived 2013-04-08 at the Wayback Machine.
- मुंबई मराठी पत्रकार संघ Archived 2013-03-14 at the Wayback Machine.
संदर्भ यादी व नोंदी
[संपादन]- ^ http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=145774 [मृत दुवा]
- ^ "संग्रहित प्रत". 2014-01-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-04-22 रोजी पाहिले.
- ^ http://www.dnaindia.com/mumbai/report_despite-split-uncle-loved-raj-thackeray_1765969
- ^ "संग्रहित प्रत". 2014-01-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-04-22 रोजी पाहिले.
- ^ "संग्रहित प्रत". 2013-06-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-04-22 रोजी पाहिले.
- ^ http://www.delhipubliclibrary.in/cgi-bin/koha/opac-MARCdetail.pl?biblionumber=67290
- ^ http://www.mumbaitheatreguide.com/dramas/reviews/jinkuya_dahahidisha.asp
- ^ "संग्रहित प्रत". 2014-01-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-04-22 रोजी पाहिले.
- ^ http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=254234:2012-10-06-16-35-54&catid=364:2011-08-26-09-11-11&Itemid=368 [मृत दुवा]
- ^ "संग्रहित प्रत". 2016-03-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-04-28 रोजी पाहिले.
- ^ "संग्रहित प्रत". 2014-01-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-04-22 रोजी पाहिले.
- ^ "संग्रहित प्रत". 2017-11-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-04-22 रोजी पाहिले.
- ^ http://prahaar.in/mahamumbai/1458 Archived 2013-03-10 at the Wayback Machine. या दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती (संदर्भित दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
- ^ "संग्रहित प्रत". 2013-07-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-04-22 रोजी पाहिले.
- ^ http://marathiactors.blogspot.in/2012/09/sangeet-soubhadra-marathi-play-cast.html
- ^ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=117420 Archived 2013-06-29 at Archive.is विदागारातील आवृत्ती (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
- ^ "संग्रहित प्रत". 2014-01-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-04-22 रोजी पाहिले.
- ^ "संग्रहित प्रत". 2012-06-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-04-22 रोजी पाहिले.
- ^ http://www.manogat.com/node/18439
- ^ "संग्रहित प्रत". 2014-01-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-04-22 रोजी पाहिले.
- ^ "संग्रहित प्रत". 2014-01-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-04-22 रोजी पाहिले.
- ^ "संग्रहित प्रत". 2014-01-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-04-22 रोजी पाहिले.
- ^ "संग्रहित प्रत". 2014-01-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-04-22 रोजी पाहिले.
- ^ "संग्रहित प्रत". 2014-01-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-04-22 रोजी पाहिले.
- ^ "संग्रहित प्रत". 2014-01-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-04-22 रोजी पाहिले.
- ^ "संग्रहित प्रत". 2016-03-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-04-22 रोजी पाहिले.
- ^ http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/2013-01-12/main/DetailedNews-All.php?nid=AhmedNagarEdition-12-1-12-01-2013-0aaf2&ndate=2013-01-12&editionname=ahmednagar[permanent dead link]]
- ^ "संग्रहित प्रत". 2016-03-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-04-28 रोजी पाहिले.
- ^ http://marathimaya.in/menu_karamanuk/june2010_lekh24.html[permanent dead link]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |