Jump to content

सबव्हर्सिव्ह साईट्स (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सबव्हर्जिव साइट्स: फेमिनिस्ट एंगेजमेंट्स विथ लॉ इन इंडिया[] हे रत्ना कपूर व ब्रेंडा कॉस्मन यांचे पुस्तक आहे. १९९६ मध्ये सेज प्रकाशनाने हे पुस्तक प्रसिद्ध केले..

महत्त्वाचे मुद्दे

[संपादन]

सामाजिक बदलासाठीच्या भारतीय स्त्री-संघर्षामध्ये कायद्याच्या मर्यादा कोणत्या व शक्यता किती याची या पुस्तकाने स्त्रीवादी परिपेक्ष्यातून चिकित्सा केली आहे. स्त्रीवादी संघर्षाकरिता कायद्याचे क्षेत्र हे उपयुक्त व सामाजिक बदलासाठीचे क्रांतिकारी असेल तर, कायद्याला सातत्याने प्रश्न विचारणे व कायद्याचे पुनर्निरीक्षण होणे गरजेचे आहे, असे या पुस्तकामध्ये लेखिका मांडतात..

योगदान

[संपादन]

राजेश्वरी सुंदरराजन, ॲनिया लुम्बा आणि तनिका सरकार यांसारख्या मोठ्या स्त्रीवाद्यांनी या पुस्तकाची मोलाच्या स्त्रीवादी पुस्तकांमध्ये गणना केली आहे.

संदर्भ सूची

[संपादन]