सदस्य चर्चा:Vikramg7969

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सामाजिक परिवर्तनाचे प्रकार सामाजिक परिवर्तनाचे अध्ययन करीत असताना परिवर्तन ही तटस्थ संज्ञा आहे हे लक्षात घ्यावे लागते. कारण यावरून आपणास परिवर्तनाची दिशा, सातत्य किंवा अन्य परिवर्तन नियमासंबंधी माहिती प्राप्त होत नाही. म्हणून अभ्यासकांनी तीन सामाजिक प्रतिमानांचा उल्लेख केलेला आहे. या प्रतिमानाच्या मदतीने बदलाच्या दिशेने बोध होतो. मात्र, परिवर्तनाची गती आणि सातत्याविषयी निश्चितपणे सांगता येत नाही. येथे मॅकआयव्हर आणि पेज यांनी केलेल्या चर्चेप्रमाण्ेा प्रक्रिया उत्क्रांती प्रगती व अन्य संज्ञाचे विवरण अपेक्षित आहे.

प्रक्रिया:- समाजात निरंतर चालणारी क्रिया म्हणजे प्रक्रिया हाये. प्रक्रियेस समाजातील घटकात निरंतर परिवर्तन होत असते. यादृष्टीने सामाजिक परिवर्तनास प्रक्रिया मानले जाते. प्रक्रियेत घटकांचे सातत्य असते. प्रस्तुत बदल एका अवस्थेकडून दुस-या अवस्थेप्रत जाणारा असतो, मात्र या अवस्था उन्नत एकात्मिक विघटनात्मक, सहकार्य, संघर्षात्मक अशा कोणत्याही प्रकारच्या असू शकतात.प्रक्रियांची उदा. म्हणून स्पर्धा, संघर्ष, सहकार्य, एकात्मता व इतर प्रक्रियांच्या उल्लेख करण्यात येतो. सारांश, प्रक्रिया म्हणजे निरंतर बदल प्रक्रियेत एका अवस्थेपासून दुस-या अवस्थेकडे परिवर्तन अपेक्षित असते मात्र प्रक्रियेतील बदलाची दिशा सांगता येत नाही.

उत्क्रांतीः- सामाजिक परिवर्तन दर्शक संज्ञामध्ये उत्क्रंातीचा विचार करावा लागेल. डार्विन यांनी जैविक उत्क्रांतीचा सिंध्दात मांडला. डार्विनच्या चिंतनाने प्रभावित होवून समाज अभ्यासकांनी सामाजिक उत्का्रंती संबंधी आपली मते मांडली. उत्क्रांती म्हणजे मंदगतीने हाणारे परिवर्तन. दुस-या शब्दात उत्क्रांती ही अशी प्रक्रिया असते, की ज्यामध्ये त्या समाजातील सुप्त आंतरिक वैशिष्टयांचा हळू हळू विकास होतो. उत्क्रंातीविषयी स्पेन्सर म्हणतो मानवी समाज सजातियतेकडून विजातियतेकडे उत्क्रंात होत असतात. माॅर्गनने कुटूंबाची उत्क्रंाती स्वैराचार अवस्थेपासून एकविवाह कुटूंब अवस्थेप्रत झाल्याचे नमुद केले आहे. थोडक्यात उत्क्रांती या परिवर्तन प्रकारातून आपणास समाजातील मंदगतीने निरंतर आणि उन्नत दिशेकडे होणारे परिवर्तन लक्षात येते. अशा प्रकारच्या बदलास दीर्घकालावधीची गरज असते. या दीर्घकालावधीत समाजातील सर्व अंगोपांग प्रस्फुटीत होतात. उत्क्रंाती ही गुणात्मक परिवर्तन दर्शविते. वृध्दी संज्ञेने संख्यात्मक बदलास स्पष्ट केले जाते. लोकसंख्येतील किंवा उत्पन्नातील वस्तूच्या किमतीमधील बदल सुचविताना प्रामुख्याने वृध्दी आणि -हास संज्ञाचा उपयोग करण्यात येतो. जसे भारतातील लेाकसंख्येत 1921 पासून सातत्याने वृध्दी होत आहे. मृत्यूदरात मात्र -हास होत आहे. एकूण वृध्दी म्हणजे परिणामात्मक परिवर्तन वृध्दीस गणनात्मक पध्दतीने मोजता येते. गुणात्मक परिवर्तनास जाणून घ्यावे लागते.

क्रंाती:-

उत्का्रंती म्हणजे मंदगतीने दीर्घकालखंडात समाजाच्या सर्व अंगोपांगाना विकसित करणारे परिवर्तन, तर क्रांती म्हणजे आकस्मिक व अमुलाग्र स्वरूपाचा बदल होय. या बदलाचा कालखंड फारच मर्यादित लागतो. म्हणून क्रंाती अकस्मात घडते असे म्हणतात. एकप्रकारे क्रांतीचे स्वरूप उग्र असते. उदा. फे्रंच राज्यक्रंाती, रशियन क्रंाती ब-याचवेळा अशा क्रंातीमध्ये हिंसा घडलेली असते. क्रंातीच्या परिणामाविषयी निश्चित प्रकारचे अंदाज बांधता येत नाही. परिणामी दुरगामी असतीलच असे म्हणता येत नाही. राजकीय क्रंातीविषयी हे कथन संयुक्तिक असले तरी सामाजिक क्रंातीचे परिणाम मात्र अनिश्चित असतात. प्रगती प्रगती या संज्ञेसाठी उपयोगात आणल्या जाणरी प्रोग्रेस ही ंइंग्रजी ंसज्ञा लॅटीन शब्दापासून बनलेली आहे.प्रोग्रेस म्हणजे समाजस्विकृत ध्येयाच्या दिशेने गाठलेला पुढचा टप्पा होय. या ंसज्ञेने फक्त दिशेचाच बोध होत नाही, तर अंतिम ध्येयाच्या दिशेकडे टाकलेले पाउल असा अर्थ अभिप्रेत असतो.

   लुम्लेच्या मते: प्रगती म्हणजे परिवर्तन परंतू ते कोणत्याही दिशेकडे झालेले परिवर्तन नसते, तर परिवर्तनाची दिशा समाजस्विकृत असते. प्रगतीमुळे मानवी जीवनात विकास साध्य होतो. परिवर्तनातील कोणत्या टप्प्यावर समाज आहे हे कथन करता येते. प्रगती जाणिवपुर्वक केली जाते. एखादया क्षेत्रात नियोजनबध्द रितीने प्रयत्न करून प्रगती साध्य करण्यात येते. प्रगतीतून समाजाएखादया समाजातील प्रगतीचा वेध घेताना त्या समाजातील सांस्कृतिक मुल्या आधारभूत मानावी लागतात कारण संास्कृतिक मुल्यांनी ठरविलेले ध्येय प्रत्येक समाजात सारखे मानले जाईल असे म्हणता येत नाही. प्रगती मोजण्यासाठी काही गमके निष्चित करता येतात.ची उन्नती अपेक्षित असते. प्रगतीमध्ये बदलाची गती मंद असते तर कं्रातीत बदलाची गती तीव्र असते.
 एखादया समाजातील प्रगतीचा वेध घेताना त्या समाजातील सांस्कृतिक मुल्या आधारभूत मानावी लागतात कारण संास्कृतिक मुल्यांनी ठरविलेले ध्येय प्रत्येक समाजात सारखे मानले जाईल असे म्हणता येत नाही. प्रगती मोजण्यासाठी काही गमके निष्चित करता येतात.
	प्रगती या संज्ञेच्या विरोधी असणारी अधेागती ही संकल्पना देखील परिवर्तनदर्शक आहे. प्रगती म्हणजे पुढच्या दिशेकडे होणारा बदल तर अधोगती म्हणजे ध्येयाच्या विरूध्द दिशेने केलेली वाटचाल होय. एखादया व्यक्तीने समाजविचलित वर्तन केले तर त्या वर्तनास अधोगती म्हणतात. प्रमाणशुन्यता हे अधोगतीचे दुसरे उदाहरण आहे. अधोगतीमुळे समस्यांची तीव्रता वाढू लागते ते एक विघटनांचे चिन्ह असते.
   
   सामाजिक परिवर्तनाची कारणे

समाजिक परिवर्तनाच्या कारणंाची चर्चा करताना गिलिन आणि गिलिन यंानी भौगोलिक परिस्थिती, सांस्कृतिक घटक, लोकसंख्येची रचना किंवा विचारप्रणालीतील बदलातून सामाजिक परिवर्तन घडून येते असे म्हटले आहे. मॅक आयव्हर आणि पेज ने जैविक, तांत्रिक व सांस्कृतिक कारणाचा उल्लेखक केला आहे. आॅगबर्न याने तांत्रिक घटकास मध्यवर्ती मानले तर हॅरी जाॅन्सन परिवर्तनासाठी तीन प्रकारच्या कारणांना जबाबदार मानतो.

   	1) समाजव्यवस्थेतील कारणे

2) समाजव्यवस्थेशी संदर्भित असलेल्या सामाजिक वातावरणाचा परिणाम 3) गैरसामाजिक वातावरणाचा प्रभाव. या कारणापैंकी कोणत्याही एका घटकाचा दुस-या घटकावर परिणाम होतो आणि परिवर्तन घडताना दिसते.

   थोडक्यात समाजिक बदलासाठी अनेकविधी कारण उत्तरदायी असतात उदा. भौगोलिक कारक, सांस्कृतिक लोकसंख्या तांत्रीकीकारक विचारप्रणाली आर्थिक कारक शिक्षण वगैरे यापैकी काही कारणांची चर्चा येथे करावयाची आहे, मात्र यामुळे राहिलेले कारणे सर्वथैव गौण आहेत असे म्हणता येणार नाही.
   1) भौगोलिक घटक

हॅरी जाॅन्सनने वातावरणाचे दोन भाग केले आहे. सामाजिक वातावरण आणि गैरसामाजिक वातावरण. या गैरसामाजिक वातावरणात भौगोलिक घटकाचा समावेश होतो. वास्तविक पाहता मानवी समाज आणि भौगोलिक परिस्थितीचा एक अविभाज्य संबध आहे. कारण कोणताही मानव समाज एका भौगोलिक परिस्थितीमध्ये वसलेला असतो. म्हणून समाजाला बृहत प्रादेशिक समुह सुध्दा म्हणतात. या भौगोलिक वातावरणात तेथील भूमी, टेकडया, पर्वत, पाउस, नदया, तलाव, समुद्र, वूक्षवेली, प्राणी थंडी, उष्णता व अन्य घटकांचा अंतर्भाव होतो. हया घटकांनी मानवी जीवनाचे पुर्णपण्ेा निर्धारण होत असे.भौगोलिक निर्धारणवादी लेप्ले हॅंटिगटनच्या मते लोकांचे स्वभाव विषेश सुध्दा भौगोलिक वातावरणाने ठरतात. आर्थिक आणि धार्मिक जीवनाला आकार देणारे ते एक प्रमुख कारण मानले जाते. हे भौगोलिक वातावरण स्थायी नसते. त्यात सारखा बदल होत असतो. दुसरा म्हणजे बदलाची गती सारखीच नसते. भौगोलिक अंगातील बदलाच्या गतीचे दोन भाग करण्यात येतात. 1) ऋतुचक्राप्रमाण्ेा होणारा नित्य बदल 2) आणि आकस्मिक परिवर्तन. या परिवर्तनात बदलाची गती विलक्षण असते. त्याला भौगोलिक उत्पादसुध्दा म्हणतात. भौगोलिक उत्पातात ज्वालामुखी, भूकंप, वादळे, अवर्षण अतिवर्षण इ. संकटाचा निर्देष करण्यात येतो. या संकटाचे वातावरणावर परिणाम होतात. आणि दुसरे म्हणजे त्या भूभागावर वसलेल्या समाजात मनुष्यहानी व वित्तहानी होते,असंख्य प्राणी मृत्यूमुखी पडतात. अशा उत्पातांना दैवी संकटे म्हणून संबोधित करण्यात येत होते. आता मात्र आपण त्यांना सामाजिक समस्या मानतो आणि त्यांच्या निराकरणासाठी निश्चित उपाय योजना करण्याचे ठरवितो. नैसर्गिक आव्हानास प्रत्युत्तर देण्याच्या मानवी प्रयत्नातून नव्या यंत्रतंत्राचा विकास झाला आणि सामाजिक परिवर्तनाला चालना मिळाली.

  भौगोलिक वातावरणात मानवनिर्मित पध्दतीने बदल करण्याची प्रक्रिया सातत्याने चाललेली आहे. त्यात तलाव, धरणे, बांध ओलीताच्या सोयी रस्ते वृक्षांची लागवड यासमवेत आधुनिक शेतीची पध्दती, नवीन बी बियाणे, खंतंाचा वापर याचा अंतर्भाव होतो. या परिवर्तनामुळे त्या क्षेत्रातील ज्ञानात भर पडते व लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होते. त्यामुळे लोकांच्या जीवनपध्दतीत बदल होतो. तो समाज प्रगतीकडे वाटचाल करतो. याचा अमिट परिणाम होतो. तसेच भौगालिक वातावरणातील बदलातून सामाजिक परिवर्तनाचा प्रत्यय येतो. जेव्हा मानवी समुह एका भूभागाकडून दुस-या भुभागाकडे स्थलांतरित होतो,  तेव्हा नवीन भूभागाशी व तेथील समाजाशी अनुकुलन करीत असताना परिवर्तन होत असते.

2) जैविक घटक:- या जैविक घटकातील बदलासाठी दीर्घकालखंड लक्षात घ्यावा लागतो. या घटकात विशेषतः अनुवंशिकता वंश आणि लोकसंख्योचा विचार करण्ेा उपयुक्त होईल. अनुंवशिक गुणांचे वंशानुसंक्रमणांच्या नियमाप्रमाण्ेा पुढील पिढीकडे संक्रमण होते (मात - पित्याकडून मुलांकडे). या संक्रमण प्रक्रियेत काही गुणाचंे हनन होते. त्याचा परिणाम पुढील पिढीच्या शारीरीक गुणवैशिष्टयावर पडतो. मुले पुर्णतः माता पित्यासारखीच नसतात. त्यांच्या शारीरिक लक्षणात सुक्ष्म का होईना अंतर भासते. अनुवंशिकतेमुळे व्यक्तीची कार्यक्षमता प्रभावित होते. ज्यांची शारिरीक लक्षणे समान आहेत. अशा लोकसमुहाचा एक वंश बनतो. वंशातील अनेकता स्ववंःश्रेष्ठता आणि मानवी समाजाचे निर्धारण करण्याची व शासन चालविण्याची आमच्याच वंशात क्षमता आहे. इ. धोरणामुळै वंश द्वेश वांशिक तणाव, वंश संघर्ष निर्माण झालेला आढळतो. असे असले तरी वंश धारणा व परिवर्तनाचा संबंध दिसून येतो. 3) लोकसंख्या:- जैविक घटकात लोकसंख्येचा विचार केंद्रीय स्वरूपाचा आहे. लोकसंख्येत त्या समाजातील पुरूष, मुले आणि स्त्रियांचा समावेश होतो. लोकसंख्येतील वृध्दी किंवा -हास, जन्मदर मृत्यूदर लोकसंख्येचे, घनत्व, आर्युमान, आयुसंरचना स्थलांतरण इ. पैलूतील बदलाचा समाज संरचनेवर प्रभाव पडतो आणि सामाजिक परिवर्तन आपले लक्ष वेधते. लोकसंख्येतील वृध्दीमुळे शहरीकरण, गलिच्छ वस्त्या, प्रदुषण, बेकारी, गरीबी, कुपोश्षण इ. पश्न भारतीय समाजात निर्माण झाले. ते पश्न सोडविण्यासाठी संशोधनातून नवीन ज्ञानाची प्राप्ती, संस्था व संघटनाची निर्मिती झाली आहे. कुटूंब, विवाह, विवाहाचे वय, अपत्यांची संख्या व इतर पारंपरिक विचार बदलत आहेत. स्त्रियांचा दर्जा मुलांचे समाजीकरण प्रभावित झाले आहे. समाजातील स्त्री पुरूषांचे प्रमाण संतुलित असले पाहीजे. परंतू, हे संतुलन बिघडले म्हणजे स्त्री पुरूषांची संख्या कमी जास्त आणि बहुपत्नी विवाह अविवाहीतांचा पश्न कन्यामुल्य किंवा वरमुल्य पध्दती रूढ होवू लागते.

   लोकसंख्येतील सर्व लोकांची आयुगटाचे आधारे  विभागणी करण्यात येते. या आयुसरंचनेवरून लोकसंख्येचे स्वरूप स्पष्ट होते. काम करणारे अवलंबित असणारे मुल, वृध्द लक्षात येतात. आयुरचनेचा परिणाम आर्थिक क्षेत्र शैक्षणिक बाजू तसेच राजकीय बाजूसारख्या अन्य अंगावर पडतो. त्यातून सामाजिक परिवर्तन दिसून येते लोकसंख्येच्या दबावामुळे स्थलांतराची प्रक्रिया दिसून येते. अल्पसंख्याक बहुसंख्याक असे वर्गीकरण लोकसंख्येच्या विभागणीने ठरते.

सारंाश जैविक घटकात समाविष्ट असणा-या विविध पैलूंचे समाजावर दुरगामी परिणाम होतात आणि सामाजिक परिवर्तन लक्षात येते. 4) संास्कृतिक घटक:-संस्कृती आणि समाजात विभाजक रेषा काढणे कठीण आहे. संस्कृतीला समाजाचे अद्वितीय वैशिष्टये मानतात. संस्कृतीत भौतिक व अभौतिक अंगाचा अंतर्भाव होतो. समाजातील ज्ञान, विश्वास कला नितीतत्वे कायदा सवयी आणि मानवाने समाज सदस्य या नात्योन प्राप्त केलेल्या गोष्टी संस्कृतीत येतात. हया संास्कृतिक घटकात परिवर्तन झाले म्हणजे त्या परिणामातून सामाजिक बदल दिसून येतो सांस्कृतिक परिवर्तनातून सामाजिक परिवर्तन होते हे स्पष्ट व्हावे. कोणत्याही समाजातील संस्कृती स्थायी नसते. शोध व प्रसरण प्रक्रियेतून संस्कृतीत बदल होतो. एका समाजाच्या संपर्कात दुसरा समाज आला म्हणजे संस्कृती संक्रमण व संस्कृती प्रसरणाची प्रक्रिया कार्यान्वीत होते. अर्थात, यासाठी दोन्ही समाजाची तयारी आवश्यक असते. समजा एखादया समाजाने सांस्कृतिक गुणांचा स्वीकार केला नाही तर बदलाची प्रक्रिया घडणार नाही. लोकांच्या परंपरागत धारणा विश्वास मुल्ये भीती संशय वगैरे कारणामुळे विरोध होतो. अर्थात परिवर्तनाची वाढती आकांक्षा असलेल्या समाजात अडथळयांचे प्रमाण कमी असते किंवा अडथळयांवर मात केली जाते. मॅक आयव्हरचे मते तांत्रिक घटकात परिवर्तन झाले, म्हणजे लोकाचंे आचार विचार मुल्ये विश्वास संस्था संघटना प्रभावित होतात, कारण तांत्रिक घटकाच्या स्वीकारावर सांस्कृतिक घटकाचंा प्रभाव असतो. भारताने शांततेसाठी अणू ही भूमिका स्वीकारलेली आहे आणि अमेरिकेने नागासाकी व हिरोशिमावर अणुबाॅम्ब टाकून आपली विनाशाची भूमिका सिध्द केली आहे. तांत्रिक घटकाच्या प्रभावाने अमेरिकेत भांडवलशाहीचा उदय होणे व रशियात साम्यवादाचे प्रचलन होणे हे सांस्कृतिक घटकाचे फलित आहे. मॅक्स वेबरने केलेली चर्चा सांस्कृतिक घटकाकडून आर्थिक जीवन कसे प्रभावीत होते हे सांगणारी आहे. ज्ञानातीलबदल हे परिवर्तनाचे मुलभूत कारण आहे. विषमता अन्याय जन्मजात श्रेष्ठतवाएवजी समता समान न्याय कतृत्व महत्व इंहवादी धारणाची संस्कृती यासारख्या मुल्यात्मक बदलातून भारतीय आधुनिक समाजाची घडण होत आहे. थोडक्यात संास्कृतिक घटकातील बदलातून समाजात अनेक आंदोलने होतात. आणि परिवर्तनाची प्रक्रिया आपले लक्ष आकर्शित करते. 5) तांत्रिक घटक:- आधुनिक काळात सामाजिक परिवर्तनासाठी जबाबदार असलेल्या घटकात तांत्रिक घटकांचा अनुक्रमाने निर्देश करावा लागतो. तांत्रिक घटकामुळै उत्पादन व्यापार दळणवळणाच्या व इतर क्षेत्रात क्रांती झाली. नवीन तंत्र आणि यंत्राचे प्रचलन झाले. मॅक आयव्हर आणि पेजच्या मते तांत्रिक घटकामुळे झालेले परिवर्तन व्यापक स्वरूपाचे आहे. वाफेच्या शक्तीचा शोध लागल्यानंतर या शक्तीवर चालणारी यंत्रे विकसित झाली. आगगाडी सुरू होवून दळणवळणाच्या क्षेत्रात का्रंती झाली. नवीन तंत्र आणि यंत्राचे प्रचलन झाले. मॅक आयव्हर आणि पेजच्या मते तांत्रिक घटकामुळै झालेले परिवर्तन व्यापक स्वरूपाचे आहे. वाफेच्या शक्तीचा शोध लागल्यानंतर या शक्तीवर चालणारी यंत्रे विकसित झाली. आगगाडी सुरू होवून दळणवळणाच्या क्षेत्रात का्रंती झाली. समाजात गतिशिलता निर्माण झाली. व्यापार वाढला व शहरीकरणाची प्रक्रिया आरंभ झाली.