सदस्य चर्चा:Rajaram
![]() |
Rajaram, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
![]() |
Rajaram, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९९,२६५ लेख आहे व १५१ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती ![]()
दृश्य संपादक साधनपट्टीवरचे समाविष्ट करा आणि प्रश्नचिन्ह यांच्या मध्ये Ω चिन्ह आहे ते देवनागरी लिपी आणि इतर लिपींच्या वर्णमालांमधील युनिकोड अक्षर यादी उपलब्ध करून देते. संबंधीत साहाय्यपानाच्या अनुवादात mw:VisualEditor/Special characters येथे साहाय्य हवे आहे.
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
![]() |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() |
मराठी चित्रपटांचे लेख....
[संपादन]तुम्ही लिहिलेल्या लेखात साचा:माहितीचौकट चित्रपट हा साचा वापरून पहा. मला वाटते सुंदर दिसु शकेल. सचिन ०९:२६, १ ऑक्टोबर २०११ (UTC)
नमस्कार
[संपादन]आपला मराठी चित्रपटांतील संपादनांचा धडाका बघितला. आपले अभिनंदन. आपले असेच संपादन पुढेही सुरू राहो ही सदिच्छा.
- दुसरे असे की एकाच लेखात तुटक-तुटक संपादने करून ती जतन करण्यापेक्षा सलग एकच संपुर्ण संपादन करुन मग ते जतन करावे.यात विकिच्या विदागारावर ताण येत नाही कारण त्यात तितकी पाने बनण्याची प्रक्रिया थांबते. सत्रावसानामुळे जर अडचण येत असेल तर 'झलक पाहा' टॅब दाबून ते तात्पुरते जतन करता येऊ शकते.आपण या सूचनेचा जरूर विचार कराल अशी आशा करतो.आपल्या पुढील लिखाणास शुभेच्छा.
वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०९:५९, १ ऑक्टोबर २०११ (UTC)
मराठी चित्रपट
[संपादन]नमस्कार राजाराम साहेब, आपण चित्रपटावर काम करत आहात त्याबद्दल अभिनंदन. चित्रपटाच्या लेखाचे एक विशिष्ठ टप्पे किंवा स्वरूप लक्षात घेऊन लेख लिहिले तर बरे होईल. सध्या सचिन ने सांगितल्याप्रमाणे 'साचा' भरून लेख पूर्ण करावा. पाहिजे तर नंतर तोच साचा वाढवून किंवा नवा चांगला साचा बनवला तर बॉट ने replace करता येईल. सध्या मात्र अशी_ही_बनवाबनवी_(चित्रपट) आणि गंमत जंमत (चित्रपट) चा आधार घेऊन लेख पूर्ण करावेत असे वाटते. म्हणजे योग्य वर्ग सुरुवातीला भरले जातील....मंदार कुलकर्णी १२:२४, १ ऑक्टोबर २०११ (UTC)
- कृपया वर्ग:मराठी चित्रपट नामसूची आणि वर्ग:मराठी भाषेमधील चित्रपट हे दोन्ही वर्ग एकत्र करून एकच ठेवावा. दुसरा उडवून टाका. तसेच मी शिवाजीराजे भोसले बोलतोय (मराठी चित्रपट) आणि मी शिवाजीराजे भोसले बोलतोय (चित्रपट) के लेखही पुनर्निदेशीत करून एकत्र करा..... मंदार कुलकर्णी १ ऑक्टोबर २०११ (UTC)
अंगुलीनिर्देश
[संपादन]<<< ता. क. :- हजारो ग्रांप्री वरील कोरे लेख आहेत आणि बनतात हि आहेत त्याचे काय ? >>>
आपल्या नुकत्याच चावडीवर टाकलेल्या ताज्या कलमातील बनतात हा शब्द माझ्याकडे निर्देश करतो काय? कृपया कळवावे ही विनंती.
वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०८:५५, ९ ऑक्टोबर २०११ (UTC)
नमस्कार!
[संपादन]माझी सद्याच या गाडीत चढण्याची इच्छा नाही. 'कामे पडली अनंत, वेळ मात्र मर्यादित, म्हणुनी व्यर्थ गप्पात, कालक्षेप करु नये। हे माझे धोरण राहीले आहे व सध्या आहे.धन्यवाद.
वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०९:३८, ९ ऑक्टोबर २०११ (UTC)
नमस्कार
[संपादन]राजारामजी ! सादर नमस्कार.
यापुढे आपला चावडीवर अभय/संकल्प यांचेसोबत सुरू असलेला वाद तात्काळ थांबवावा अशी मी आपणास अत्यंत नम्रपणे, आदरपूर्वक व कळकळीची विनंती करतो. मला आशा आहे कि माझ्या या विनंतीस आपण मान द्याल.मला वाटत आहे कि ही हेल्दी सिच्युएशन नाही.येथे आपण काही विशिष्ट उद्देशाने एकत्र आलो आहोत.अशी वादावादी ही त्या उद्देशास मारकच ठरेल अशी मला खात्री आहे.आपणास माय मराठीची सेवा करायची आहे हा त्यातील अंतस्थ हेतू आहे व असणे अभिप्रेत आहे.मी आपल्यापेक्षा वयाने नक्कीच ज्येष्ठ आहे.तरीपण,आपले पाय धरल्याने जर आपण शांत होत असाल तर त्यासही मी तयार आहे.आता यापुढे आपली मर्जी.
वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १७:३३, १२ ऑक्टोबर २०११ (UTC)
युद्धबंदी
[संपादन]सध्या मी व्यस्त आहे. हाती घेतलेले काम पूर्ण करावयाचे आहे. काही वैयक्तिक व्यस्तता पण आहे. माझ्या मते आपण या विषयावर दिवाळीनंतर बोलु.तोपर्यंत जरा सबूरीने.
वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०९:४३, १४ ऑक्टोबर २०११ (UTC)
सूचना:
नमस्कार
[संपादन]आपला संदेश मिळाला.वाचुन आनंद झाला.अभय नातू माझ्या जवळचे नाहीत व आपणही नाही.त्यामुळे कोणाची एकाची बाजू घेण्याचा माझेसाठी प्रश्नच उद्भवत नाही.येथे कटकट होउ नये शांतता नांदावी यासाठी माझे प्रयत्न होते.मधे काही काळ गेला असता भांडणात जोर रहात नाही.विचार बदलु शकतात असे मला वाटत होते.येथे शांतता असणे आपणास/नातूस अभिप्रेत नसेल तर मग आपली जशी ईच्छा असेल तसे वागावे/भूमिका घ्यावी. मी कोण बापडा आपणास रोकणार? राहिला प्रश्न विश्वासाचा/विश्वासार्हतेचा. त्याची आपण काळजी करण्याची जरूर नाही.आपण वा कोणीही मला काय समजायचे ते समजा.आपण माझेबद्दल योग्य समज करून घेत असाल तर धन्यवाद गैरसमज करून घेत असाल, तर त्यास मी काय करणार? येथे ज्या कोणास माझेवर विश्वास टाकावयाचा असेल त्याने टाकावा,अन्यथा नाही.हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.त्याने माझ्या येथील कामात फरक पडणार नाही असे मला वाटते.असो.
माझ्यातर्फे हा विषय मी बंद केला आहे असे समजा.आपणास धन्यवाद देतो. ता.क.- म्हातारपण हे बाल्यावस्थेगतच असते असे कोणीतरी म्हणाल्याचे मला स्मरते.
दुसरे असे कि आपली प्रत्यक्ष भेट घेण्याची इच्छा आहे.बघु कसे काय जमते. लिहिण्यापेक्षा मला तोंडपाटिलकी बरी जमते. वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १४:०३, ३ नोव्हेंबर २०११ (UTC)
विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३
[संपादन]प्रिय विकिसदस्य,
स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.
ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.
कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.