सदस्य चर्चा:Nayana Sonie

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
   Help-browser.svg स्वागत Nayana Sonie, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
Nuvola apps ksig-vector.svg आवश्यक मार्गदर्शन Nayana Sonie, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ६८,५९१ लेख आहे व २४३ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :


दृश्यसंपादकाचे उपयूक्त कळफलक लघुपथ

(कि-बोर्ड शॉर्टकट्स) दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : प्रश्न चिन्हावरून कळफलक लघुपथ पूर्ण यादी (कि बोर्ड शॉर्टकट) अभ्यासता येते.

साचा {{
संदर्भ <ref
सारणी {|
कळफलक लघुपथ विस्तृत यादी Ctrl+/

दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : प्रश्न चिन्हावरून कळफलक लघुपथ पूर्ण यादी (कि बोर्ड शॉर्टकट) अभ्यासता येते.


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Flag of India.svg Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
Crystal Clear app ktip.svg नेहमीचे प्रश्न
Accessories-text-editor.svg सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
Policy - The Noun Project.svg धोरण
Crystal Clear app ksirtet.svg दालने
Nuvola apps bookcase.svg सहप्रकल्प

-- साहाय्य चमू (चर्चा) १६:२६, ३० जानेवारी २०१४ (IST)

विनंती आणि शुभेच्छा[संपादन]

नमस्कार आपण मराठी विकिपीडियावर लिहिलेला कानबाई हा लेख छान झाला आहे. अहिराणी भाषेतील जात्यावरल्या ओव्या हे लेख शीर्षक ज्ञानकोशीय परिघात बसू शकत पण त्यातील मजकुराची सध्याच्या स्थितीत अधिक सुधारणेची म्हणजे ज्ञानकोशीय परिच्छेद लेखनाची थोडी आवश्यकता आहे असे वाटते. ह्या संदर्भाने विकिपीडिया_चर्चा:उल्लेखनीयता#चर्चा:रूप पाहतां लोचनीं हि जुनी चर्चा अभ्यासल्यास जरासा अंदाजा येण्यास मदत होईल. इंटरनेटच्या माध्यमातून अहिराणी भाषेचा आणि संस्कृतीचा विवीधांगी परिचय करवून देण्यासाठी विकिपीडिया हे निश्चितपणे एक चांगले साधन सिद्ध होऊ शकते. आपण मराठी विकिपीडियावर लिहिलेल्या लेखनाचा दुवा मी अहिराणी भाषेतील तज्ञांनाही उपलब्ध करेन म्हणजे तेही यात शक्यती मदत करू शकतील तर पाहूयात.

अहिराणी भाषेतील जात्यावरल्या ओव्या मधील काही ओव्यातील संदर्भ नवे दिसतात तेव्हा त्यांच्या कॉपीराईट स्थिती बद्दलही खात्री करून घ्यावी हि नम्र विनंती.

आपल्या आवडीचे लेखन वाचन घडत राहो हि शुभेच्छा.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १०:२१, १४ फेब्रुवारी २०१४ (IST)

'कानबाई' आणि 'अहिराणी भाषेतील जात्यावरच्या ओव्या' या लेखांविषयी.[संपादन]

नमस्कार माहितगार!

माहितीबद्दल धन्यवाद! 'कानबाई' आणि 'अहिराणी भाषेतील जात्यावरच्या ओव्या' हे दोन्ही लेख पुर्णतः माझेच असुन माझ्या http://khandeshkanya.blogspot.in/ या ब्लॉगवर तसेच मायबोली वेबसाईटवर पुर्वी प्रकाशित झाले आहेत. आधी प्रकाशित झालेलं साहित्य चालत नाही का? तसं असेल तर मी ते लेख काढुन टाकण्यासाठी अ‍ॅडमिनला विनंती करेन. 'कानबाई' या लेखातला फोटो माझ्या घरचाच असुन त्यात लिहिलेली गाणीही आमच्या घरच्या कानबाईच्या वेळेस म्हटली गेली आहेत. 'अहिराणी भाषेतील जात्यावरच्या ओव्या' या लेखाच्या कॉपीराईटबद्द्ल तुम्हाला शंका असेल तर एक गोष्ट मी सांगु इच्छिते की त्या लेखातला मजकुर मी माझी आई, काकु, आणि आत्या यांच्याकडुन माहिती घेउन कंपाईल केला आहे. माझी आत्या आता हयात नाही. तर आई आणि काकु यांची लेखी परवानगी लागेल काय?

आधी प्रकाशित झालेलं साहित्य चालत नाही का? >> १) उलटपक्षी लेखन पुर्वप्रकाशितच असाव लागत पण सोबत काही अटींसोबत. २) समजा मी तुमच्या लेखावर बेतून विकिपीडियावर (अथवा इतरत्र कुठेही) माहिती लेखन करणार असेल तर ते मी कॉपीपेस्ट न करता माझ्या स्वत:च्या शब्दात केलं पाहीजे सोबत त्याच वेळी तुमच्या पुर्वप्रकाशित लेखाचा संदर्भही दिला पाहिजे.
३) समजा माहिती मजकुर तुम्ही स्वत:च विकिपीडियात आणत असाल तर कॉपीराईटच्या दृष्टीने पुर्नलेखनाची आवश्यकता नाही. पण तुम्ही इतरत्र टोपण नावाने मूळ लेखन केले असेल त्या टोपण नावाच्या आयडीतून त्याच संकेतस्थळावरून तुमचा स्वत:चा काही मजकुर/खासकरून काही छायाचित्रे विकिपीडियावर तुम्ही स्वत: चढवली प्रताधिकार मुक्त करत लावली आहेत हे स्प्ष्ट करणे अभिप्रेत असते. म्हणजे जसे की तुमच्या ब्लॉगवर आणि मायबोली संकेत स्थळावरील संबंधीत धाग्यावर.


४) ज्ञानकोशात आपण आपली माहिती ब्लॉगवरून आणण्या पेक्षा इतरांकडून समतोल समीक्षण/तपासले जाण्याची शक्यता असलेल्या मायबोली सारख्या संकेतस्थळावरून येणे अधिक प्रशस्त आणि विश्वासार्ह माहिती असलेले समजले जाते.
५) ज्ञानकोशात तुमच लेखन तुम्ही स्वत: आणत असाल तर कॉपीराईट करता पुर्नलेखनाची गरज नसते परंतु इथे लेखनात केवळ माहिती अधिक असावी लागते ललित आलंकारीक फुलोरा वगळावा लागतो. उदाहरणार्थ >>तुमचे कानबाई लेखातील सध्याचे वाक्य : >>विशेष म्हणजे या दिवशी चण्याच्या दाळीचाच स्वैपाकात जास्त वापर असतो. पुरण पोळी, खीर कटाची आमटी चण्याची दाळ घालुन, गंगाफळ/ लाल भोपळ्याची भाजी असा थाट असतो. >> या दिवशी चण्याच्या दाळीचाच स्वैपाकात वापर जास्त असतो. पुरण पोळी, खीर कटाची आमटी चण्याची दाळ घालुन, गंगाफळ/ लाल भोपळ्याची भाजी असा मेनू असतो.>> यातील लेखनास लक्षवेधी बनवण्याचा प्रयत्न करणारी विशेष म्हणजे थाट असतो ही अलंकारीकता वगळणे अभिप्रेत असते.
एव्हरेस्टची उंची अबकड आहे ही वस्तुस्थिती Fact आहे. निव्वळ फॅक्ट्सवर कॉपी राईट लागत नाही. कानबाईच्या सणात चण्याच्या दाळीचाच स्वैपाकात उपयोग अधिक असतो. सहसा पुरण पोळी, खीर कटाची आमटी चण्याची दाळ घालुन, गंगाफळ/ लाल भोपळ्याची भाजी असा मेनू असतो.
अस लेखन मी माझ्या शब्दात केल की मी हे लेखन कॉपीराईटच्या बाहेर आणल कारण निव्वळ फॅक्ट्स देत आणि माझ्या शब्दात लिहील. पण हे करताना मी तुमच्या मुळ लेखनाचा संदर्भ दिला नाहीतर पुरेस विश्वासार्ह समजल जात नाही.
एका अर्थाने विशेष म्हणजे थाट असतो ह्या अलंकारीकतेतून येणारी लेखन शैली तुमचा कॉपीराईट तयार होण्यास तुम्हाला साहाय्यभूत होत असते. ज्ञानकोशात आलंकारीकता तशीही टाळली जाते त्यामुळे मजकुराचे कॉपीराईट सहसा व्य्वस्थित ज्ञानकोशीय संपादन केल्यास बाजूला पडतात पण छायाचित्रात किंवा ओव्यांमध्ये अशी छाटणी करता येत नाही त्यामुळे त्याबाबतच्या कॉपीराईटच्या संदर्भाने अधिक काळजी घ्यावी लागते.


६) ओव्या तुमच्या आईने/काकुने/आत्याने किंवा आणखी कुणी स्वत: लिहिलेल्या असल्या तर ती त्यांची व्यक्तीगत प्रॉपर्टी झाली. त्यांच्या अथवा त्यांच्या पुढच्या पिढीच्या हयातीत लेखी परवानगी शिवाय पुर्नप्रकाशन कॉपीराईट कायद्याचा भंग ठरतो. लेखक लेखिकेच्या पश्चात ६० वर्षेपर्यंत हा कॉपी राईट चालू असतो.
अगदी आपल्या वाटणाऱ्या माणसांची भांडणे कॉपीराईटवरून कोर्टात गेल्याची उदाहरणे आहेत. आणि तुमचा उत्तर महाराष्ट्रतील लोक कॉपीराईटवरून कायदेशिर बाबी पुढे आणण्याची बऱ्या पैकी संस्कृती आहे तेव्हा लेखन स्वत: आत्यांचे असेल तर आत्याच्या मुलांकडून तुम्ही लेखी परवानगी घेणे तुमच्या स्वत:करीता आणि मराठी भाषेच्या दृष्टीने अधिक प्रशस्त असेल.


आपल्या आवडीचे लेखन वाचन घडत राहो ही शुभेच्छा.
Gnome-edit-redo.svgसंतोष दहिवळ: Gnome-edit-redo.svgKatyare: आपल्या संदर्भासाठी साद दिली.
धन्यवाद.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:५४, २६ फेब्रुवारी २०१४ (IST)

अहिराणी ओव्या आणि कानबाई लेखाविषयी[संपादन]

नमस्कार.

आपला मुद्दा कळला. माझी आई, आत्या, काकु यांनी हे लिखाण कुठेही वहीत लिहुन ठेवलेलं नाहीये. उलटपक्षी, आम्ही एका कार्यक्रमाकरता एकत्र आल्यावर मी मुद्दाम विषय काढुन ह्या विषयाबद्दल त्यांना बोलतं केलं आणि त्याही उत्साहाने याबद्दल सांगत असतांनाच मीच त्यांच्याजवळ बसुन आणि त्यांना सांगुन सवरुन हे उतरवुन घेतलं आहे. त्यांनाही हे साहित्य कुठेतरी संग्रहीत होतं आहे आणि नविन पिढी यात आवड दाखवत आहे हे पाहुन आनंदच होत होता. तरीही हे माझ्या ब्लॉगवर आणि मायबोली वेबसाईटवर टाकण्यापुर्वी मी त्यांना हे सांगितलं होतच. एवढच नाही तर ब्लॉगवर शेवटी त्यांची नावं टाकली हे मी त्यांच्या मुलांना/ नातवंडांना सुद्धा दाखवलय.

कानबाई या लेखाबद्दलही तुमचा तसा आक्षेप असेल तर मी तो काढुन टाकुन वेगळ्या शब्दात विकीपिडीयावर द्यायला तयार आहे.

धन्यवाद.