Jump to content

सदस्य चर्चा:Maihudon/My Last Post on Marathi Wikipedia

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ह्यातून काही मार्ग नक्कीच निघणार

[संपादन]

नमस्कार डॉन , मी आपणा पेक्षा विकी अनुभवाने आणि योगदानाने हि लहान आहे पण तरी लहान तोंडी मोठा घास घेण्याचा प्रयत्न करतो आहे . आपण तडका फडकी कोणताही निर्णय न घेता कुपया थोडा वेळ द्यावा/घ्यावा हि नम्र विनंती , जेणे करून ह्यातून काही तोडगा काढता येईल. जसे आपण म्हणता अनेक वेग वेगळ्या वैचारिक बैठकीचे लोक एकत्र काम करीत असतांना विवाद हे होणारच, तेव्हा आपल्या जेष्ठ्तेचा ह्या प्रकरणात मार्ग काढण्यासाठी सकारात्मक सहभाग गरजेचा आहे. आपण येथून जाण्या बाबत विचार कुपया करू नका. आपण थोडा वेळ दिलात तर ह्यातून काही मार्ग नक्कीच निघणार. हि विनंती मी प्रचालक म्हणून नव्हे तर एक सामान्य सदस्य म्हणून करीत आहो. आशा आहे कि आपण विकिपीडिया सोडण्याचा विचार करणार नाहीत. शेवटी आपण सारे मराठी भाषेच्या प्रेमा पोटीच काम करतो आहोत. मी ४ तासात पुन्हा परत येवून सविस्तर लिहितो ... - राहुल देशमुख १५:५५, १२ ऑगस्ट २०१२ (IST)[reply]


मराठी विकिपीडिया सदस्यांकडून विनंती

[संपादन]

निनावी किंवा खोटी अकाउंट्स पैदा करून येथे धुडघूस घालणाऱ्यांना पाहून त्यांची किंवा कोणाचीही चिडचिड होत आहे. आपणासह इतर सदस्य या प्रकाराला सामोरे जात आहोत. आपल्या सर्वांचा अनुभव असा अहे की असे सदस्य फक्त काही ठरावीक पठडीतील लेख तयार करतात, पावसाळ्यातील भुछत्रांसारख्या उगवतात व गोंधळ घालून गायब होतात. यांचे योगदान पाहिल्यास आपल्या सर्वांना याची प्रचिती येईल. ज्यांना येथे मनापासून योगदान द्यायचे आहे त्यांचे स्वागतच आहे पण विनाकारण शब्दाशब्दाला वाद उकरून काढणाऱ्या व सतत राजीनामा मागत बसणाऱ्या नवीन सदस्यांबद्दलचा निषेध...!

हा प्रकाराला सामोरे जावे. आपण सर्व मराठी भाषेच्या उत्कर्षाकरिता काम करत आहोत. तुमची संपादने बहुमोल आहेत. आरोप करणाऱ्यांचे त्याच्या काही दशांशसुध्दा काम दिसत आहे. त्यामुळे मी वर केलेल्या विधानाला बळकटी मिळते. सदस्य:Maihudon तुम्ही संपादने करा व व्यतिथ न होता काम करत रहा.

सचिन १६:०४, १२ ऑगस्ट २०१२ (IST)

थांबण्याची विनंती

[संपादन]

मी आपणास अशी विनंती करतो की, सध्या मी येथे जास्त लिहिण्यास वेळ देऊ शकत नाही पण मी परत येथे सविस्तर लिहिपर्यंत आपण येथील कुणाच्याही कोणत्याही आरोपाचा विचार न करता येथेच कार्यरत राहावे अशी कळकळीची विनंती करतो.संतोष दहिवळ (चर्चा) १६:५४, १२ ऑगस्ट २०१२ (IST)[reply]

You shouldn't leave

[संपादन]

Don,
Its very sad to see you come to this conclusion
I can understand the agony and pain you must have felt.
But, I must say, there have already been many ideological (and some illogical) battles so far on Marathi Wikipedia.
But it's still functioning because of people like you. And that's why you cannot stop. There will be more problems in the future, but our goal is more important than that.
Please consider this.
क्षितिज पाडळकर (चर्चा) २३:५७, १२ ऑगस्ट २०१२ (IST)[reply]

क्षितिज यांनी मांडलेल्या "but our goal is more important than that" या मुद्द्याशी मनापासून सहमत. ज्यांना मराठी विकिपीडियावर काम करायचे आहे, ते लोक इथे माहिती भरायला येत राहतील; ज्यांचे अन्य काही तात्कालिक उद्देश आहेत, ते तात्कालिक कारणाची एक्सपायरी झाल्यावर कधीच दिसत नाहीत, हे सत्य आहे. त्यामुळे आपण आपल्या मूळ हेतूंशी (ज्यामुळे आपण इकडे येऊन लिहू लागलो त्याच्याशी) चिकटून काम करत राहणे अधिक बरवे. अजून पाच वर्षांनी आपण आता दिसणारे सदस्य हयात असलो आणि हा प्रकल्पही अस्तित्वात असेल, तर मराठीत माहिती भरण्याचा ज्यांचा मुख्य उद्देश आहे, ते लोक इथे येऊन माहिती भरत राहतील. ज्यांचा उद्देश तसा आहे, पण जमत नाही, ते मोठी गॅप घेऊन का होईना कधीतरी पायधूळ झाडतात, हा अनुभव आहे. पण मुळात ज्यांचा उद्देश गढुळला असतो, त्यांचा वावर तात्कालिक असतो, हादेखील सिद्ध अनुभव आहे. तर असं सारं सोपं आहे!
तूर्तास मराठी विकी सोडून बाकी आवडीच्या गोष्टींची मौज घ्या. आयुष्य विकिपीडियाहून फार मोठं आणि महत्त्वाचं आहे. आवडीच्या कामांत धडधडून राबा; मनापासून काम करणाऱ्याच्या हातांत यश आणि सिद्धी असते - ठिकाण कुठलंही असो; सोनंच निघतं.
आणि जेव्हा तुमचं मन तुम्हांला मराठी विकिपीडियावर लिहायला प्रवृत्त करेल; तेव्हा काही काळाआधी संन्याशी होऊन मागाहून पुन्हा विकिपीडियाच्या संसारात दाखल झाल्यामुळे इतर सदस्य हसतील/टाकून बोलतील/हिणवतील/"केलेला पण मोडणारा हा बघा कसा आला!" असे म्हणून हेटाळतील, वगैरे शंकाकुशंकांची तमा बाळगू नका. तुमचा अंतस्थ आवाज जे सांगेल, तेच निकं. त्या आवाजाचं ऐका. वाटेल तेव्हा परतून या किंवा डोकावून जावंसं वाटलं तर डोकावून जा. त्यात तुमचं भलं न् मराठी विकिपीडियाचंही भलं!
चांगभलं !
--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) १६:२१, १३ ऑगस्ट २०१२ (IST)[reply]

अगदी खरे, परंतु...

[संपादन]

नमस्कार मंडळी,

हे पान डॉनचे असले तरी माझा हा संदेश तुम्हा सर्वांसाठी आहे.

सर्वप्रथम, तुमची डॉनबद्दलची आपुलकी पाहून बरे वाटले. अगदी मनापासून. माझीसुद्धा डॉनना 'जाऊ नका' हीच विनंती.

हा झाला अगदी खरे भाग...आता परंतु भाग...यातील काही गोष्टी तुम्हाला आवडतील, काही खटकतील, चूकभूल माफ करावी...

परंतु...तुम्हा सगळ्यांनी हेच संदेश आत्ता देण्याआधी डॉनवर हल्ले होत असताना दिले असते तर ही पाळीच आली नसती. एकटा डॉन आणि त्याचे लचके तोडणारी फौज असे चित्र असताना आपण सगळेच गप्प होतात....असे का? मेल्याशिवाय माणसाची कदर होत नाही हे येथे सुद्धा सत्य आहे का? डॉनच्या बाजूने तुम्ही आवाज उठवला असतात तर बिनबुडाचे रिकामटेकडे आरोप करणाऱ्यांना कळले असते की डॉन एकटा नसून त्याला आपली सुद्धा साथ आहे. त्याहून महत्वाचे म्हणजे डॉनला कळले असते की त्याला आपली साथ आहे.

हे झाले नाही.

जसे गल्लीत होते तसेच येथेही दिसत आहे. चार गुंड रस्त्यात कोणा बाई-मुलीची छेड काढतात. बाकी लोक आपल्या बापाचे काय गेले असा विचार करुन बाजूबाजूने मार्ग काढीत आपले घर/कार्यालय गाठतात. रोजचा छळ असह्य होउन ती एके दिवशी आत्महत्या करते. तेव्हा गळे काढून रडायला आणि तेराव्याला जेवायला हीSS गर्दी जमते. असेच काहीसे दिसत आहे. घरचे खाउन लश्करच्या (म्हणजे तुमच्या, आमच्या आणि मराठी भाषेच्या) भाकरी भाजणारा डॉन कुतरओढ होउन मेला. आता आपण सगळे येथे रडायला जमलो आहोत.

अर्थात, रडायला चार लोकं तरी आली हे डॉनचे नशीबच समजायचे.

डॉन ज्या मनस्तापातून गेला त्यातून मी स्वतः अनेकवेळा गेलेलो आहे त्यामुळे मला डॉनची मनस्थिती कळते आहे. अनेक लोकांच्या अनेक गटांनी येथे माझी बेफाम बदनामी करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु क्षितिज आणि संकल्पने म्हणल्यानुसार माझे उद्दिष्ट मला माहिती असल्यामुळेच मी त्यांना भीक न घालता येथे माझे काम करीत राहिलो. सगळ्यांना ते शक्य नाही. आयुष्यातील अनमोल वेळ घालवून काम करायचे. त्याचा मोबदला मिळणार नाहीच, वर बिनकामाच्या लोकांकडून वाट्टेल ते ऐकायचे. याचा हिशोब होत नाही. असा विचार करून समजून आजतगायत अनेक बहुमोल संपादक येथून परागंदा झालेले आहेत.

माझा उद्देश तुमची कानउघाडणी करण्याचा नाही. मराठी विकिपीडियावर उरापोटी खपणारे मोजके लोक आहेत. काल नरसीकर, आज डॉन, उद्या अजून कोणी. असे एक एक मोहरे गळत राहिले तर हा प्रकल्प खड्ड्यात जायला वेळ लागणार नाही. मराठी विकिपीडिया टिकावा, वाढावा असे तुम्हाला खरेच वाटत असेल तर तुम्ही वर मांडलेली मते उघड्यावर मांडणे व चांगले काम करणाऱ्याच्या पाठीशी उभे राहणे हे अतिमहत्वाचे आहे.

मी येथे लिहिलेले जरा फटकळ आहे आणि त्याचा आपल्याला राग आल्यास मी तुमची माफी मागतो. यात तुम्हाला दुखवण्याचा उद्देश नसून तुम्हास थोडासा विचार करण्यास प्रवृत्त करणे हा उद्देश आहे. नव्हे, कृती करण्यास उद्युक्त करणे हाच यात उद्देश आहे.

कळावे, लोभ असावा.

अभय नातू (चर्चा) ०२:४८, १६ ऑगस्ट २०१२ (IST)[reply]


अभयराव, आपल्या उत्तर देण्याकरता मी उपलब्ध आणि समर्थ आहे.उत्तराची प्रतिक्षा करावी.
आपण एवढ्या भावनेनी लिहिलेले खालील वाक्य आपल्याच पॅरेग्राफ मध्ये जरा ठळक किंवा अगदी डॉनराव स्टाईल मध्ये लाल रंग वर लाल रंगातला इंग्रजी अनुवाद करून ठेवावा, कदाचित लोकांना आपल्या भावना अधिक चांगल्या पद्धतीने समजण्यास मदत होईल :)
"जसे गल्लीत होते तसेच येथेही दिसत आहे. चार गुंड रस्त्यात कोणा बाई-मुलीची छेड काढतात. बाकी लोक आपल्या बापाचे काय गेले असा विचार करुन बाजूबाजूने मार्ग काढीत आपले घर/कार्यालय गाठतात. रोजचा छळ असह्य होउन ती एके दिवशी आत्महत्या करते. तेव्हा गळे काढून रडायला आणि तेराव्याला जेवायला हीSS गर्दी जमते. असेच काहीसे दिसत आहे. घरचे खाउन लश्करच्या (म्हणजे तुमच्या, आमच्या आणि मराठी भाषेच्या) भाकरी भाजणारा डॉन कुतरओढ होउन मेला. आता आपण सगळे येथे रडायला जमलो आहोत." हे वाक्य माझे नाही ८०००० संपादने करणाऱ्या मराठी विकिपीडियाच्या सर्वात ज्येष्ठ प्रशासकाचे आहे. बाकी अभयराव माझ्या उत्तराच्या प्रतिक्षेत रहा, लौकरच भेटू ! भीमरावमहावीरजोशीपाटील (चर्चा) १२:१३, १६ ऑगस्ट २०१२ (IST)[reply]

चोराच्या उलट्या बोंबा

[संपादन]

अभय नातू,

इतरांना शहाणपण सागतोय ... अरे ज्या विवादात डॉन गेला त्याची सुरुवातच तुझ्याच महाप्रतापाने झाली आणि डॉन तर तुला वाचवायला त्यात पडला. मग इतरांचे सोड तू कुठे झोपला होता? ... का नाही वाचवले त्याला तू ...? तू तर रे "तुम लढो हम कपडे संभालते " हेच केले आणि आता चोराच्या उलट्या बोंबा पहा. डॉन विवादाचा खरा गुन्हेगार अभय नातू हाच आहे ह्या पापातून त्यास मुक्ती नाही ...! -Swarupsing (चर्चा) ०८:४२, १७ ऑगस्ट २०१२ (IST)[reply]

नमस्कार मंडळी! मैहूडॉन व भीमराव यांच्यात मध्यस्थी करायला प्रश्नकर्त्याने काही प्रयत्न केले नाहीत, ही मोठी रंजक गोष्ट आहे.
चालू द्या.
--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) १३:१३, १७ ऑगस्ट २०१२ (IST)[reply]

विघ्नसंतोषी संकल्प द्रविड

[संपादन]

संकल्प द्रविड ह्याचे डॉन च्या जाण्याबाबत प्रतिक्रिया म्हणजे "मेलेल्या प्रेताच्या टाळूवरील लोणी चाटन्यातला " प्रकार आहे. डॉन च्या जाण्याने संकल्प इतका सुखावला कि त्याला फुटणार्या आनंदाच्या उकळ्या तो दाबुशकलेला नाही हे दिसतेच आहे. मराठी विकिपिडीयावर डॉन ह्याची कामगिरी संकल्प पेक्षा सरस असल्याने डॉनचा काटा परस्पर निघाल्याने हर्ष भरलेला संकल्प हा त्यास येथून जाण्याचेच खुबीने सुचवतो आहे. आपल्या आका बाबतच्या वरील संदेशास ज्या तत्परतेने त्याने उत्तर दिले तोच विघ्नसंतोषी संकल्प डॉन च्या विवाद युद्धा दरम्यान नदारत होता. राजकारणी कुटील संकल्पचा धिक्कार असो. Swarupsing (चर्चा) १३:०९, १८ ऑगस्ट २०१२ (IST)[reply]

नातू आणि द्रविड नाटक कंपनी

[संपादन]

नातू आणि द्रविड हे दोन उंटा वरची शहाणे येथे लोकांना उपदेश पाजता आहे पण त्यांचे वागणे हे हिंदी सिनेमातल्या पोलिसांप्रमाणे आहे. घटना संपे पर्यंत चुपचाप तमाशा पहायचा आणि मग पंचनामा कराला कोणी हो बोलावले तुम्हाला ? तुमचे येथील बयान हे चित्रपटातील खलनायकाचे आतून आनंद झाल्यावर खोटे खोटे रडण्याचे सोंग करण्या सारखे आहे. हि नाटके बंद करा. तुमचा बुरखा कधीच फाटलाय.

सुजाण सदस्यांना सारे कळते म्हटल !!! - Swarupsing (चर्चा) ११:५३, २० ऑगस्ट २०१२ (IST)[reply]

  • अभयजी और संकल्पजी आपने डॉनजी को रोकना चाहिए था| अभी भी आप उन्हें वापस लानेकी कोशिश करनेकी क्रिपा करे| आपको याद होंगा की संतोषजी को ऐसेही सदोस्योनेही विनंती करके वापस लाया था | आप तो प्रचालक हो और उनके परम मित्र भी तो वो आपकी जरुर सुनेंगे | - लकी ०८:५१, २१ ऑगस्ट २०१२ (IST)
  • नमस्ते लाकिजी,
तुम्ही मराठी विकिपिडीयावर दाखवलेली सामाजिक बांधिलकी खरोखरच आदर्श आहे. तुमच्या पुढाकारानेच अकाली निवृत्ती घेतलेले अत्यंत सक्रीय संपादक श्री संतोष दहीवळ हे परत येवून आज विकिपिडीयावर भाघोस काम करीत आहेत. वादग्रस्त प्रचालक मंदार कुलकर्णी ह्याचेशी झालेला विवाद हा संतोष ह्यांच्या निवृत्तीचे कारण दिसत असला तरी त्या प्रकरणात श्री अभय नातू आणि श्री संकल्प द्रविड ह्यांनी घेतलेली बघ्याची भूमिकाही तेवढीच मनाला चाटून गेली होती. मराठी विकिपीडिया समाज आपला अखंड ऋणी राहील. - Neetin kadu (चर्चा) २१:५९, २१ ऑगस्ट २०१२ (IST)[reply]
  • Yes, we should appreciate the commitment of Lucky jee towers wiki society. Keep it up Sir.

On the other hand it frustrates me why the (so called) big guns here prefer to be in commentary box than actually doing some thing. They should lead from front or at least avoid controversies. - Balajee (चर्चा) ०८:४३, २४ ऑगस्ट २०१२ (IST)[reply]