सदस्य चर्चा:Lovewithchampu
स्वागत | Lovewithchampu, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | Lovewithchampu, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,४९४ लेख आहे व १४० सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
चर्चेचा मजकूर वगळणे वगैरे बद्दल
[संपादन]नमस्कार Lovewithchampu,
विकिपीडियावरील तुमच्या योगदानाबद्दल धन्यवाद. कृपया एखाद्या लेखाबद्दल सुरू असलेल्या चर्चा कृपया वगळू नका, तुम्हाला ते वगळायचे असल्यास तसे का याबद्दल तुमचे मुद्दे मांडा आणि तसा प्रस्ताव मांडा आणि लोकांच्या सदस्य पानांवर काही बदलण्यापूर्वी त्यांना पूर्व सूचना देणे उचित होईल कारण सदस्य पाने इतर विकि पानांसारखी नसतात.
बाकी तेजस कुळकर्णी हा लेख तुम्ही लिहीला असल्यामुळे विकिपीडियावर तो का हवा याबद्दलच्या चर्चेत सहभाग घेतल्यास ते पान काढण्या/ठेवण्या संबंधीचा निर्णय घेण्यास मदत होईल. कृपया तुमचे मुद्दे तेथे मांडा.
- कोल्हापुरी ०६:१८, १२ जानेवारी २०१२ (UTC)
champu
[संपादन]अवश्य. मी माझे मत चर्चा पानावर नोंदवले आहे. आणि तसदीबद्दल क्षमस्व. आगामी काळात सहकार्याची अपेक्षा.
पानकाढा
[संपादन]आपला मजकूरः "तुम्ही पाने वगळण्याबद्दल बोलत आहात. पाने वगळतात म्हणजे तुम्ही एकप्रकारे सदस्यांचा अपमान करतात. प्रत्येक सदस्याचे ज्ञान हे प्रांत, भाषा आणि संस्कृती नुसार वेगळे असते. विकीपेडिया वर प्रत्येकजण आपल्या ज्ञानानुसार माहिती समाविष्ट करत असतो. आणि सदस्यांची पाने वगळण्याआधी आपण स्वतः काय दिवे लावले आहेत ते तपासून पहावे. विकीपेडिया म्हणजे जर तुम्ही तुमची जहागीर समाजात असाल तर तशी पूर्वसूचना सदस्यांना देऊन द्यावी. विकीपेडिया पेक्षा अनेक उत्तम वेबसाईट उपलब्ध आहेत. इथे येऊन स्वतःचा अपमान करून घेण्यापेक्षा ब्लॉग तयार करून लेख लिहिणे कधीही चांगले. वेगवेगळ्या विषयांवर लिहीलेले माझे अनेक लेख तुम्ही डिलीट केले आहेत. ४-४ तास घालून लिहिलेले तुमचे लेख जर कोणी वगळले तर कस डोकं फिरत याचा अनुभव एकदा घेऊन बघा."
- आपण नक्की कोणत्या पानांबद्दल बोलत आहात ह्याचा खुलासा कराल काय? येथील नोंदीप्रमाणे आपण मुख्यतः तेजस कुळकर्णी ह्या लेखात योगदान केले आहे व हे पान अजून काढले गेलेले नाही तर ते वगळावे की नाही ह्यावर चर्चा सुरू आहे. वेगवेगळ्या विषयांवर आपण कधी लेख लिहिले व ते कोणी डिलिट केले? येथे कोणताही लेख वगळण्याआधी पानकाढा हा साचा लावला जातो व कोणाची हरकत नसेल तरच वगळला जातो. उगाच वाटेल तशी विधाने करून आपल्याला काय साधायचे आहे? ब्लॉग अवश्य लिहा. ब्लॉग हा आपल्या मालकीचा असतो तर विकिपीडियावर निर्माण झालेले सर्व लेख प्रताधिकार मुक्त असतात. जतन करा ह्या बटणाखाली लिहिलेला हा संदेश कृपया वाचावा. जर तुम्हाला तुमचे लिखाण इतरांकडून संपादित आणि प्रसारित होण्याची इच्छा नसेल, तर ते येथे दाखल करू नका. - अभिजीत साठे १३:१९, १२ जानेवारी २०१२ (UTC)
"मराठी विकिस्रोत" चे उद्घाटन
[संपादन]सप्रेम नमस्कार. "मराठी भाषा दिवस" निमित्ताने दिनांक २५ फेब्रुवारी २०१२ रोजी पत्रकारिता विभाग - रानडे इंस्टीट्यूट, पत्रकार संघ आणि विकिमीडिया पुणे चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेते श्री. अमोल पालेकर हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. या कार्यक्रमात विकिपीडियाच्या माहिती बरोबर "मराठी विकिस्रोत" चे उद्घाटन श्री. अमोल पालेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तरी आपण सर्वांनी उपस्थित रहावे. वेळ: दुपारी २:०० ते ५:३० (कृपया वेळेपूर्वी १० मिनिटे आपल्या जागेवर स्थानापन्न व्हावे) ठिकाण: पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे या शिवाय आपण मराठी विकिस्रोतचे सदस्य बनून मराठी विकिस्रोतला हातभार लावायला सुरुवात करू या.
नमस्कार Lovewithchampu, आपण मराठी विकिपीडियावर लेखनाच्या केलेल्या प्रयत्नांकरिता अभिनंदन आणि धन्यवादही. आपली मराठी विकिपीडिया वर १० पेक्षा जास्त संपादने झाली आहेत. विकिपीडिया इतर वेबसाईट पासून भिन्न असून तो एक वस्तुनिष्ठ ज्ञानकोश आहे. आपण विकिपीडिया:नवीन सदस्यांना मार्गदर्शन का लेख पाहिलाच असेल. लेखनास जमेल तेवढे संदर्भ देणे अभिप्रेत असते. विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा आणि विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणाऱ्या सर्वसाधारण संपादन त्रुटी लेखांचा अभ्यास करावा. आपणास इतरही सहलेखक मार्गदर्शन करतीलच. आपल्या आवडीच्या विषयात असेच लेखन घडत राहो ही शुभेच्छा.
तेजस_कुळकर्णी हे लेख पान तुर्तास वगळले जात आहे
[संपादन]कृपया चर्चा:तेजस_कुळकर्णी#धन्यवाद पहावे. तेजस_कुळकर्णी लेख विषयाचा आंतरजालावरून पुन्हा एकदा सविस्तर तपास करण्याचा प्रयत्न केला. चित्रपट आणि नाट्यक्षेत्रात काम केलेल्या व्यक्ती बद्दल पडताळण्या जोगा त्रयस्थ संदर्भ दोन वर्षातही उपलब्ध केला गेलेला नाही. या अनुषंगाने पुरेशा ज्ञानकोशीय मजकुरासहीत त्रयस्थ विश्वासार्ह संदर्भ उपलब्ध केला जाई पर्यंत विकिपीडिया संकेतांना अनुसरून हा लेख वगळला जात आहे.
नमुद केल्या गेलेल्या चित्रपटाचेही संदर्भ आढळले नाहीत. आपल्याकडे चित्रपट विषयक पडताळण्या जोगे त्रयस्थ संदर्भ उपलब्ध असल्यास संबंधीत चित्रपट विषयक लेख निर्मितीकरून त्यातील कलाकरांच्या यादीत तेजस कुलकर्णींचे नाव जोडता येईल.
आपल्या आवडीचे ज्ञानकोशीय वाचन आणि लेखन घडत राहो ही शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २२:२८, २० जुलै २०१४ (IST)