विकिपीडिया चर्चा:धूळपाटी/ब्राह्मण जातिधारकांच्या संस्था

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

चर्चा पान[संपादन]

आपल्याला मान्य नसलेल्या प्रत्येक गोश्तीच्या बदला साठी ह्या पानाचा वापर करावा.

FOJ12345 (चर्चा) ००:४८, ८ नोव्हेंबर २०१२ (IST)[reply]

हा लेख का अस्तित्वात असावा ह्याचे काही स्पष्टीकरण आहे काय? पानकाढा साचा लावला आहे. मान्य नसल्यास येथे चर्चा करावी. - अभिजीत साठे (चर्चा) १६:५१, ८ नोव्हेंबर २०१२ (IST)[reply]
मराठा जातिधारकांच्या संस्था ह्या लेखा बद्दल जर तुम्हाला आक्षेप नसतील तर ह्या लेखा बद्द्लचे आक्षेप स्पष्ट करा. नाही तर पानकाढा साचा काढुन टाकावा.
FOJ12345 (चर्चा) १७:२०, ८ नोव्हेंबर २०१२ (IST)[reply]

कुप्रसिद्ध गोबेल्सवरचा लेख जर विकिपीडियावर येऊ शकतो तर या लेखांनी काय घोडे मारले आहे? माहिती जर चुकीची किंवा विपर्यस्त असेल तर तेवढा मजकूर तत्काळ काढून टाकावा, आणि पुन्हा येऊ नये अशी व्यवस्था करावी. जगातील सुप्रसिद्ध आणि कुप्रसिद्ध संस्थांची माहिती मिळण्यासाठी अशा लेखांची गरज असते....J (चर्चा) १७:४९, ८ नोव्हेंबर २०१२ (IST)[reply]

गेल्या काही दिवसांमधील येथील जातीयवादी वातावरण पाहता अशा लेखांचा वापर गोष्टी चिघळवण्यासाठी केला जाऊ शकतो (you can already see some ranting on this article). तसेच ह्या लेखामध्ये यादीव्यतिरिक्त कोणती माहिती अपेक्षित आहे? सध्या येथे असलेली वाक्ये माहितीपूर्वक नसून वैयक्तिक मते आहेत. गोबेल्स ही एक व्यक्ती होती, कोणती यादी नव्हे. तसेच गोबेल्सबद्दल उद्या जर कोणी वैयक्तिक दृष्टिकोन व्यक्त करू लागले तर ते देखील चुकीचेच ठरेल. शिवाय इंग्लिश विकिपीडियावर controversies टाळण्यासाठी कठोर नियम आहेत जे येथे नाहीयेत. हे पाहता ह्या लेखाची आवश्यकता काय असा माझा प्रश्न आहेत. बाकी सुज्ञ मंडळींनी ठरवावे. - अभिजीत साठे (चर्चा) १९:१५, ८ नोव्हेंबर २०१२ (IST)[reply]
जो काय निर्णय घ्यायचा आहे तो दोन्ही लेखांसाठी(मराठा जातिधारकांच्या संस्था, आणि ह्या लेखांसाठी) घ्या. माझ्यामते दोन्ही लेख काढून टाका. दोन्हीमध्ये भरमसाट POV मजकुर भरला आहे आणि मला वाटते की असे लेख विकिपीडियासारख्या माहितीकोशात नसलेलेच बरे- पुणेरीपुणेकर (चर्चा) २३:११, ८ नोव्हेंबर २०१२ (IST)[reply]

पान का ? काढा[संपादन]

{{पानकाढा}} कृपया, हा साचा लावताना कारण नमुद करणे टाळू नये. {{पानकाढा | कारण = अमुकतमुक कारण}} असे लिहावे.[१]

पान काढण्याचे कारण देण्याची जबाबदारी पान काढण्याची विनंती करणाऱ्यांची असावी. हा लेख का अस्तित्वात असावा ह्याचे काही स्पष्टीकरण आहे काय? [२] म्हणजे काय? पान काढण्याचे कारण देण्याची जबाबदारी पान काढण्याची विनंती करणाऱ्यांची असावी हे आपणास मान्य नसेल तर, या संदर्भाने अत्यंत तीखट प्रश्नांची मालिका उपस्थित केली जाउ शकते हे कदाचित आपण ध्यानात घेतले नसावे.. सोबतच आपण हा संदेश सामान्य सदस्य या नात्याने दिला का प्रचालक म्हणून हे ही स्पष्ट करावे. आणि पानकाढा साचा लावण्याचे सुस्पष्ट स्पष्टीकरण साचात लवकरात लवकर लावावे अथवा साचा हटवावा हि विनंती.

विकिपीडिया नवीन लेखकांना प्रोत्साहन देत असतो. पान काढण्याची सूचना लावण्याचे कारण प्रत्येक वेळेस शक्य नसले तरी , शक्य तेव्हढ्या वेळा सदस्यास त्यांच्या चर्चा पानावर सुचीत केले जावे. असे करण्याने नवे सदस्य दिर्घकाळ पर्यंत विकिपीडिया सोबत रहाण्यास मदत होते. शिवाय गैरसमजातून वाद निर्माण होणे, नाराजीतून उत्पात प्रसंग अशा बाबी कमी होण्यास मदत होते.

पान का ? काढा (चर्चा) १८:४६, ८ नोव्हेंबर २०१२ (IST)[reply]

पान काढा हा साचा मी का काढला?[संपादन]

श्री. अभिजित साठे आणि मंडळी,
ब्राम्हण जातिधारकांच्या संस्था हे पान काढून टाकण्यासाठी तुम्ही लावलेला साचा मी काढून टाकला आहे. कारण हा साचा लावताना तुम्ही निव्वळ ब्राह्मणी जातीयवाद केला आहे. तुम्ही चालविलेला ब्राह्मणवाद सर्व सदस्यांना कळावा यासाठी मी येथे त्याबद्दल लिहित आहे.

१६ ऑगस्ट २०१२ रोजी मराठा जातिधारकांच्या संस्था हा लेख विकीवर आला. मराठा समाजाची बदनामी करण्याच्या हेतूनेच हा लेख लिहिला गेला होता. हा लेख गेली तीन महिने विकीवर होता. तुमच्या चेलामंडळाचा नेता अभय नातू उपाख्य पुणेरीपुणेकर यांनी या लेखात काही सुधारणाही केल्या. पण हे बदनामीकारक पान काढले पाहिजे असे कोणाला वाटले नाही. मराठ्यांची बदनामी होते तर होऊ द्या, अशी भूमिका तुम्ही घेतली.

त्यानंतर सुमारे ३ महिन्यांनी ७ नोव्हेंबर २०१२ रोजी ब्राम्हण जातिधारकांच्या संस्था हा लेख विकीवर आला. अर्थात मराठ्यांच्या बदनामीला दिलेले हे उत्तर होते. जातीयवादी ब्राह्मणांना ‘जशास तसे'ची भाषाच समजते, म्हणून बदनामीला उत्तर बदनामी असे धोरण आम्हाला स्वीकारवे लागले.

आता तुम्हाला उपरती होऊन ब्राम्हण जातिधारकांच्या संस्था हे पान काढण्याची भाषा तुम्ही सुरू केली आहे. हे पान कोणालाही काढता येणार नाही. माझी सूचना अशी आहे की, या पानाच्या मथळ्यातच 'ब्राह्मण हा शब्द ब्राम्हण असा चुकीचा लिहिला गेला आहे. तो दुरुस्त करून हे पान आहे तसे राहू द्यावे.

जरा महत्त्वाचे[संपादन]

अभिजित साठे, अभय नातू उपाख्य पुणेरीपुणेकर आणि इतर चेलामंडळाचे सदस्य यांना मी सांगू इच्छितो की, ब्राह्मणी जातीयवादाची ही लढाई मी आता विकिपीडियाच्या बाहेर नेणार आहे. विकिपीडियावर ब्राह्मणांचा कसा जातीयवाद सुरू आहे, याची माहिती मी बाहेर कळविणार आहे.

कळावे, लोभ असू द्यावा.

-brurthari (चर्चा) १८:१७, १० नोव्हें. २०१२ (IST)

तुमच्या या उपक्रमास हार्दिक शुभेच्छा! - पुणेरीपुणेकर (चर्चा) २१:३६, १० नोव्हेंबर २०१२ (IST)[reply]
पुन्हा एकदा नसलेल्या बागुलबुवाच्या नावाने भीती पसरवून येथे चालू असलेल्या इतरांच्या कामात अडथळा आणू नये ही नम्र विनंती.
त्याउप्पर तुम्हाला ही चर्चा बाहेर न्यायची असल्यास हार्दिक शुभेच्छा.
अभय नातू (चर्चा) २३:३७, १० नोव्हेंबर २०१२ (IST)[reply]

>या पानाच्या मथळ्यातच 'ब्राह्मण हा शब्द ब्राम्हण असा चुकीचा लिहिला गेला आहे.< कुणी सांगितले? संस्कृतमध्ये असतो तो ब्रह्मातला ह्म, मराठीत असतो तो म्हशीतला म्ह. चिह्न, आह्वान, मध्याह्न, ह्रास, आह्लाद, ब्राह्मण हे संस्कृत शब्द मराठीत अनुक्रमे चिन्ह, आव्हान, मध्यान्ह, र्‍हास, आल्हाद, आणि ब्राम्हण असे लिहिता येतात. ब्रह्म/ब्राह्मण लिहिणे अर्थात आदर्श आहे, पण सक्तीचे नाही. संस्कृतमध्ये ग्रह्‌ या नवव्या गणाची तृतीय पुरुषी रूपे गृह्णाति-गृह्णीते(गृह्‌णाति-गृह्‌णीते) अशी होतात. मराठीत ह्ण(ह्‌ण) हे अक्षर असलेला शब्द बहुधा नसावा, ण्ह असलेले कण्हणे, कण्हेर सारखे शब्द मात्र आहेत.. ...J (चर्चा) २३:३३, १० नोव्हेंबर २०१२ (IST)[reply]

श्री. माहितगार यांनी घातपाती कारवाया थांबवाव्या[संपादन]

श्री. माहितगार, कोणतेही कारण न देता आपण हे पान अर्धसुरक्षित केले आहे, असे दिसते. आपली कृती जातीय स्वरूपाची आहे, असे म्हटल्यावाचून गत्यंतर नाही. हे पान फेसबुकवर शेअर करण्यात आल्यानंतर चर्चेत आले. फेसबुकवरील जातीयवादी ब्राह्मण मंडळींनी या पानाविरुद्ध ओरड केली. त्यानंतर श्री. जे यांनी या पानावरील सर्व मजकूर उडवून टाकला होता. श्री. जे यांचे हे एकतर्फी संपादन मी उलटवले. त्यामुळे आपल्या पोटात दुखण्याचे कारण काय?

अशा एकतर्फी ‘घातपाती कारवाया' आपल्याकडून होऊ नये, अशी अपेक्षा आहे. -brurthari (चर्चा) १७.00, २६ जुलै २०१३ (IST)


नमस्कार, प्रथमत: आपले या चर्चा पानावर अत्यंत आदराने स्वागत करतो.

१) लेखपान अर्धसुरक्षीत केल्या नंतर आपण स्वत: संपादीत करून पाहीलत आणि ते संपादीत झाला बरोबर ना ? >>कोणतेही कारण न देता<< हे सरासर दिशाभूल करणार आहे दिलेली कारणं मिटवल्यामुळे ते आता पूर्ण सुरक्षीत केले आहे. वाक्यवार विश्वकोशीता उल्लेखनीयता चर्चा करून मगच मजकुरात बदल करावेत असा प्रशासकीय निर्णय घेतला आहे आपल्या सहकार्या करता धन्यवाद.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:१७, २६ जुलै २०१३ (IST)[reply]

ब्राह्मण जातीच्या लोकांकडून भारतभर अनेक संस्था चालविल्या जातात. ब्राह्मणांसाठी काम करणे, असे या संस्थांचे उद्दिष्ट असते. ब्राम्हण सर्व भारतभर विखुरले असल्याने आणि त्यांच्यात्यांच्यात अनेक भेद असल्याने यांतल्या बहुतेक संस्था सभासदसंख्येने किरकोळ आहेत. या संस्था करीत असलेले प्रमुख कार्य म्हणजे जातीतील मुलींना, शक्यतो सजातीय अनुरूप वर मिळवून देणे आणि मुलांना सजातीय वधू मिळवून देणे. त्यामुळे बहुसंख्य ब्राह्मण संस्था या वधूवरसंशोधन संस्था असतात. या संस्था करीत असलेले दुसरे काम म्हणजे गरीब मुलांना पाट्या-पेन्सिली, वह्या-पुस्तके यांचे वाटप करणे, शालेय ब्राम्हण विद्यार्थ्यांना अल्पस्वल्प रकमेच्या शिष्यवृत्त्या देणे आणि क्वचित परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कर्ज मिळवून देणे. यांपैकी काही संस्थांचे एखादे ४-८ पानी मासिक किंवा त्रैमासिक मुखपत्र असते.

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संघटनेची स्थापना होऊन ९ जानेवारी २०१७ रोजी ४५ वर्षे पूर्ण झाली. ही संस्था दरवर्षी उद्योजक पुरस्कार, कृतज्ञता पुरस्कार, गुरुवंदना पुरस्कार, सुधाचंद्र पुरस्कार, आणि सामाजिक पुरस्कार असल्या नावांचे बरेच पुरस्कार देते.

आणखी संस्था[संपादन]

 • अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संघटना (पुणे केंद्र) (मुख्यालय नाशिक)
 • अखिल भारतीय पेशवा संघटना (शिवाजीनगर, पुणे)
 • अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघ (मुख्यालय नाशिक; पिंपरी-चिंचवडसह अनेक शहरांत शाखा)
 • अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंमेलन (२००५ सालापासून दरवर्षी नाशिक येथे भरते).
 • अखिल भारतवर्षीय श्री गुर्जर गौड ब्राह्मण महासभा, बिकानेर
 • अखिल भारतीय बावीसा ब्राह्मण समाज, सिहोर
 • अखिल भारतीय ब्राह्मण आरक्षण संघर्ष समिती (विद्यमान (इ.स. २०१५) अध्यक्ष हरिराम दीक्षित)
 • अन्तर्राष्ट्रीय ब्राह्मण समाज, नवी दिल्ली.
 • आपण सगळे ब्राह्मण (फेसबुकवरील यूथ कट्टा)
 • आम्ही सारे ब्राह्मण (पाक्षिक. संपादक : गोविंद हर्डीकर). २०१३सालचा दिवाळी अंक येथे आहे.
 • ऑल इंडिया ब्राह्मण समाज, अहमदाबाद (अध्यक्षा - शैलजा जोशी) : या संस्थेने दुर्बल ब्राह्मणांना शिक्षण आणि नोकरी यांत आरक्षण मिळावे अशी मागणी केली आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गुजराथेत ६२ लाख ब्राह्मण राहतात.
 • ऑल गुजरात ब्राह्मण समाज : या संस्थेने गुजराथमधील मंदिरांतल्या पुजाऱ्यांना तमिळनाडूत देतात तसे वेतन द्यावे अशी मागणी केली आहे. तमिळनाडूमध्ये पुजाऱ्याला प्रत्येकी २५०० रुपये महिना वेतन मिळते.
 • उत्कल ब्राह्मण संस्था
 • ओंकार ब्राह्मण सेवा संघ, मोहननगर (चिंचवड-पुणे)
 • ओन्ली कोकणस्थच (फेसबुकवरील ग्रुप)
 • कट्टर चित्तपावन (फेसबुकवरील ग्रुप)
 • कडा माणिकपुरी जिझौतिया ब्राह्मण समाज (मध्य प्रदेश)
 • कऱ्हाडे ब्राह्मण संघ, गिरगाव (मुंबई)
 • कऱ्हाडे ब्राह्मण सेवा मंडळ डोंबिवली, (जिल्हा ठाणे)
 • कान्यकुब्ज ब्राह्मण समाज (कनौजिया ब्राह्मण समाज)
 • गौड मालवीय ब्राह्मण समाज (माळवा)
 • चित्पावन संघ, उज्जैन
 • देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ, कसबा पेठ (पुणे)
 • पिंपरी-चिंचवड ब्रह्म सेवा संघ (पुणे)
 • ब्राह्मण एकता अस्मिता सहयोग व संस्कार मंच, भोपाळ
 • ब्राह्मण जागृती सेवा संघ, पुणे : या संस्थेने डॉ. प्रभा अत्रे यांसह अनेकांना समाजभूषण पुरस्काराने, पांडुरंग बलकवडे यांना विशेष पुरस्काराने तर अभिनेत्री तेजस्विनी पंडित व उद्योजक सौरभ गाडगीळ यांना युवा पुरस्काराने सन्मानित केले आहे.
 • ब्राह्मण्य (फेसबुकवरील ग्रुप)
 • महाराष्ट्र चित्पावन संघ, पुणे
 • मैथिल ब्राह्मण समाज संस्था
 • याज्ञवल्क्य आश्रम, कसबा पेठ (पुणे)
 • वेदविद्याधान, त्र्यंबकेश्वर
 • शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन मंडळ
 • श्रीकृष्ण भट्ट गोडशे गुरुजी घन पारायण समिती, पुणे
 • सर्व ब्राह्मण एकता अभियान समिति, भोपाळ
 • सर्व ब्राह्मण समाज, इंदूर, भोपाळ, रायपूर, राऊ
 • सिद्धिविनायक ट्रस्ट, दादर (मुंबई)

सदस्य:Anti delete यांचा मजकुर वगळला जाण्या बद्दल आक्षेप आणि उल्लेखनियता चर्चेची विनंती[संपादन]

सदस्य:Onkarpachhade यांनी या संपादनाद्वारे या लेखातील मजकुर वगळण्या बद्दल सदस्य:Anti delete यांनी माझ्या व्यक्तीगत चर्चा पानावर आक्षेप घेतला तो पुढील घटकवार/वाक्यवार ज्ञानकोशीय उल्लेखनीयता चर्चेकरीता या चर्चा पानावर नोंदवत आहे.सर्व सदस्यांनी चर्चेस व्यक्तीगत आरोपांचे स्वरूप न देता सदर मजकुराबद्दल घटकवार/वाक्यवार ज्ञानकोशीय उल्लेखनीयता चर्चा करावी ही नम्र विनंती आहे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १०:०६, १२ ऑक्टोबर २०१३ (IST)[reply]

मूळ लेखातून अकारण वगळलेला मजकूर[संपादन]

जशा इतर जातिधारकांच्या संस्था आहेत तशा ब्राम्हण संस्थाही आहेत. ब्राम्हण सर्व भारतभर विखुरले असल्याने आणि त्यांच्यात्यांच्यात अनेक भेद असल्याने यांतल्या बहुतेक संस्था सभासदसंख्येने किरकोळ आहेत.

या संस्था करीत असलेले प्रमुख कार्य म्हणजे जातीतील मुलींना, शक्यतो सजातीय अनुरूप वर मिळवून देणे आणि मुलांना सजातीय वधू मिळवून देणे. त्यामुळे बहुसंख्य ब्राह्मण संस्था या वधूवरसंशोधन संस्था असतात. या संस्था करीत असलेले दुसरे काम म्हणजे गरीब मुलांना पाट्या-पेन्सिली, वह्या-पुस्तके यांचे वाटप करणे, शालेय ब्राम्हण विद्यार्थ्यांना अल्पस्वल्प रकमेच्या शिष्यवृत्त्या देणे आणि क्वचित परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कर्ज मिळवून देणे. यांपैकी काही संस्थांचे एखादे ४-८ पानी मासिक किंवा त्रैमासिक मुखपत्र असते.