सदस्य चर्चा:प्रियंवदा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
   Help-browser.svg स्वागत प्रियंवदा, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
Nuvola apps ksig-vector.svg आवश्यक मार्गदर्शन प्रियंवदा, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ७७,८०१ लेख आहे व २०८ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

जसेदृश्य संपादक तथा VisualEditor हा एक रिच-टेक्स्ट संपादनाची सोय करणारा मिडियाविकि विस्तारक आहे. [[]] {{ }} सारख्या विकिच्या मार्कअप विषयी माहिती नसतानाही कुणीही सर्वसामान्य व्यक्ती सुलभतेने संपादन करू शकेल असा या यथादृश्यसंपादकाचा उद्देश आहे.

दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार) दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Flag of India.svg Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
Crystal Clear app ktip.svg नेहमीचे प्रश्न
Accessories-text-editor.svg सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
Policy - The Noun Project.svg धोरण
Crystal Clear app ksirtet.svg दालने
Nuvola apps bookcase.svg सहप्रकल्प

-- साहाय्य चमू (चर्चा) २१:०३, १९ जानेवारी २०१७ (IST)

विकिपीडिया आशियाई महिना २०१७: सहभागी होण्यासाठी आमंत्रण[संपादन]

Sun Wiki.svg

नमस्कार! गेल्या तीन वर्षांपासून, मराठी विकिपीडियावर विकिपीडिया आशियाई महिना (WAM) असे कार्यक्रम आयोजित केला जाते. हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी असते, विविध विकिपीडिया प्रकल्पात शेकडो संपादकानीं आशियायी विषयांवर हजारो लेख तयार करतात.

मी तुम्हाला विकिपीडिया आशियाई महिना २०१७ साठी सहभागी होण्यासाठी निमंत्रित करू इच्छितो, जे पुन्हा एकदा नोव्हेंबर महिन्यापासून चालते.सदस्य आशियायी-संबंधित सामग्रीबद्दल नवीन लेख तयार करतील जे किमान ३,००० बाइट आणि ३०० शब्दांची लांबी असेल हे लक्ष्य आहे. किमान (चार) लेख तयार करणारे संपादक विकिपीडिया आशियाई महिना पोस्टकार्ड प्राप्त करतील.

आपल्याला स्वारस्य असल्यास, कृपया येथे साइन अप करा. जर तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कृपया चर्चापानास विचारा.

धन्यवाद!

विकिपीडिया आशियाई महिनाच्या वतीने टायवीन२२४० (आयोजक)

--टायवीन२२४०माझ्याशी बोला १५:३०, १ नोव्हेंबर २०१७ (IST)

मला धन्यवादाची सूचना आली आहे. कोणास कसे धन्यवाद द्यायचे?--प्रियंवदा (चर्चा) ०९:३८, २१ जानेवारी २०१८ (IST)

तसेच मी येथे टाकत असलेले लेख बरोबर आहेत काय ? कुणी तपासेल काय व मला तसे कळवाल काय? --प्रियंवदा (चर्चा) ०९:५३, २१ जानेवारी २०१८ (IST)

डॉक्टर रविद्र कोल्हे हे हेडिंग टाईप करतांना चूक झाली. त्याला कृपया कोणीतरी दुरुस्त करावे अशी मी विनंती करते. डॉक्टर रविंद्र कोल्हे असे करावे. मी जरा नवीन असल्यामुळे काही चूका घडतील त्यात मदत करा.--प्रियंवदा (चर्चा) १०:१६, २१ जानेवारी २०१८ (IST)

नमस्कार, मी धन्यवाद पाठवले होते.मी आपणास मदत करू शकतो.मला कृपया subodhkiran@gmail.com वर संपर्क करावा. अमरावतीला एक प्रशिक्षण नियोजित आहे. आपली मदत होऊ शकेल का?
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) २०:१२, २१ जानेवारी २०१८ (IST)

लेखाचे शीर्षक देताना फक्त नाव द्यावे.पदवी, संबोधन इ.देण्याचा संकेत नाही. दीर्घ-र्हस्व नीट पाहून अधिकृत नाव द्यावे. उदा.रवींद्र आहे की रविंद्र? स्मिता की स्मीता? शीर्षक संपादित करता येत नाही. लेखाचे योग्य शीर्षकाखाली स्थानांतरण केले जाते. आपण महत्वाचे लेख लिहित आहात, कमीतकमी ५-१० ओळींनी सुरुवात करावी.लिहित राहा...शुभेच्छा!
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) २०:१९, २१ जानेवारी २०१८ (IST)

आपल्या मदतीबद्दल आभार मानते.मी येथे शिकत आहे. कळेल सावकाशीने. सध्या मला अमरावतीबाहेर नौकरी लागली आहे. माझी मदत शक्य होणार नाही, माफ करा. नोकरी नवीन असल्याने लगेच सुट्टी मिळणार नाही. पुन्हा आभार--प्रियंवदा (चर्चा) २१:०७, २१ जानेवारी २०१८ (IST)

धन्यवाद पाठविणे[संपादन]

एखाद्या लेखावरील विशिष्ट संपादनास धन्यवाद द्यायचे तर, ते लेखपान उघडून त्यातील वरचे बाजूस असलेल्या 'इतिहास पहा' या कळीवर(टॅबवर) टिचका (क्लिक करा).त्याखाली 'निवडलेल्या आवृत्त्यांमधील बदल पहा' अशी कळ आहे. त्या कळीचे खालचे बाजूस, त्या पानातील कोणकोणत्या संपादनांनी तो लेख तयार झाला ते दिसते. अलीकडील संपादन सर्वात वर दिसेल. ज्या संपादनाने तो लेख निर्माण झाला ते सर्वात खाली.तेथे प्रत्येक संपादनाच्या कलमेनंतर (उलटवा | धन्यवाद) असा निळा दुवा दिसेल. त्यातील धन्यवाद या निळ्या दुव्यावर टिचका. टिचकल्यावर 'या संपादनासाठी सार्वजनिकरित्या धन्यवाद पाठवायचे काय?' असा प्रश्न विचारला जाईल. पुढे होय नाही या येणाऱ्या पर्यायावर टिचकायचे. बहुदा होय टिचकतात.

येथे वाचनालाही महत्त्व आहे. संपादक म्हणून येथील जडण-घडणीसाठी आवश्यक ते वाचन व माहिती हवी.त्याने अनेक संकल्पना स्पष्ट होतात. हवे असल्यास विकिवरील लेखांचे दुवे देता येतील. याबद्दल कळवावे ही विनंती.

आपल्यातर्फे या विकिवर असेच लेखन घडत राहो ही सदिच्छा व शुभेच्छा. --वि. नरसीकर , (चर्चा) १०:५२, २२ जानेवारी २०१८ (IST)