सदस्य चर्चा:क्षिप्रा टुमणे
स्वागत | क्षिप्रा टुमणे, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | क्षिप्रा टुमणे, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,५५३ लेख आहे व १४८ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
नजिकच्या काळापासून विकिपीडियावर दोन संपादन पद्धती उपलब्ध असतील यथादृश्यसंपादक तथा VisualEditor हि नवी संपादन पद्धती नुसतेच 'संपादन' म्हणवली जाईल. [[]] {{ }} सारख्या विकि-मार्कअप वाली संपादन पद्धती 'स्रोत संपादन' पद्धती म्हणवली जाईल. [[]] {{ }} सारख्या विकि-मार्कअप विषयी माहिती नसतानाही कुणीही सर्वसामान्य व्यक्ती सुलभतेने संपादन करू शकेल असा या यथादृश्यसंपादकाचा उद्देश आहे. 'दृश्य संपादन' कडून 'स्रोत संपादन' अथवा 'स्रोत संपादन' कडून दृश्य संपादकाकडे जाणे
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
सही!
[संपादन]नमस्कार क्षिप्रा!
वि.वा. शिरवाडकर यांच्यावरील लेखात तुम्ही पहिले संपादन केल्याचे पाहिले. चांगली माहिती भरून सुरुवात केलीत. :) आपल्याकडून सहभाग चालू राहील, अशी आशा आहे. काहीही मदत लागल्यास माझ्या चर्चापानावर मला संदेश सोडा किंवा सर्व जणांना उद्देशून लिहावयाचे असल्यास, विकिपीडिया:चावडी येथे लिहा.
धन्यवाद
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०३:३९, २३ फेब्रुवारी २०११ (UTC)
सदानंद रेगे
[संपादन]नमस्कार क्षिप्रा ! सदानंद रेगे या लेखात तुम्ही प्रकाशित साहित्याची माहिती टेबलाच्या स्वरूपात देऊ पाहात असाल, तर त्यासाठी तुम्ही संपादन चौकटीतील टूलबारातली सारणी (= टेबल) ही सुविधा वापरून बघा. चूक झाली, तरी काही हरकत नाही, तुम्हांला ती दुरुस्त करता येईलच. तसेच, जमल्यास पु.ल. देशपांडे, वि.वा. शिरवाडकर किंवा अन्य साहित्यिकांवरच्या लेखांमध्ये 'संपादन' टॅबांवर जाऊन सिंटॅक्स कसा वापरला आहे, ते निरखून बघा (अन्य मराठी साहित्यिकांविषयीचे लेख वर्ग:मराठी साहित्यिक या वर्गात किंवा त्याअंतर्गत असलेल्या उपवर्गांमध्ये सापडतील) ... थोडे निरीक्षण करून, अन्य लेख बघून तुम्हांला आपोआप गोष्टी लक्षात येत जातील. खेरीज सहाय्य:संपादन येथे सिंटॅक्साविषयी मदत उपलब्ध आहेच.
काही मदत लागल्यास, माझ्या चर्चापानावर व्यक्तिशः संदेश लिहू शकता, किंवा सार्वजनिक संदेशासाठी विकिपीडिया:चावडी येथे पोस्ट टाकू शकता.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:०८, २४ फेब्रुवारी २०११ (UTC)
नमस्कार क्षिप्रा,
आज तू केलेली संपादने बघितली.. सही! बाकी, आज श्रद्धा (मायबोलीकरीण आणि माझी पत्नी) हीदेखील संपादनेथॉनेत धावतेय. तिचे सदस्यपान इकडे आहे : सदस्य:Shraddhakotwal. आणिक एक मायबोलीकरणीने आज काही संपादने केली आहेत : सदस्य चर्चा:कामिनी केंभावी
चांगभलं!
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:५४, २६ फेब्रुवारी २०११ (UTC)
नमस्कार क्षिप्रा.
'समांतर जीवन' पुस्तकाबद्दल पुन्हा नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या मंगला गोडबोल्यांच्या 'सुनीताबाई' पुस्तकात पुन्हा बघितले. तर ते पुस्तक सुनीताबाईंनीच लिहिले आहे, असा त्यात स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे ते पुस्तक त्यांच्या पुस्तकांच्या यादीत पुन्हा जोडत आहे.
धन्यवाद.
धन्यवाद. - क्षिप्रा टुमणे ०४:२६, २७ फेब्रुवारी २०११ (UTC)क्षिप्रा
शुभेच्छा
[संपादन]नमस्कार,क्षिप्रा टुमणे,
मराठी भाषादिनी संपादने करून उत्साहाने सहभाग नोंदवलात, आपल्या आवडीच्या विषयात असेच लेखन घडत राहो हि शुभेच्छा.माहितगार १९:४८, २७ फेब्रुवारी २०११ (UTC)च्
मराठी साहित्यिकांविषयीचे लेख
[संपादन]नमस्कार क्षिप्रा!
तू मराठी सहित्यिकांविषयीच्या लेखांमध्ये माहितीची चांगली भर घालत आहेस, हे पाहून आनंद वाटला. किंबहुना तू साचा:माहितीचौकट साहित्यिक साचा काही लेखांमध्ये वापरलास, त्यावरून तू आता चांगली रुळली आहेस, असे वाटते. :)
बाकी, गेल्या आठवड्यात शाळा (कादंबरी) व पूर्वरंग या पुस्तकांवरील लेखांवर श्रद्धेने काम केले आहे, ते बघून तुलाही त्यात किंवा अन्य पुस्तकांवरील लेखांत भर घालता आल्यास बघ. काही मदत लागल्यास माझ्या चर्चापानावर संदेश लिही. (विकिपीडियावर सदस्य एकमेकांच्या चर्चापानांवर संदेश लिहून एकमेकांशी संवाद साधतात. खेरीज प्रत्येक लेखाच्या मुख्य पानासोबत त्या लेखाच्या चर्चापानाचाही टॅब वर दिसतो, त्या टॅबावर लेखाच्या अनुषंगाने सर्वांना चर्चा करता येते.).
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:१५, ५ मार्च २०११ (UTC)
- 'तेल नावाचा इतिहास' या पुस्तकाबद्दल जरूर लिही. त्यासाठी तू नवीन लेख बनवून त्यात माहिती भरू शकतेस. फॉरमॅटिंग वगैरे गोष्टींची फार धास्ती बाळगू नकोस, हळूहळू गोष्टी जमत, उमगत जातील. तोपर्यंत तू केलेल्या संपादनांनंतर कोणी ना कोणी त्यात सुधारणा करत राहतातच. गेल्या काही दिवसांमध्ये तू केलेल्या संपादनांमध्ये मी फॉरमॅटिंग आणि विकिदुवे देण्याच्या दृष्टीने सुधारणा केल्या आहेत; त्या बघ. आणि जमेल तेव्हा मी यापूर्वी दिलेल्या मदतपानांचे दुवे उघडून त्यावरील माहिती चाळून बघ.
- जमेल तशी माहिती भरत राहा; मी किंवा बाकी लोकही प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष मदत करत राहू. :)
- --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०४:१८, ६ मार्च २०११ (UTC)
पुस्तके
[संपादन]नमस्कार, आपण मराठी साहित्य आणि साह्त्यिकांबद्दल उत्साहाने लेखन करत आहात त्याबद्दल शुभेच्छा. आपण आपल्या आवडीच्याच विषयात लेखन करावे ,मी खाली केवळ आपल्या सुविधेकरिता एक दोन दुव्यांचा उल्लेख करत आहे.
- वर्ग:सर्वोत्कृष्ट पुस्तके (निवड: आकाशवाणी,मुंबई; ई. स. १९९७)
- अंतर्नाद दिवाळी अंकात प्रसिद्ध श्रेष्ठ मराठी पुस्तके यादी बाह्य दुवा
माहितगार ०६:५२, ६ मार्च २०११ (UTC)
नमस्कार क्षिप्रा टुमणे, आपण मराठी विकिपीडियावर लेखनाच्या केलेल्या प्रयत्नांकरिता अभिनंदन आणि धन्यवादही. आपली मराठी विकिपीडिया वर १० पेक्षा जास्त संपादने झाली आहेत. विकिपीडिया इतर वेबसाईट पासून भिन्न असून तो एक वस्तुनिष्ठ ज्ञानकोश आहे. आपण विकिपीडिया:नवीन सदस्यांना मार्गदर्शन का लेख पाहिलाच असेल. लेखनास जमेल तेवढे संदर्भ देणे अभिप्रेत असते. विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा आणि विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणाऱ्या सर्वसाधारण संपादन त्रुटी लेखांचा अभ्यास करावा. आपणास इतरही सहलेखक मार्गदर्शन करतीलच. आपल्या आवडीच्या विषयात असेच लेखन घडत राहो ही शुभेच्छा.