सदस्य चर्चा:उदयसिंह विलासराव पाटील
स्वागत | उदयसिंह विलासराव पाटील, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | उदयसिंह विलासराव पाटील, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,४८५ लेख आहे व १४५ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
जसेदृश्य संपादक तथा VisualEditor हा एक रिच-टेक्स्ट संपादनाची सोय करणारा मिडियाविकि विस्तारक आहे. [[]] {{ }} सारख्या विकिच्या मार्कअप विषयी माहिती नसतानाही कुणीही सर्वसामान्य व्यक्ती सुलभतेने संपादन करू शकेल असा या यथादृश्यसंपादकाचा उद्देश आहे. दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
श्री. विलासकाका पाटील उंडाळक जन्म : 15 जुलै 1938 प्राथमिक शिक्षण: जिल्हा लोकल बोर्ड, उंडाळे माध्यमिक शिक्षण: टिळक हायस्कूल, कराड कॉलेज शिक्षण: राजाराम कॉलेज, कोल्हापूर
राजकीय-सामाजिक कारकीर्द : जिल्हा परिषद सदस्य 1967 ते 1972 शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक (1967 ते 2021) अध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटी, सातारा सहकार चळवळ अभ्यासासाठी अमेरिका, इंग्लंड, जर्मन, फ्रान्स थायलंड दौरा
कराड दक्षिण मतदार संघाचे 1980 ते 2014 पर्यंत सलग 35 वर्ष आमदार दुग्धविकास, पशुसंवर्धनमंत्री 1991ते 1993 विधी, न्याय व पुनर्वसनमंत्री 1999 ते 2003 सहकार व वस्त्रोद्योगमंत्री 2003 ते 2004 महाराष्ट्र शासनाचा चीन अभ्यास दौरा 2008
महत्वकांक्षी उपक्रम 1975 पासून उंडाळे येथे स्वातंत्र्यसंग्राम सैनिक अधिवेशन समाज प्रबोधन मराठी साहित्य संमेलन देशातील पहिल्या नदीजोड प्रकल्पाची निर्मिती जलसिंचनाच्या माध्यमातून दक्षिण मांड सिंचन पॅटर्नची निर्मिती राज्यात मतदारसंघ विकासात अव्वल डोंगरी विकास निधी चे शिल्पकार
निवडणूका जिल्हा परिषद 1967 ते 1972 सातारा जिल्हा बँक 1968 ते 2021 लोकसभा 1979 तालुक्यातून 33 हजारांची आघाडी विधानसभा 1980 - 85 - 21 हजार मतांनी विजय विधानसभा 1985 - 90 - 14 हजार मतांनी विजयी विधानसभा 1990 -95 - 32 हजार मतांनी विजयी विधानसभा 1995 - 99 - 21 हजार मतांनी विजयी विधानसभा 1999 - 2004 - 23 हजार मतांनी विजयी विधानसभा 2004 - 2009 - 1 लाख मतांनी विजयी विधानसभा 2009 - 2014 - 15 हजार मतांनी विजयी
विकसित केलेल्या संस्था : 1. कोयना सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड, कराड 2. कराड तालुका सहकारी खरेदी - विक्री संघ लिमिटेड 3. शेती उत्पन्न बाजार समिती, कराड
स्थापन संस्था : 1. ग्रामीण विकास शिक्षण संस्था उंडाळे 2. स्वा. सै.शामराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, उंडाळे 3. कोयना सहकारी बँक लिमिटेड, कराड 4. रयत सहकारी साखर कारखाना लिमिटेड, शेवाळेवाडी
परिषदा : 1.धर्माध परिषद, मौजे तांबवे, ता.कराड 2. शैक्षणिक चिंतन परिषद, कराड 3. विज्ञान परिषद,कराड 4. डोंगरी परिषद,काळगाव ता. पाटण 5. घटना बचाव परिषद,कराड
महत्वकांशी उपक्रम 1) 1975 पासून उंडाळे येथे स्वातंत्र्यसैनिक अधिवेशन 2) समाज प्रबोधन साहित्य संमेलन 3) देशातील पहिला नदीजोड प्रकल्पाची निर्मिती 4) जलसिंचनाच्या माध्यमातून दक्षिण मांड सिंचन पॅटर्नची निर्मिती 5) राज्यात मतदारसंघ विकासात अव्वल 6) डोंगरी विकास निधीचे शिल्पकार
विधि मंडळामध्ये शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना राजीव फोर्सची स्थापना करून सरकार स्थिर राखले. 1967 सालापासून काँग्रेस पक्ष श्रेष्ठींचा आदेश अंतिम म्हणून आज अखेर निष्ठावान राहिले.
राजकीय प्रभाव क्षेत्र
कराड दक्षिण बरोबर सातारा जिल्ह्यातील कराड उत्तर व पाटण मतदार विधानसभा संघात राजकीय प्राबल्य असून उर्वरित जिल्ह्यातील मतदार संघातील मोठ्या प्रमाणात जनसंपर्क व लोकसंग्रह केला. 1 ) सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सन 1968 ते आज आखेर 50 वर्ष संचालक, काही काळ व्हाईस चेअरमन व 40 वर्षे एक हाती नेतृत्व त्या काळामध्ये 6 वेळा नाबार्ड पुरस्कार प्राप्त बँक 2) कराड तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि. कराड 3) कोयना सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघ लि. खोडशी 4) शेती उत्पन्न बाजार समिती कराड 5) स्वा. सैनिक शामराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था लि. उंडाळे ता. कराड 6) कोयना सहकारी बँक लिमिटेड कराड 7) रयत सहकारी साखर कारखाना लि.शेवाळेवाडी इ.संस्थावरती आजअखेर वर्चस्व राहिले.
शैक्षणिक क्षेत्रातील काम 1) मौजे उंडाळे ता. कराड येथे ग्रामीण भागातील मुलामुलींना शिक्षणाची सोय व्हावी म्हणून ग्रामीण विकास शिक्षण संस्थेची स्थापना. सिंचन व्यवस्था कराड दक्षिण विधान मतदार संघातील डोंगरी विभागात 20 वर्षापूर्वी नैसर्गिक पडणारे पावसाचे पाणी अडवून 2.5 टीएमसी पाणीसाठा केला.
देशातील पहिला नदीजोड प्रकल्प
सांगली जिल्ह्यातील वारणा नदीचे पाणी तीन डोंगर फोडून बोगदयावाटे दक्षिण मांड नदीच्या पात्रातून, सातारा जिल्ह्यातील कृष्णा नदीला मिळविले. त्यामुळे कराड दक्षिण विभागातील 2200 हेक्टर क्षेत्र बागायतीखाली आले.
दुष्काळी तालुक्यांना मदत
1 माण व खटाव तालुक्यातील जनावरांना दुष्काळामध्ये, चारा छावण्या, देऊन मदत केली. 2 माण, खटाव तालुक्यातील पावसाचे पडणारे पाणी, अडवण्यासाठी आमदार खंडातील 50 लाख रुपये एवढा फंड देणारे, एकमेव आमदार
वयाच्या 80 व्या वर्षी तरुणांना लाजवेल असा 18 तास प्रवास करून मतदार संघातील जनतेशी जनसंपर्क ठेवला.
राजकीय व सामाजिक कारकिर्दीस प्रारंभ करताना 1967 ला पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य म्हणून राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून निवडणूक लढवून विजयी झाले. त्यानंतर म्हणजे 1968 साली सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये संचालक म्हणून निवड झाली. त्यापासून आजअखेर सलग 50 वर्षे काका संचालक म्हणून काम पाहत राहिले. त्यामधील काही वर्ष उपाध्यक्ष व त्यानंतर अध्यक्ष म्हणून कारभार पाहिला. तसेच 40 वर्षे बँकेचे एकहाती नेतृत्व करून बँकेस नाबार्डचे 6 पुरस्कार प्राप्त करून देण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. 1972 ते 1978 अखेर सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलेले आहे. त्याच वेळी यशवंतराव चव्हाण (साहेब )कै. किसनवीर (आबा )यांच्या मुशीत काकांचे नेतृत्व तयार झाले. सन 1978 साली पहिल्यांदा यशवंतराव चव्हाण साहेबांनी कराड लोकसभा मतदार संघातून लोकसभेची उमेदवारी दिली. त्यावेळी लोकसभा मतदार संघाचा कार्यक्षेत्रातील कराड दक्षिण, कराड उत्तर, पाटण, महाबळेश्वर, जावळी या विधानसभा मतदार संघातून मताधिक्य मिळवत सातारा जिल्ह्यातील कराड लोकसभा मतदार संघातील तालुका मध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले. तथापि शिराळा व वाळवा तालुक्यामध्ये मताधिक्य कमी झाल्याने लोकसभेला काकांचा अल्पशा मतांनी पराभव झाला. परंतु लगेच 1980 साली झालेली विधानसभा निवडणूक लढवून ते प्रचंड मतांनी विजयी झाले. व खऱ्या अर्थाने मागासलेल्या डोंगरी भागातील विकास कामांची कोंडी फुटली व विकासाला चालना मिळाली. 1980 सालापासून ते सन 2014 पर्यंत सलग 35 वर्षे काकांनी कराड दक्षिण मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. साखर कारखानदार, सरजमदाई प्रवृत्ती अशा राजकीय बलाढ्य शक्तीच्या विरोधात सर्व सामान्य माणसाचे नेतृत्व म्हणून रयत संघटनेच्या माध्यमातून विकासाची चळवळ उभी केली. ज्या कार्यकर्त्यांना राजकीय गॉडफादर नाही, अशा कार्यकर्त्यांना संघटनेच्या ताकतीवर सत्तेच्या केंद्रस्थानी आणले.
कराड दक्षिण मतदार संघाचे 1980 पासून आमदार असताना त्यामध्ये 1991 ते 1993 या कालावधी मध्ये दूध विकास, पशुसंवर्धन मंत्री, सन 1999 - 2003 विधी, न्याय, पुनर्वसन मंत्री, 2003 - 2004 सहकार व वस्त्रोद्योग मंत्री अशी महत्त्वाचे खाती संभाळली व त्यांनी या कालावधीत लोकउपयोगी महत्त्वाचे कायदे, किंवा योजना राबविण्याच्या दृष्टीने शासनास निर्णय घेण्यास भाग पाडले. सहकार चळवळ अनुभवासाठी त्यांनी अमेरिका, इंग्लंड, जर्मन, फ्रान्स व थायलंड दौरा केला. त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनामार्फत चीनचा अभ्यास दौरा 2008 साली काकांनी केला.
सामाजिक क्षेत्रात काम करत असताना प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले. यामध्ये डोंगरी परिषद, जाती व धर्मांध परिषद, घटना बचाव परिषद, विज्ञान परिषद, व शैक्षणिक चिंतन इत्यादी परिषद घेऊन आयोजन करून त्या यशस्वी करून दाखविल्या तसेच आजअखेर सुद्धा समाज प्रबोधनाचे काम अखंडपणे करीत राहिले. त्याचप्रमाणे कराडला मराठी साहित्य संमेल्लन घेवून त्यांचे नीटनेटके नियोजन केले.
सन 1976 सालापासून काकांचे वडील स्वातंत्र्य सेनानी दादासाहेब उंडाळकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून गेली 42 वर्षे त्यांनी स्वातंत्र्य संग्राम सैनिक अधिवेशन उंडाळ्या सारख्या छोट्या खेड्यामध्ये भरविले. त्या माध्यमातून अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी पेन्शन, आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या. तसेच अधिवेशनामध्ये झालेल्या ठरावाची अंमलबजावणी शासन दरबारी पाठपुरावा करून खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य सैनिकांचे वारस म्हणून खंबीरपणे भूमिका बजावली. स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांना शासकीय नोकरीमध्ये सामावून घेण्याचा खऱ्या अर्थाने काकांनी प्रयत्न करून अनेकांची कुटुंबे उभी केली. तसेच त्याचबरोबर त्यांनी उंडाळे येथे समाज प्रबोधन साहित्य संमेल्लन, कवी संमेल्लन व विज्ञान मंच या माध्यमातून तरुण पिढीचे प्रबोधन करण्याचे महान कार्य केले.
महाराष्ट्र मध्ये विलासकाका यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदार संघामध्ये आपल्या कारकिर्दीत पावसाचे पडणारे पाणी जवळजवळ 2.5 टीएमसी एवढे अडवण्याचा प्रयत्न केला. व त्यामध्ये त्यांना यश आले. सिंचन व्यवस्थेबरोबर माणसांना आवश्यक असणाऱ्या भौतिक सुविधा त्यामध्ये रस्ते, वीज, शिक्षण, आरोग्य या सुविधा सुद्धा प्रत्येक गावांमध्ये नव्हे तर वाडी-वस्तीवर पोचविल्या त्याचप्रमाणे देशातील महत्वाकांक्षी असा नदीजोड प्रकल्प म्हणून वारणे चे पाणी कृष्णा नदीला मिळवण्याकरिता तीन डोंगर फोडून वाकुर्डी उपसा सिंचन योजना यशस्वी करून दाखविले. त्यामुळे कराड दक्षिण डोंगरी विभागातील 2200 (बावीसे ) हेक्टर शेतीला मुबलक पाणी मिळाले. जिथे कूसळ उगवत नव्हते तेथे मुसळा एवढा ऊस पिकू लागला, त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले. मुंबईचा माथाडी कामगार आपल्या गावी येऊन विविध पिकांचे उत्पादन घेवून आनंदी जीवन जगू लागला. अन त्यामुळे मुंबईकडे धावणारा लोकांचा लोंढा आपोआप थांबला.
रयत संघटनेतील सामान्य कार्यकर्त्यांचा व शेतकऱ्यांचा स्वाभिमान अबाधित राहावा. म्हणून त्यांच्या आडीअडचणींना पत पुरवठा करण्यासाठी त्यांनी स्वा. सैनिक शामराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था व कोयना सहकारी बँकेची स्थापना करून खऱ्या अर्थाने सामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे. डोंगरी विभागातील मुला-मुलींना शिक्षण सहज घेता यावे यासाठी त्यांनी ग्रामीण विकास शिक्षण संस्थेची स्थापना करून दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली.
शेती उत्पन्न बाजार समिती कराड ही काकांच्या नेतृत्वाखाली आलेनंतर त्यामध्ये काकांनी भविष्याचा विचार करता शामराव पाटील फळे, फुले, भाजी मार्केटची जागा 15.60 हेक्टर घेवून त्यामध्ये अदयावत असा बैलबाजार व भाजीपाला मार्केट उभे केले. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत शेतकऱ्यांना नवनवीन प्रयोग करण्यासाठी व शेतीमध्ये उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने कै. यशवंतराव चव्हाण साहेब यांचे नावाने राष्ट्रीय स्तरावरील कृषी व पशुपक्षी प्रदर्शन गेली 15 वर्षे काकांच्या मार्गदर्शनाखाली भरवली जात आहे.
त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी कराड दक्षिणच्या पश्चिमेकडील डोंगर विभागात रयत सहकारी साखर कारखान्याची निर्मिती केली. त्याचप्रमाणे गेली 40 वर्षे कराड खरेदी-विक्री संघाची एकहाती नेतृत्व करून संघ महाराष्ट्रात 1 नंबर वर ठेवला. त्याच बरोबर शेतीपूरक दुग्ध व्यवसायाला चालना मिळावी म्हणून काकांनी सहकारी तत्वावरील कोयना दूध संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पादित दुधाला योग्य भाव देवून त्याच्यामध्ये आर्थिक क्रांती घडवून आणली. आणि सातारा जिल्ह्यामध्ये सहकारी तत्त्वावरती कोयना दूध संघ आपल्या कडक शिस्तीच्या आणि योग्य नियोजनाने आजही महाराष्ट्रामध्ये कोयना दूध संघ अग्रेसर ठेवलेला आ हे.
महाराष्ट्र विधानसभेतील काका हे एकमेव आमदार आहेत. की त्यांनी आपल्या स्वतः चा आमदार फंडातील 50,00,000/- ( पन्नास लाख फक्त ) माण, खटाव सारख्या दुष्काळी तालुक्यांना 'पाणी आडवा पाणी जिरवा' या योजनेसाठी दिले आणि अवघ्या महाराष्ट्रामध्ये एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे .
कराड दक्षिण मतदार संघ राज्याच्या विकासाला नव्या संकल्प संकल्पना देणारा विकासाचा आयडॉल
शासनाच्या विकास योजनांच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकाचा विकास व्हावा, या उद्देशाने पंडित नेहरू यांच्यापासून इंदिरा गांधी, स्व. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्या पर्यंतच्या राजकारण्यांनी विविध योजना राबवल्या. विकास योजना बनवल्या, अशा प्रकारच्या सर्व विकास योजनांची राबवनूक विलासकाकांनी मतदारसंघात करून राज्यापुढे विकासाचा आदर्श उभा केला. सर्वसामान्य माणसाचा विकास साधताना त्यांच्या अडचणींची सोडवणूक करण्यासाठी काही नव्या विकास योजनांची संकल्पना मांडली. या योजनांची मतदारसंघात राबवणूक करून राज्याच्या विकासाला गती दिली. कराड दक्षिणेतील विकासाबरोबर लोकप्रतिनिधी म्हणून विलासकाकांनी राज्यात वेगळा ठसा उमटवला.
विलास काका 1967 साली जिल्हा परिषद, सातारा जिल्हा बँकेच्या माध्यमातून राजकारण, समाजकारणात सक्रिय झाले. स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय असलेल्या घराण्याचा वारसा, स्व. यशवंतराव चव्हाण, किसनवीरांच्या मार्गदर्शनाखाली विलासकाकांनी राजकारण व सहकाराची मुहूर्तमेढ रोवली .1980 साली ते प्रथम विधानसभेवर निवडून गेले. साखर कारखानदारी, राजकीय बलाढ्य शक्तीविरोधात सर्वसामान्य माणसांचे नेतृत्व म्हणून 'रयत संघटनेच्या' माध्यमातून विकासाची चळवळ त्यांनी उभी केली. गावा गावातील सामान्य कार्यकर्त्यांचे संघटन करून 'विकास मावळ्यांचे' मतदारसंघात जाळे विणले. ज्या कार्यकर्त्यांना गॉडफादर नाही अशा कार्यकर्त्यांना संघटनेच्या ताकदीवर सत्तेच्या केंद्रस्थानी आणले. भल्याभल्यांचा पराभव करून सलग 6 वेळा विधानसभेत निवडून जाणारे ते एकमेव आमदार ठरले आहेत. स्वकर्तुत्वावर राज्याच्या राजकारणात त्यांनी दबदबा निर्माण केला. अनेक बड्या राजकारण्यांनी त्यांचा धसका घेऊन जनाधार असतानाही त्यांना राज्याच्या सत्तेबाहेरच ठेवले. मात्र सत्ता असो वा नसो मतदारसंघाच्या विकासाचा ध्याय घेऊन सरकारची तिजोरी सातत्याने मतदार संघाकडे वळवली. आपला सामान्य माणूस सुधारला पाहिजे ही सततची त्यांची धडपड राहिली.अनेक विकास योजनांचे ते शिल्पकार ठरले.राजकीय चारित्र्य स्वच्छ ठेवत स्वतःला समाजहितासाठी वाहून घेतले. आज विलासकाकांच्या त्यागाची, कल्पक नेतृत्वाची फळे येथील जनता चाखते आहे. त्याचे साक्षीदार आमदार म्हणून विलासकाकाच आहेत. यांचा अभिमान येथील जनतेला आहे.
राजकीय कारकिर्दीत पद, प्रतिष्ठा याला महत्त्व न देता, जिथे उभे राहतील तिथे समृद्धी साधण्याचा प्रयत्न त्यांनी केला. कार्यकर्त्यांच्या घरांमध्ये त्यांच्या घोंगड्यावर बसून मिळेल ती चटणी भाकरी खाऊन विकासाची चर्चा करणारे एकमेव आमदार म्हणून वेगळी ओळख निर्माण केली.पी.ए. नाही. खिशाला पेन, मोबाईल नाही. अशा परिस्थितीत दांडगा जनसंपर्क त्यांनी साधला आहे. अशा या विकास नेतृत्वाच्या नव्या पिढीने आदर्श घ्यावा. त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावे.
आमदार फंड सन 2005 - 2010 1) प्राथमिक शाळा खोल्या 102 गावांसाठी 1.75 कोटी निधी 2) सामाजिक सभागृहे 42 गावांसाठी 1.60 कोटी निधी 3) विशेष दुरुस्ती रस्ता 66 गावासाठी 2.76 कोटी निधी 4) पुरहानी योजनेतून रस्ते 138 गावांसाठी 1.80 कोटी निधी 5) वैद्यकीय व पशुवैद्यकीय विकाससाठी 31 गावांमध्ये 1. 70 कोटी निधी 6) चावडी व्यायामशाळा /व्यासपीठ यांच्यासाठी 17 गावामध्ये 0.51 कोटी 7) समशानभूमी, दफनभूमी इत्यादीसाठी 54 गावांमध्ये 1.05 कोटी निधी 8) गावांतर्गत रस्ते सुधार योजना 11 गावामध्ये 0.40 कोटी निधी
एकूण 461 गावांमध्ये 11.57 कोटी निधी
राज्याच्या विकासाला नव्या संकल्पना देणारा दक्षिण कराडचा विकास
विकासाला सीमा नसतात, मर्यादा नसतात मात्र विकासातून घडतो तो सामान्य माणूस. याची प्रचिती देणारा विकास कराड दक्षिण मतदारसंघात साधला आहे येथील लोकप्रतिनिधी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या कल्पक व दूरदृष्टीच्या नेतृत्वातुन सर्वांगीण विकासाच्या योजनांना कराड दक्षिण मतदार संघाने जन्म दिला आहे. सर्वसामान्य माणसांच्या विकासाशी निगडित असणाऱ्या या योजनांचे जन्मदातेही दुसरे तिसरे कोणी नसून, विलास काकाच आहेत. सलग 30 वर्षे विधानसभेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विलासकाकांनी प्रत्येक पंचवार्षिक मध्ये राज्यातील 288 आमदारांमध्ये विकास कामात सातत्याने वरचा क्रमांक कायम ठेवला आहे. प्रत्येक आमदारास 80 लाख ते 1 कोटी रुपयांचा आमदार फंड मिळतो. मात्र कराड दक्षिणेत तब्बल 10 कोटींचा विकास निधी आमदार फंडातून खर्ची पडलेला दिसतो. एक आमदार 10 आमदारांचा विकास निधी मतदार संघात आणत असताना यामध्ये शासकीय सर्व योजनाचा सहभाग आलेला आहे.
2009 मध्ये मतदार संघांच्या विकासावर दृष्टिक्षेप टाकला तर मतदारसंघात लोकांना आमदारांना मागण्यासारखे विकासाचे काम शिल्लकच राहिले नाही. रस्ते, सिंचन, शिक्षण, आरोग्य, पर्यटन यासह सर्व पातळ्यांवर येथील विकास राज्याला आदर्शवत आहे. 1980 पूर्वी या मतदारसंघात थेट उलटी परिस्थिती होती. रस्ते नाही, पाणी नाही, आरोग्य नाही, शिक्षणाचे बात तर दूरच होती. आदिवासी सारखे जिणे इथले लोक जगत होते. सर्व क्षेत्रांमध्ये पिछाडीवर असलेल्या या मतदारसघाची विकासाची दारे उघडली ती 1980 साली आमदार विलासकाकांच्या नेतृत्वामुळे .काका आले अन विकासाची कोंडी फुटली.
आ. विलासकाकांनी विकासकामे राबवताना जनतेचे हित लक्षात घेऊन अनेक वेळा शासकीय नियम धाब्यावर बसवले. वेळप्रसंगी शासनाच्या विकास तरतुदीमध्ये ही सरकारला बदल करायला लावले. डोंगरी विकासनिधीच्या संकल्पने बरोबर समशानभूमी निधी, पूरग्रस्त गावांना बोटीसाठी आमदार निधी अशा नव्या संकल्पना मांडल्या . मतदारसंघात तांबवे, शेरे, दुशेरे, खुबी आदी पूरग्रस्त गावांना राज्यात प्रथम आमदार फंडातून बोटी दिल्या आहेत.
कृष्णाघाट कराड दक्षिण मतदार संघाचा विकास साधताना जनतेच्या प्रत्येक सुविधेच्या दृष्टीने विकासकामे राबवून आमदार विलासकाकांनी विकास कामांच्या नव्या संकल्पना समाजासमोर आणल्या. याच विकाससंकल्पनेतून त्यांनी मतदार संघातील जनतेला जास्तीत जास्त सुविधा देवून त्यांचे जीवनमान उंचावले आहे. कृष्णाकाठच्या जनतेचा व कृष्णा नदीचा नित्याचा संबंध आहे. यामुळे नदीवर ग्रामस्थ,महिला यांची सततची वर्दळ असते. मात्र पावसाळ्यात चिखलामुळे नदीवर जाणे अत्यंत अवघड होते. यामुळे लोकांची मोठी गैरसोय व्हायची.कोणताही धार्मिक कार्यक्रम असो, नदीकाठावर पूजा, धार्मिक विधीसाठी गर्दी व्हायची. समशान भूमीही कृष्णाकाठावरच असल्याने जन्मापासून मृत्यूपर्यंत येथील जनतेचा कृष्णा नदीशी संबंध आहे. येथील जनतेच्या समस्या लक्षात घेऊन विलासकाकांनी कृष्णाकाठच्या गावात 'कृष्णा घाटा' ची संकल्पना राबवून मूलभूत सुविधाइतकी महत्त्वपूर्ण गरज भागवली. कृष्णाकाठच्या रेठरे बुद्रुक कार्वे शेरे गोंदी दुशेरे मालखेड कोडोली अटके पाचवड गोळेश्वर रेठरे खुर्द खुबी व कोयना काठच्या तांबवे गावी कृष्णघाट बांधून येथील ग्रामस्थांना महत्वाच्या सुविधा निर्माण केल्या. हे घाट गावाच्या सौंदर्यात भर टाकणारे ठरले. रेठरे बुद्रुक कृष्णा घाटाला 'कै. आबासाहेब मोहिते कृष्णा घाट' असे नामकरण करून स्थानिक जनतेच्या भावना जोपासल्या. कृष्णा घाटाने पाचवडेश्वर पर्यटनस्थळाच्या सौंदर्यात भर घातली आहे. येथे येणाऱ्या भाविकांची ही चांगल्याप्रकारे सोय झाली आहे. कृष्णा घाटाच्या संकल्पनेमुळे कृष्णाकाठच्या गावाची वर्षानुवर्षेची समस्या मिटल्याने लोकप्रतिनिधींना येथील जनता धन्यवाद देत आहे.
यामुळे खऱ्या अर्थाने मूलभूत विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या डोंगरी भागाच्या महात्मा गांधी, स्व. यशवंतराव चव्हाण, थोर स्वातंत्र्यसेनानी दादा उंडाळकर यांच्या विकासाची प्रेरणा या विकासापाठीमागे आहे. खेड्यातला माणूस सुधारला पाहिजे यासाठी शासनाच्या अनेक योजना विलासकाकांनी राबवल्या. लोकांच्या गरजा लक्षात घेऊन नव्या योजनांची संकल्पना मांडून त्यांचे पहिले प्रयोग कराड दक्षिण मतदार संघात राबवले. इंदिरा गांधीजींचा मूलभूत विकासाचा 20 कलमी कार्यक्रम राबवणार व राज्यापुढे विकासाचा आदर्श ठेवणारा मतदारसंघ म्हणून कराड दक्षिण नावारूपास आला आहे. डोंगरी विकास , समशानभूमी सुधारणा, पूरग्रस्त गावांना बोटी, गावांतर्गत रस्ता सुधार योजना या योजनांचा पहिल्यांदा पाठपुरावा विलासकाकांनी विधानभवनात करून त्यांना मंजुऱ्याही आणल्या . आमदार फंडाचा वापर करताना त्यांनी कटाक्षाने गावाचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवला. समाजमंदिरे, समशानभूमी, शाळा खोल्या, सार्वजनिक व्यासपीठ, रस्ते, व्यायाम शाळा, ग्रंथालये पिण्याच्या पाण्याची योजना या प्रकारच्या सुविधा प्राधान्याने मतदारसंघाला दिल्या. बहुविकासाचा कराड दक्षिण पॅटर्न निर्माण करून डोंगरी जनतेला खऱ्या अर्थाने विकासाचे स्वातंत्र्य मिळवून दिले. राजकारण निवडणुकीपुरते ठेवून समाजकारण केले. 'आमदार' ही शोभेची वस्तू नसून ते विकासाचे मॉडेल आहे. हे त्यांनी विकासकर्तृत्वातून सिद्ध केले. विकास आणि सामान्य माणूस या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, याची पुरेपूर जाणीव विलासकाकांनी ठेवून हे गाव माझ्या पाठीशी आहे, दुसरे नाही, असा कोणताही भेदभाव न ठेवता धनगरवाडा ते रेठरे पर्यंत समतोल विकास साधला. यामुळे कराड दक्षिणेतील जनतेसाठी विलास काकांचे नेतृत्व एक विकास वृक्षच ठरले आहे.
श्रीमती सोनिया गांधी यांची ऐतिहासिक सभा
1999 च्या विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीकडून संपूर्ण काँग्रेस भुईसपाट झाली. जिल्ह्यातील दोन लोकसभा व दहा विधानसभा मतदार संघांपैकी फक्त एकट्या कराड दक्षिण मतदार संघात काँग्रेसची विजयी पताका विलासकाकांनी कायम ठेवली. काँग्रेसने काकांना दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्रिपद बहाल केले. सातारा जिल्ह्यात सर्वत्र राष्ट्रवादीमय वातावरण असताना श्रीमती सोनिया गांधीची जाहीर सभा आव्हान होते. विलासकाकांनी ते आव्हान स्वीकारले. 19 ऑक्टोबर 2003 रोजी कराडच्या शिवाजी स्टेडियमवर श्रीमती सोनिया गांधी यांच्या जाहीर सभेचे आयोजन केले. स्टेडियमची क्षमता 1 लाख लोकांची आहे. त्यातच सोनिया गांधी खटाव, कडेगाव दौरा करून कराडच्या जाहीर सभेला येणार होत्या. यामुळे लोक जमविण्याचे मोठे आव्हान होते. अशा परिस्थितीतही सोनिया गांधींच्या सभेसाठी स्टेडियमच्या आवारात क्षमतेपेक्षा जास्त लोक जमले. यामुळे विलासकाकांच्या जनधारांची प्रचिती राज्याच्या व केंद्राच्या नेत्यांना आली. या सभेस शिवराज पाटील, सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, रणजित देशमुख पृथ्वीराज चव्हाण यांची उपस्थिती होती. सभेत भाषणास प्रारंभ करताना प्रोटोकॉल डावलून सोनिया गांधींनी संयोजक आमदार विलासकाका यांचे नाव घेऊन सभेच्या नियोजनाबद्दल कौतुक करताच उपस्थित लाखोंच्या जनसमुदायाने टाळ्यांचा कडकडाट केला.
राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचा उंडाळे
उंडाळे येथे 1975 पासून विलासकाका राज्यस्तरीय स्वातंत्र्यसंग्राम अधिवेशनाचे आयोजन करतात. या व्यासपीठावर देशभरातील स्वातंत्र्यसेनानी व राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले आहेत. या व्यासपीठावर देशातील सर्वोच्च व्यक्तीला आणण्याची काकांची इच्छा होती. 2009 च्या अधिवेशनास अनेक अडचणीवर मात करत राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना उंडाळेसारख्या ग्रामीण भागात आणले. 19 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 ते 1 असा हा कार्यक्रम झाला. भागातील 25 हजार शेतकरी महिलांच्या समुदायाने हा सोहळा पाहिला. यावेळी राष्ट्रपतींनी स्वातंत्र्यसेनानी दादा उंडाळकर यांच्या नेतृत्वाखाली 24 ऑगस्ट 1942 रोजी निघालेल्या मोर्चाच्या आठवणींना उजाळा दिला. विलासकाकांनी आयोजित केलेला स्वातंत्र्य सैनिकांचा मेळावा जागतिक अडचणीच्या परिस्थितीत भारताला दीपस्तंभ बनविण्यासाठी मार्गदर्शक बनेल, असे गौरवोद्गार काढून काकांना धन्यवाद दिले.
शैक्षणिक चिंतन परिषद
विलासकाकांच्या पुढाकारातून कराड येथे 31 मे ते 1 जून 2003 या काळाचे शैक्षणिक चिंतन परिषद संपन्न झाली. या परिषदेचे उद्घाटन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉक्टर मु.गो. ताकवले, पुणे विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉक्टर अशोक केळकर, संगणक तज्ञ डॉक्टर विजय भटकर, प्राचार्य पी. बी.पाटील, डॉक्टर स्नेहलता देशमुख, आचार्य वामनराव अभ्यकर प्राचार्य सौ. मीना चंदावरकर आदी मान्यवरांनी शिक्षणाविषयी आपले विचार व्यक्त करून पुढच्या शिक्षणाची दिशा स्पष्ट केली. या परिषदेचा लाभ तालुक्यातील 16 हजार विद्यार्थी, 200 विज्ञान शिक्षकांसह हजारो लोकांनी घेतला. परिषदेच्या यशस्वीतेसाठी स्वा. दादा उंडाळकर स्मारक समिती, गोखले एज्युकेशन सोसायटी, शिक्षण मंडळ कराड यांनी प्रयत्न केले.
माझ्या राजकीय कारकिर्दीत अनेक थोर स्वातंत्र्य सेनानी, नेते, विचारवंत, शास्त्रज्ञ , साहित्यिक यांचा सहवास लाभला. सामान्य माणूस प्रगल्भ करण्यासाठी या मान्यवरांचा आपण उपयोग करून घेतला. विकासाला विज्ञान युगाची जोड हवी यासाठी माशेलकर, गोवारीकर, निगवेकर यासारख्या शास्त्रज्ञांना आणले. शिक्षण परिषद, वकील परिषद, साहित्य संमेलन, कृषी प्रदर्शन या माध्यमातून समाज घडविण्याचे काम केले. माणसे खोटे बोलू शकतात आकडे नाही आमदार विलासकाका यांनी गेल्या अनेक वर्षांपासून विकास कामांची परंपरा अथकपणे चालूच ठेवली आहे. या विकास कामांची संख्या इतकी आहे की त्याची मोजदाद करणेही अशक्य आहे. मात्र केवळ उदाहरण म्हणून गेल्या 5 वर्षाचा आढावा पहिल्यास गेल्या 5 वर्षात स्थानिक विकास निधीतून 2 कोटी 76 लाख,पुरहानीतून 1 कोटी 79 लाख, केंद्रीय रस्ते विकास निधीतून 22 कोटी 85 लाख, नाबार्ड योजनेतून 26 कोटी 10 लाख व अर्थसंकल्पीय बजेटमधून 35 कोटी, गौण खजिन व डोंगरी विकास व इतर निधीतून 2 कोटी असे एकूण रस्ते उभारणीकरीता 100 कोटी रुपये मतदारसंघात आणले आहेत.
सह्याद्रीच्या पाऊलवाटा बनल्या हमरस्ते
कराड दक्षिण मतदार संघ हा एककाळी डोंगरी, दुर्गम व मागासलेला म्हणून ओळखला जात होता. आज हाच मतदार संघ राज्यातील एक आदर्श मतदार संघ म्हणून नावारूपाला येत आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी विविध वाडी-वस्त्यात विभागलेल्या गावांना जायचे तर फक्त पायवाटानीच. भौगोलिक प्रतिकुलतेमुळे एकेकाळी हा भाग आदिवासी जीवन जगत होता. मात्र या प्रतिकूलतेवर मात करून माणसांच्या जीवनात आर्थिक, सामाजिक क्रांती करण्याचे महान कार्य येथील आमदार विलासराव पाटील उंडाळकर यांनी केले आहे. सलग 30 वर्षे झपाटल्यासारखे काम करून त्यांनी प्रत्येक गाव, वाडी वस्ती पक्क्या रस्त्याने जोडली आहे. त्यामुळे गेली अनेक दशके असलेले रस्ते विकासाची कोंडी आज त्यांच्या प्रयत्नामुळे फुटली आहे. त्यांच्या अथक परिश्रम व प्रयत्नामुळे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ राज्यातील एक आदर्श मतदार संघ म्हणून पुढे आहे.
कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील पश्चिमेकडचा भाग म्हणजे डोंगराळ आणि मागास म्हणूनच नदीकाठच्या लोकांना हिनवला होता.त्याच भागातून आमदार विलासराव पाटील यांच्या रूपात नव्या नेतृत्वाचे राजकारण आणि समाजकारणात प्रवेश केला. 'परिसाच्या स्पर्शाने जसे लोखंडाचे सोने व्हावे' अगदी तसे या भागाचे रूप बदलू लागले. ज्या रस्त्याने गाढवाने सुद्धा वाहतूक करणे तारेवरची कसरत असायची त्याच रस्त्याने आज शेकडो वाहने ये-जा करीत आहेत .
सह्याद्री पर्वताच्या प्रत्येक दऱ्याखोऱ्यात मतदार संघ विभागलेला आहे. यातील प्रत्येक गावाला जायचं तर 'वाई वरून सातारा' अशी परिस्थिती होती.तीन ते चार खोऱ्यात विभागलेल्या वाडी वस्त्यांना एकमेकांशी पक्क्या रस्त्यानी जोडणे हे उंडाळकरा आव्हान होते. ते आव्हान त्यांनी आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर पेलले. मग ते येळगाव - गुढे रस्त्याचे असो अथवा जिंती - साळशिरंबे उंडाळे - कोळेवाडी अंबवडे - मार्गे तांबवे - साकुर्डी या रस्त्यांचे असो. असो डोंगर फोडून केलेले दोनच रस्ते त्यांच्या डोंगरा एवढ्या कार्याची प्रचिती देतात.कुंभारगाव येवती - ओंड रस्ता आणि काळगाव खोऱ्यातील 100 हून कमी लोकसंख्या असलेल्या गावात साठी काढलेले कोट्यवधी रुपये खर्चाचे रस्ते, आज त्यांच्यातील विकासाभिमुख नेतृत्व गुणांची साक्ष पटविणारे आहेत. ज्या दर्या-खोर्यातून पावसाळ्यात आजारी माणसाला पालखीत घालून दवाखान्यात नेले जात होते, त्या सह्याद्रीतील गावांना कायमस्वरूपी पक्क्या रस्त्याने काकांनी जोडले आहे.त्यांनी नद्या वर उभारलेले पूल म्हणजे काही कोट्यवधीची कामे आहेत. प्रत्येक कामात दूरदृष्टी ठेवून व टक्केवारीला फाटा देत अति उच्च दर्जाचे त्यांनी कामे करून घेतली आहेत. त्यामुळे सह्याद्री पावसाचे प्रमाण सर्वाधिक असूनही येथील रस्ते दृष्ट लागण्या सारखे वाटतात.
देशाच्या कानाकोपऱ्यात येणारे अनेक मान्यवर आजही या मतदार संघातील उत्कृष्ट रस्त्यांचे जाळे पाहून अचंबित होतात. दहा वीस वर्षांपूर्वी ज्या पाऊलवाटा होत्या त्या आज हमरस्त्यात बदलण्यात काकांना आलेले यश पाहिले म्हणजे विरोधकांनाही सुचेनासे होते.त्यामुळे अनेकदा व्यासपीठावरून विरोधात बोलणारे विरोधक खाजगीत काकांच्या नेतृत्व कुणाबरोबरच त्यांनी केलेले काम मान्य करतात. मतदारसंघातील बाजारपेठा व व्यापारी पेठा असलेली गावे पाहता या गावांना चोफेर रस्ते आहेत. शिवाय उपसा सिंचन प्रकल्प झालेल्या प्रत्येक गावातील शेतातून शेतीमालाची वाहतूक व्यवस्थित होण्यासाठी कच्च्या रस्त्यांचे जाळे विणले आहे.
प्रामुख्याने नदीकाठावरील गावातून उत्पादित होणारा शेतीमाल रस्ते अभावी शेतात कुजून जाऊ नये या करिता शेती अंतर्गत कच्चे रस्ते उभारण्यात काकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. मतदार संघातील शेवटचे गाव हे शेवटचे न राहता ते मध्यवर्ती कसे बनेल, याकरिता एका - एका गावाला अनेक रस्त्यांनी जोडून रस्ते विकासाचे जाळे तयार केले आहे. सामान्य शेतकऱ्याची सोय पाहून कोणत्या कामाला प्राधान्य द्यायचे, याचा इतका दूरदृष्टीने विचार करणारा काकान सारखा दुसरा नेता अभावानेच दिसेल. सह्याद्रीच्या डोंगर रांगामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत होते. या भागात रस्ते करणे म्हणजे डोंगर फोडयाशिवाय दुसरा पर्याय नव्हता. काकांनी हे आव्हान स्वीकारले आणि ते यशस्वीरीत्या पेलूनही दाखवले,. त्यामुळे सह्याद्रीत वसलेली आज प्रत्येक वाडी-वस्ती पक्क्या रस्त्याने जोडली आहे. त्यामुळे रस्ते विकासाचे नवे मॉडेल म्हणून कराड दक्षिण मतदार संघाकडे बघितली जाते. भौगोलिक प्रतिकूलता असतानाही केवळ आपल्या राजकीय इच्छाशक्तीवर प्रत्येक गावाला नवे परिमाण बहाल केली आहे. त्याचे हे काम पाहण्यासाठी अनेक दिग्गज त्यांच्या मतदार संघाचा आवर्जून दौरा करतात. त्या दौऱ्यात त्यांनी केलेल्या कामाचे तोंड भरून कौतुक असतेच पण त्यांच्या कार्याचा आदर्शही ते स्वतः बरोबर घेऊन जातात. मग एकूणच शेकडो मैलाचे रस्ते करून माणसांनी मनी जोडणाऱ्या आमदार पाटील यांचे कार्य शब्दात न सामावणारे आहे. हाकेच्या अंतरावर असूनही रस्ते नसल्याने एकमेकापासून दूर असणारी गावे रस्त्यांच्या उभारणीने एकसंघ करणारे विलासकाका खऱ्या अर्थाने गाव गावांना जोडणाऱ्या रस्त्यावरचा अतूट साकव आहेत.
"मतदार संघातील प्रमुख गावे विलासकाकांनी अथक प्रयत्न व शासनाचा मोठा निधी खर्चून चौफेर रस्त्यांनी जोडली आहेत. याचा सर्वाधिक फायदा काले, शेरे गावाला झाला आहे. विस्ताराने मोठे असणाऱ्या या गावांच्या शेतातील सर्व वस्त्यांना रस्त्यांची सुविधा मिळाली आहे. या बरोबर शेतात पिकणारा माल बाजारपेठत नेण्यासाठी हे रस्ते उपयुक्त ठरले आहेत. अशा प्रकारे मतदार संघातील प्रमुख गावांनाही चौफेर रस्ते आहेत. शरीरातील रक्तवाहिन्या प्रमाणे दक्षिण कराडच्या विकासाचे 'रस्ते' हे रक्तवाहिन्याच ठरल्या आहेत."
पावसाळा आला की, कृष्णा व कोयना काठच्या तांबवे,शेरे,खुबी, दुशेरे गावांमध्ये पुराची दहशत निर्माण व्हायची. पूर आला की संपूर्ण गावाला पाण्याचा वेढा बसायचा. जीव मुठीत घेऊन या काळात लोक जीवन जगायचे. ही पूर्ण परिस्थिती काकांनी बदलली. या गावांना पुरकाळात संरक्षणासाठी बोटी दिल्या. प्रत्येक गावासाठी पूर परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून विशेष रस्ते निर्माण केले आहेत. ही गावे आता पूर्वकाळातील चिंतामुक्त झाले आहेत.
रस्ते विकास निधी 2004 ते 2009
केंद्रीय रस्ते विकास निधीसाठी 23 कोटी निधी नाबार्ड साठी 26 कोटी स्थानिक विकास निधी साठी 3 कोटी इतर विकास निधीसाठी 11 कोटी पुरहानी निधी 2 कोटी अर्थसंकल्प बजेट 35 कोटी एकूण 100 कोटी
महिला सबलीकरण
समाजातील प्रत्येक घटकांच्या सुधारणेसाठी विलासकाकांनी प्रयत्न केले आहेत. मतदारसंघातील महिलांना सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत. शिक्षणाबरोबर महिला सबल झाली पाहिजे यासाठी त्यांनी गाव तिथे आरोग्य, शाळा, रस्ते, शुद्ध पाणी पोचवून महिलांचे कष्टप्राय जीवन सुखी करण्याचा प्रयत्न केला. शेती बरोबर दुग्ध व्यवसाय वाढला पाहिजे. याशिवाय महिलांच्या हातात पैसा येणार नाही. हे लक्षात घेऊन सातारा बँक, कोयना दूध संघाच्या माध्यमातून मतदारसंघात दुधाची क्रांती केली. महिलांचे बचत गट, त्यासाठी कर्ज पुरवठा याबरोबर महिला मेळाव्याच्या माध्यमातून प्रबोधन करून मतदारसंघातील महिलांना सन्मानाचे स्थान मिळवून दिले आहे. आज येथील महिला आदर्श गृहिणी, शेती बरोबर विविध व्यवसाय, राजकारण, शासकीय अधिकारी पदाबरोबर अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली, राष्ट्रपती भवनात जाऊन पोचल्या आहेत.
आरोग्याची विकास संजीवनी
शुद्ध आणि स्वच्छ पाणी असेल तर तेथील जनतेचे आरोग्य निरोगी राहते.ही बाब लक्षात घेवून आ. विलासकाकांनी डोंगरी भागातील वाडीवस्तीवर स्वच्छ पाणी पोहोचवले.पाणी महत्वाची गरज असली तरी आरोग्याच्या दृष्टीने याला वेगळेच महत्व आहे.त्यामुळे काकांनी स्वच्छ व शुद्ध पाण्याला प्राधान्य दिले. गाव तिथे विहीर - बोरवेल, नळपाणी पुरवठा योजना कृष्णाकाठी जलशुद्धीकरण प्रकल्प राबवून जनतेला पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा केला. 20 कोटी उंडाळे सह 17 गावे नळ पाणी पुरवठा योजना, कोडोली ची 1 कोटीची नळ पाणी पुरवठा योजना याबरोबरच कोट्यवधी रुपयांचा पाणीपुरवठा योजनां वरील खर्च पाहता मतदार संघातील जनतेला शुध्द पाण्याचा पुरवठा करून आरोग्याची देणगीच त्यांनी दिली. पूर्वी नारु, गॅस्ट्रो यासह या साथीच्या आजारांमुळे समाज त्रस्त होता. आता शुद्ध पाणीपुरवठा होत असल्यामुळे समाजात आरोग्य नांदते आहे. येथील जनतेला तत्काळ वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी काले,येवती, रेठरे, कोळे, सुपने, तळमावले (पाटण), उंडाळे या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रांची सुविधा उपलब्ध केली. मतदार संघातील चार ते पाच गावांसाठी आरोग्य उपकेंद्रे सुरू केली. रुग्णांना तत्काळ वैद्यकीय उपचार मिळावा यासाठी गाव, वाडी-वस्तीवर रस्त्यांचे जाळे विणले. अशा सुविधा असतानाही दक्षिणेच्या डोंगरी जनतेला वैद्यकीय सुविधांसाठी कराडला येण्यास लागणारे अंतर लक्षात घेता तत्काळ वैद्यकीय सुविधा मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होऊ नये यासाठी मध्यवर्ती असणाऱ्या उंडाळे येथे ग्रामीण रुग्णालय आणले.या रुग्णालयाची 2 कोटी रुपये खर्चाची सुसज्ज इमारत आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने आरोग्य केंद्र, उपकेंद्र यांचा वेळोवेळी आढावा घेवून लागणारा निधी, सुविधा उपलब्ध करून जनतेचे आरोग्य जपण्याचे काम काका सातत्याने करत आहेत.
मतदारसंघातील जनतेचा व्यवसाय शेती हा असून दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन हा जोड व्यवसाय आहे. शेतकऱ्यांच्या उदर निर्वाहासाठी पशुधन महत्त्वाचे असल्याने कराड तालुक्यात अद्यावत पशु वैद्यकीय सुविधा विलासकाकानी निर्माण केल्या आहेत. पशुवैद्यकीय खात्याचे मंत्री असताना कराड येथे जनावरांची एक्स-रे सुविधा उपलब्ध केली.ओंड, काले, उंडाळे, येळगाव, वाठार,सुपने, तांबवे, म्हसोली, शेरे, बेलवडे बुद्रुक, आटके या ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखाने सुरू करून शेतकऱ्यांना पशुवैद्यकीय सुविधा पुरवल्या. विलासकाकांनी जेथे - जेथे घातले तेथे - तेथे त्यांनी सोने केले. सर्वसामान्य माणसापर्यंत सुविधा पोहचवलीच पाहिजे, असा त्यांचा ध्यास राहिला आहे. पशुवैद्यकीय दवाखाने तालुकास्तर, विभागवार होते. मात्र एक्सरे प्रयोगशाळा सुविधा फक्त जिल्हास्तरावर होत्या. ही बाब पशुसंवर्धन मंत्री असताना लक्षात येताच राज्यातील प्रत्येक मोठ्या तालुक्यात पशुचिकित्सालयची सुविधा पुरवून एक्स-रे, प्रयोगशाळेसह आधुनिक सुविधा पुरवल्या. कराड येथे यामुळे शेतकऱ्यांना सर्व प्रकारची पशुवैद्यकीय सुविधा आज मिळत आहेत. सुमारे 50 लाख रुपयांचा निधी यासाठी टप्प्याटप्प्याने काकांच्या प्रयत्नामुळे मिळाला आहे.
वैद्यकीय सुविधा
ग्रामीण रुग्णालय 1 प्राथमिक आरोग्य केंद्र 7 आरोग्य उपकेंद्र 21
पशुवैद्यकीय सुविधा
पशुवैद्यकीय चिकित्सालय 1 पशुवैद्यकिय दवाखाने 11
"30 वर्षाच्या सत्तेत सामान्य माणसाला निर्भय बनवण्याचे काम केले. मतदारसंघात मूलभूत सुविधा निर्माण करण्या बरोबर समाजाच्या अंतिम घटकापर्यंत विकास पोहोचवला. यामुळे मतदारसंघाला मानवी चेहरा देण्याचा आपणाला यश आले."
जलसिंचनाचा आयडॉल
स्वातंत्र्यानंतर 30 वर्षे होऊनही कराड दक्षिण मतदार संघातील डोंगरी भाग विकासापासून वंचित होता. कृष्णा कोयनाकाठी भरपूर पाणी तर उंडाळे, कुंभारगाव डोंगरी भागात पाण्यासाठी भटकंती अशीही परिस्थिती होती. पावसाळ्यात हिरवाईने नटणारा डोंगरी भाग उन्हाळ्यात ओसाड, उजाड बनत होता. पिण्यासाठी पाणीच मिळत नव्हते.मग तेथे सिंचनाची बात दूरच होती. शेती हंगामी असल्याने पशुधन नाही, जोड व्यवसाय नाही. शासनाची कोणतीच योजना वाडीवस्ती, गावात पोहोचली नव्हती. बहुतांश लोक पोटासाठी मुंबईकडे स्थानांतरित झालेले. यामुळे हा चाकरमान्यांचा प्रदेश म्हणून संबोधला जायचा. पाऊस पडला तर शेती पिकली, नाही तर दुष्काळ यामुळे आदिवासींचे जीवन हा भाग जगत होता . 1980 साली विलासकाका प्रथम विधानसभेवर निवडून गेले आणि खऱ्या अर्थाने या परिसरात सर्वांगीण विकासाची पहाट उजाडली.
डोंगरी, मागास माणसांच्या विकासाचा ध्यास घेऊन उंडाळकरांनी विधानसभेत पाऊल टाकले. मूलभूत सुविधा बरोबर सिंचन योजनाना त्यांनी प्राधान्य दिले. यामागे प्रेरणा होती ती थोर स्वातंत्र्य सेनानी दादा उंडाळकर यांची व उंडाळेच्या पाणी परिषदेची. दादा उंडाळकरांनी पुढाकार घेवून ही पाणी परिषद भरवली होती. स्व. यशवंतराव चव्हाण, स्वामी रामानंद भारती, काकासाहेब गाडगीळ अशा राष्ट्रीय नेत्यांची उपस्थिती होती.
याच परिषदेतून पहिल्या येवती म्हासोली सिंचन प्रकल्पाला मंजुरी मिळाली. 1980 नंतर खऱ्या अर्थाने या प्रकल्पाच्या कामास गती मिळाली. महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद यांच्या योजनांच्या माध्यमातून 'गाव तेथे तलाव' ही संकल्पना मांडून प्रतिवर्षी बजेटमधून कोट्यवधीचा निधी सिंचन प्रकल्पांना उपलब्ध केला. जलसंपदा, कृषि, वन अशा विभागातून जलसंधारणाची कामे राबवली. मोठे सिंचन प्रकल्प, लघुप्रकल्प, तलाव, साठवण तलाव, नालाबडींग अशा पद्धतीचे डोंगराच्या उगमापासून मुख्य नदी नाल्यापर्यंत साखळी बंधारे बांधून जास्तीत-जास्त पावसाचे पाणी अडविण्याचा प्रयत्न केला.
सिंचन योजनांची माहिती
सिंचन प्रकल्प पाणीसाठा द.ल.घ.फुट बागायती हेक्टरमध्ये 1) येवती - म्हासोली 258.00 2000 2)घोगाव 42.59 270 3) टाळगाव 32.00 200 4) उंडाळे 70.00 500 5) जिंती 42.64 350 6)माटेकरवाडी 36.00 225 7) तुळसण - सवादे 45.00 300 8) गोटेवाडी 17.00 125 9) येळगाव 70.00 450 10) काळगाव। 90.00 600 11) अकाईचीवाडी 21.00 135 12) खोचरेवाडी 16.00 100 13) महारुगडेवाडी 18.00 128 14) शेवाळवाडी (येवती) 17.00 125 15) घराळवाडी 14.00 90 16) पाचुपतेवाडी 19.00 130 17)लोहारवाडी 16.00 100 18) ग्रामतलाव 110.00 650 19) जलसंधारण 350 2300 20 वनतळी (वनविभाग) 150 - 21 कोल्हापुरी बंधारे 50.00 300 22)वाकुर्डे योजना 1000 6000 23) मराठवाडी प्रकल्प 2000 12000
जलसंधारण
कराड दक्षिण डोंगरे विभागातील 25000 हेक्टर क्षेत्रामध्ये पाणी अडवण्याचे काम कृषी विभागाच्या माध्यमातून झाले. यामुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात जमिनीत मुरवले जाते. नागार्जुन विकास खोरे माध्यमातून डोंगर विभागाला तब्बल 6 कोटीचा निधी मंजूर झाला असून या माध्यमातून संपूर्ण डोंगरी भागावर जलसंधारणाचे काम झाले आहे. पाणी जिरवण्याबरोबर जमिनीची मोठ्या प्रमाणात होणारी धूप थांबली आहे. याबरोबरच पाण्याबरोबर वाहून जाणारे गाळाचे प्रमाण थांबल्यामुळे लघुपाटबंधारे, नदी, कृष्णा नदीवरील धरणामध्ये साठवणाऱ्या गाळाचे प्रमाण कमी झाले आहे. अशाप्रकारे कृषी विभागाबरोबर पर्यावरण संवर्धनाचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने माड नदी खोऱ्यात झाले आहे. याचे संपूर्ण श्रेय आमदार विलासकाकांच्या नेतृत्वाला व कृषी विभाग अधिकाऱ्यांच्या चिकाटीला जातेमितीला कराड - पाटण तालुक्याच्या डोंगरे विभागात येवती - म्हासोली,येणपे, जिंती, उंडाळे, घोगाव- टाळगाव, साळशिरंबे, अकाईचीवाडी, खोचरेवाडी, महारुगडेवाडी, लोहारवाडी, माटेकरवाडी घराळवाडी येथे सिंचनप्रकल्प उभारून पिण्याच्या व शेतीच्या पाण्याच्या प्रश्नाची सोडवणूक केली आहे. या प्रकल्पामुळे हा परिसर टॅंकरमुक्त झाला तर सुमारे 50 टक्के क्षेत्र हंगामी व कायमस्वरूपी बागायती करण्यात यश आले आहे. येवती कॅनॉल दुरुस्ती व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे दुरुस्तीसाठी या प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रामध्ये 1कोटीचा निधी उपलब्ध करून येवती ते ओंड पर्यंतच्या शेतीला संजीवनी दिली आहे. सध्या तुळसण, सवादे व गोटेवाडी लघु पाटबंधारे प्रकल्पांचे काम सुरू आहे. 10 कोटी खर्चाचा येळगाव मध्यम प्रकल्प मंजूर झाला आहे. लवकरच या प्रकल्पाचेही काम सुरू होणार आहे. येत्या सह हा महिन्यात वाकुर्डे बुद्रुक योजनेतून वारणा धरणाचे 1 टी.एम.सी. पाणी उंडाळे खोऱ्याला तर मराठवाडी धरणाचे वर्षभरात 2 टी.एम.सी पाणी वांग खोऱ्याला मिळणार आहे.या पाण्यानंतर राज्यात सिंचनाखाली 100 टक्के आलेला डोंगरी मतदार संघ म्हणून कराड दक्षिणची नवी ओळख निर्माण होणार आहे. या कामी आमदार उंडाळकरांचे योगदान भगीरथा प्रमाणे पाहिले आहे. डोंगरी भागातील सिंचन प्रकल्प, जलसंधारण या माध्यमातून सुमारे 2300 द.ल. घ.फूट म्हणजे सुमारे 2 टीएमसी पाणी अडवण्यात यश आले आहे. दक्षिण मांड खोऱ्यात सरासरी 1000 मिमी. पाऊस पडतो. पावसाने सर्वसाधारणपणे 2360 द.ल. घ.फूट पाणी या विभागात उपलब्ध होते. हे सर्व पाणी अडवण्याची किमिया काकांच्या प्रयत्नातून साध्य झाली आहे. हा दक्षिण मांड जलसिंचनाचा प्रकल्प राज्याला आदर्शवत असा आहे.
येवती कॅनाल
येवती मध्यम प्रकल्पवर म्हासोली, सवादे, तुळसण, विठ्ठलवाडी, उंडाळे, ओंड गावातील सुमारे 4 हजार एकर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. 2 हजार हेक्टर क्षेत्र येवती कॅनलवर अवलंबून आहे. पोटपाटाने या शेतीला पाणी दिले जाते. कॅनाल दुरुस्ती जलसेतू व केटीवेअरसाठी 140 लाख रुपये मंजूर केले आहेत. ही कामे प्रगतीपथावर आहेत. सध्या ओंड येथे पाणी पोचविण्यासाठी 72 तास इतका कालावधी लागतो. हे पाणी 48 तासात पोहचून शेतकऱ्यांना अधिक लाभ यामुळे होणार आहे.
कोल्हापूर पद्धतीचे बंधारे
पाण्याचा अचूक वापर व्हावा व जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली यावे या हेतूने दक्षिण मांड,वांग उपनद्या बरोबर जिंती, उंडाळे, तुळसण ओढ्यावर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधून पाण्याचे नियोजन केले आहे. मराठवाडी प्रकल्पाच्या पाण्याचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व्हावा या हेतूने वांग नदीवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे मंजूर केले आहेत. यापैकी काही बंधाऱ्यांचे काम पूर्ण झाले आहे. वांग नदीकाठावरील कराड व पाटण तालुक्यातील गावे आजही पूर्णतः सिंचनाखाली नाहीत. या गावांच्या सिंचनासाठी विलास काकांनी 14 के.टी.वेअर मंजूर केले. यापैकी मालदनसह काही बंधाऱ्यांचे काम पूर्ण होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
-- साहाय्य चमू (चर्चा) १६:०९, २५ ऑगस्ट २०२१ (IST)
विकी लव्हज् वुमन २०२१
[संपादन]प्रिय विकिसदस्य,
विकी लव्हज् वुमन दक्षिण आशिया ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. हा आंतरराष्ट्रीय विकी लव्हज् वुमन स्पर्धेचा एक भाग आहे. हे मुख्यत्वे महिला आणि महिला संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे.
प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण पोस्टकार्ड, बार्नस्टार, तसेच $१२ USD ते $२५० USD पर्यंतचे बक्षीस आमच्याकडून जिंकू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा. आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.
जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक संदेश हिवाळे किंवा Rockpeterson यांना संपर्क करावा.
धन्यवाद. --MediaWiki message delivery (चर्चा) ११:००, १६ सप्टेंबर २०२१ (IST)