Jump to content

सदस्य चर्चा:अभय नातू/sureshkhole यांचा महिला सुरक्षिततेबद्दलचा आरोप

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सदस्य sureshkhole यांनी मराठी विकिपीडियावर महिला सुरक्षित नसल्याचा आरोप येथे केलेला आहे. हा विषय गंभीर असू शकतो. त्याबद्दल चर्चा करण्यासाठी हे विशेष पान तयार केले आहे.

उपरोल्लेखित चर्चा वाचली असता लक्षात येईल की ही चर्चा लेखनातील एका विशिष्ट सदस्याकडून होणाऱ्या व्यत्ययाबद्दलच्या तक्रारीपासून सुरू झाली व नंतर ती प्रताधिकारभंग, महिला सुरक्षितता, प्रचालकांवर आरोप आणि असंबद्ध मुद्द्यांवरुन व्यक्तिगत हल्ले यांच्यात अडकली. इतर सगळे मुद्दे बाजूला ठेवून मराठी विकिपीडियावर महिला सुरक्षित आहेत कि नाही यावर येथे लिहीत आहे.

येथे सुरक्षितता या शब्दाचा दोन प्रकारे अर्थ लावता येतो -

  1. मराठी विकिपीडियावर योगदान करताना इतरांचा व्यत्यय होउन त्यामुळे अनकम्फर्टेबल वाटणे आणि/किंवा योगदान करण्याचा उत्साह कमी व्हावा.
  2. शाब्दिक किंवा शारिरीक इजा करणे किंवा करण्याच्या धमक्या देणे आणि/किंवा असे होऊ शकते असा समज निर्माण करणे.
  1. मराठी विकिपीडियावरील जुन्या सदस्यांना आठवत असेल की काही वर्षांपूर्वी उत्पाती सदस्याने एका प्रचालकाचा पत्ता काढून तो येथे जाहीरपणे लावला होता व तेथे येउन जाब विचारतो आणि बघून घेतो या अर्थाचा संदेश दिला होता. हा प्रकार #२ मध्ये मोडतो..

चर्चा

[संपादन]
  1. या चर्चेची सुरुवात सदस्य Pooja Jadhav यांच्या तक्रारीपासून झाली - आम्ही कामातून वेळ काढून लिहितो पण ज (सारखे संपादक) आमच्या कामात व्यत्यय आणतात.
  2. यावर प्रचालक अभय नातूने व्यत्यय आणि सुधारणा यांतील फरक समजावून घेउन जर व्यत्यय असेल तर थेट ज यांच्याशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला वा उदाहरणे मागितली (या नंतर असा थेट संपर्क साधलेला दिसत नाही आहे.)
  3. सदस्य आर्या जोशी यांनी अशी उदाहरणे देउन आम्हाला गप्प केले जाते अशी पुस्ती जोडली व प्रचालकांच्या कृतींबद्दल शंका निर्माण केली.
  4. अभय नातूने उदाहरणे मागणे म्हणजे गप्प करणे नव्हे असे उत्तर दिले आणि प्रचालकांच्या निष्पक्ष कामाकडे लक्ष वेधले. त्याचबरोबर ज यांना स्पष्टीकरण देण्यासाठी साद घातली (हे स्पष्टीकरण दिलेले दिसत नाही आहे.)
  5. आर्या जोशी यांनी सदस्य सुबोध कुलकर्णी आणि sureshkhole यांना पुरावे शोधण्यास मदतीची विनंती केली
  6. sureshkhole यांनी संदर्भ आणि पुरावे दिले. यात -
  1. आर्या जोशी - ज यांनी तुळशी वृंदावन, अक्षय्य तृतीया, अजिंठा लेणी, वटपौर्णिमा, नव्याची पुनव कावड, हाथीगुंफा आणि शारदीय नवरात्र या लेखांमध्ये बदल केलेले दाखवले. तसेच दोन ठिकाणी वाद घातल्याचे आणि उडवा-उडवीची उत्तरे दिल्याचे दाखविले.
  2. ज्ञानदा (गद्रे?) - अनिल अवचट लेखातील मजकूराची पुनर्रचना केली
  3. Pooja Jadhav - एका लेखातील मजकूर हटविला, दुसऱ्या लेखातील मजकूर तिसऱ्या लेखात स्वतःच्या नावाने घातला. (येथे लिहिणे आवश्यक आहे की मराठी विकिपीडियावरील कोणताही लेख कोणाच्याही नावावर नसतो.)
  4. इतर सदस्य - प्रचालक आणि इतर काही सदस्यांनी केलेले बदल उलटविले किंवा त्यात अधिक बदल केले.

येथे थोडावेळ थांबून निरीक्षण केले असता असे ठळकपणे स्पष्ट होते की येथपर्यंत ज (किंवा इतर कोणताही सदस्य) यांच्याकडून महिलांच्या सुरक्षिततेला अपाय होईल (पहा वरील #२) असे लिहिले किंवा वागले गेलेले नाही.

@Sureshkhole:, तुमच्याकडून वरील निरीक्षणाला पुष्टी हवी आहे. फक्त #२ च्या संदर्भात लिहावे. दोनपैकी हा मुद्दा अधिक गंभीर आहे. #१ वर चर्चा पुढे नेली जाईल.

@अभय नातू:

  • इथे कसलाही उघड हिंसेचा प्रकार झालेला नाही आणि तो होतो आहे असा माझा कधी आरोपही नव्हता. सुरक्षितता ही नेहमीच उघड हिंसेपासून गृहीत धरली जाते. जे सर्वसाधारण कुठल्याही ठिकाणी वावरण्यात सहजता असायला पाहिजे ती न मिळणे म्हणजेच असुरक्षित असे कधी विचारात घेतले जात नाही. असो धन्यवाद आपण हे मुद्दा एक मध्ये लक्षात घेतले आहे. या मुद्द्यावर ज्या स्त्रीयांची संपादने ज यांनी बदलली काढून टाकली आहेत त्यांचीच मते यावीत असे माझे मत आहे.
  • माझ्या निरिक्षणात ज यांनी लक्ष ठेवणे/स्टाकिंग ही बाब केल्याचे मात्र स्पष्ट दिसते आहे आणि ते आर्या जोशी यांनी आणि इतरांनीही नोंदवलेले आहे, स्त्रीया करत असलेल्या पानांवरच त्याचवेळेला संपादने करणे आणि संपादन मतभेद होणे ही बाब ज बद्दल अनेकदा झाल्याचे आर्या जोशी यांनी चर्चापानावर नोंदवले आहे.
  • शिवाय मजकूर कुणाच्या मालकीचा नसतो हे जरी मान्य केले तरी आपण लिहिलेलाच मजकूर सतत काढला जातोय किंवा त्यातले संदर्भ गायब होत आहेत ही‌ घटना वाईट आहे.निदान सुरूवातीच्या पातळीवर असे वाटणे सहाजिक आहे, एकेक लेख एकेका व्यक्तीनेच लिहिलेले असल्यामुळे असेल ही समस्या कदाचित पण, आपण लिहिलेल्या मजकूराचा भाग काढला जाणे हुरुप घालवणारे वाटू शकते.
  • सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कुठल्याही संपादनांना सारांश नसणे, ज यांनी कधीच सारांश लिहिल्याचे स्मरत नाही. त्यामुळे जास्त शंका उत्पन्न होतात. शिवाय विनाकारण मजकूर हटवणे आणि अशी दीर्घकाळ संपादन इतिहासात गोंधळाची परिस्थीती असणे यांबाबत आपण धोरण पातळीवर काही निश्चित करु शकतो.
  • उत्पाती सदस्यांवर, संपादन सारांशावर, गोंधळची परिस्थिती निर्माण करणारी संपादने सारखी धोरणेही नाहीत. तेव्हा ह्या निमित्ताने त्याचाही विचार व्हावा.
  • आधीच सांगितल्याप्रमाणे मी काहीच उदाहरणे समोर ठेवली आहेत, असे इतिहासात पाहिले असता, ज यांनी विनाकारण बराचसा मजकूर उडविल्याचे त्यांच्या संपादनांमध्ये दिसते आणि योगायोग म्हणजे त्यातील अनेक पानांवर आधी स्त्रीयांनी संपादने केल्याचे दिसते हे मी आधिच नमूद केले आहे. सुरेश खोले "चुक माझी असेल तर मी माफ़ी मागायला कमी करत नाही, पण चुक तुमची असेल तर. . . . "? २०:०३, १६ ऑगस्ट २०१८ (IST)[reply]