सदस्य:Ketaki Modak/सावित्री : एक आख्यायिका आणि एक प्रतीक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सावित्री: एक आख्यायिका आणि प्रतीक हेमहाभारतातील सावित्रीच्या आख्यानावर आधारित श्रीअरविंद ऊर्फ [[अरविंद घोष]] यांनी लिहिलेले एक महाकाव्य आहे. त्याची मध्यवर्ती संकल्पना ही प्राकृतिक उत्क्रांतीचे पूर्णत्व आणि पृथ्वीवरील अतिमानसिक जीव-वंशाचा उदय याच्याशी संबंधित आहे.

सावित्रीच्या काव्यविस्ताराची कल्पना येण्यासाठी त्यातील ओळींचा विचार करता येईल. सुमारे २४००० ओळींमध्ये हे महाकाव्य रचले गेले आहे. श्री. निरोदबरन हे या महाकाव्याचे लेखनिक झाले.

`सावित्री’ चे पहिले उपलब्ध हस्तलिखित इ.स.१९१६ मधील आहे. सुरुवातीला वर्णनात्मक कविता एवढेच स्वरूप असलेल्या या काव्यावर नंतर अनेक परिष्करणे करण्यात आली. आपल्या चढत्या-वाढत्या आध्यात्मिक अनुभवानुसार ते या महाकाव्याच्या रचनेत उत्तरोत्तर बदल करीत होते.

हे महाकाव्य श्री अरविंद आपल्या हयातीत ५० वर्षे लिहीत होते. त्यांच्या डिसेंबर १९५० मध्ये झालेल्या महासमाधीच्या थोडेच दिवस आधी त्यांनी `सावित्री’ या महाकाव्याची रचना पूर्ण केली होती.

आवृत्त्या[संपादन]

  • इंग्रजी आवृत्त्या
  • (इंग्रजी) अरबिंदो घोष, श्री अरबिंदो आश्रम (1954) ASIN B0007ILK7W
  • (इंग्रजी) लोटस प्रेस (1995) आयएसबीएन 0-941524-80-9
  • मराठी आवृत्त्या
  • मराठीमध्ये सावित्रीचा अनुवाद करण्याचे आजवर दोन प्रयत्न झालेले आहेत. सौ.शैलजादेवी वहिनीसाहेब प्रतिनिधी यांनी केलेला अनुवाद “सावित्री - एक आख्यायिका आणि एक प्रतीक”, श्रीअरविंद आश्रम, पुडुचेरी यांच्यातर्फे प्रकाशित झालेला आहे. तो छंदोबद्ध भावानुवाद आहे. हा अनुवाद 1993 साली प्रकाशित झाला.
  • दुसरा अनुवाद कवी नृसिंहाग्रज यांनी केला आहे. तो अनुवाद “श्रीअरविंद सावित्री” या नावाने प्रकाशित झाला आहे. 1995 साली प्रकाशित झालेले हे पुस्तक मुक्तछंदात अनुवादित करण्यात आलेले आहे.

साहित्य[संपादन]

  • (मराठी) डॉ.ग.ना.जोशी, महाकवी श्री अरविंद यांच्या सावित्री महाकाव्यातील तत्त्वज्ञान, मॅजेस्टिक प्रकाशन, पृष्ठ ४६४
  • (इंग्रजी) जुगल किशोर मुखर्जी, The ascent of sight in Sri Aurobindo's Savitri (2001) आयएसबीएन 81-7058-656-9
  • (इंग्रजी) डी.एस.मिश्रा, Poetry and philosophy in Sri Aurobindo's Savitri (1989) आयएसबीएन 81-85151-21-0

बाह्य दुवे[संपादन]