सदस्य:श्रुती साळवे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राणी रामपाल ही मूळची हरियाणाची एक भारतीय हॉकीपटू आणि भारताच्या राष्ट्रीय संघाची कर्णधार आहे. १४ वर्षांची असताना तिने वयस्कांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदार्पण केले, तेही ऑलिम्पिक पात्रता फेरीत. यासोबतच भारताचे प्रतिनिधित्व करणारी ती आतापर्यंतची सर्वांत तरुण हॉकीपटू ठरली. तसेच २०१० मध्ये वर्ल्ड कप खेळताना ती अवघ्या १५ वर्षांची होती, आणि तेव्हाही ती भारताकडून वर्ल्ड कप खेळणारी सर्वांत तरुण खेळाडू ठरली. [१]


स्ट्रायकर आणि मिडफिल्डर अशा दुहेरी भूमिकेत खेळणाऱ्या राणीने आजवर २१२ सामन्यांमध्ये १४ आंतरराष्ट्रीय गोल केले आहेत. [२] २०१८ आणि २०१४च्या आशियाई स्पर्धांमध्ये अनुक्रमे रौप्य व कांस्य पदके जिंकणार्‍या भारतीय संघाचा ती भाग होती. [३] जकार्तामध्ये २०१८च्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या समारोप समारंभात राणी रामपालच्या हाती भारताचा ध्वज होता.[४]


राणी रामपाल वर्ल्ड गेम्स अ‍ॅथलीट ऑफ द इयर २०१९ पुरस्कार जिंकणारी पहिली हॉकी खेळाडू ठरली. [५] भारतीय क्रीडा प्राधिकरणाची (एसएआय) लेव्हल-10 ची प्रशिक्षक असलेल्या राणी २०२० मध्ये देशाचा सर्वोच्च क्रीडा सन्मान राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यापूर्वी २०१६ मध्ये तिला अर्जुन पुरस्काराने तिला गौरविण्यात आले होते. २०२० मध्ये भारत सरकारने तिचा भारताच्या चौथ्या सर्वोच्च नागरी पुरस्कार, पद्मश्रीने सन्मान केला होता.[६]

वैयक्तिक जीवन आणि पार्श्वभूमी[संपादन]

राणीचा जन्म हरियाणाच्या शहाबाद मार्कंडा येथे झाला. तिचे वडील एक मालवाहू ठेला खेचायचे, त्यामुळे आर्थिक अडचणी तर होत्याच. राणी सात वर्षांची असतानाच तिने हा खेळ निवडला, पण कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा तिला अधिक विचार करावा लागला.राणीला तिच्या आईवडिलांची मनधरणीही करावी लागली, कारण तेव्हाच्या सामाजिक दबावामुळे तिला हा खेळ खेळण्याची मुभा नव्हती.

मात्र शहाबाद हे महिला हॉकीसाठी सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण केंद्रांपैकी एक असल्यामुळे त्याचा तिला फायदा झाला. तिने शहाबाद हॉकी अकादमीमध्ये द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त प्रशिक्षक सरदार बलदेव सिंग यांच्याकडून प्रशिक्षण घेतले. [७][८] २००५ मध्ये राणीची राष्ट्रीय सब-ज्युनियर शिबिरासाठी निवड झाली. मात्र तिथे तिच्या पाठीला मोठी दुखापत झाली, ज्यामुळे तिला वर्षभर मैदानाबाहेर राहावे लागले. प्रखर फिजिओथेरपीनंतर हरियाणाच्या या कन्येचे २००७ मध्ये मैदानावर पुनरागमन झाले.

आसामच्या गुवाहाटीमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत तिने सिलेक्टर्सचे लक्ष वेधले, आणि पुढील वर्षात तिने राष्ट्रीय संघात प्रवेश मिळविला. [९]


तिची व्यावसायिक कारकीर्द सुरू होताच गोस्पोर्ट्स फाउंडेशन या ना-नफा संस्थेने तिला आर्थिक तसेच इतर सहाय्य पुरविले. [१०]

२०१८ मध्ये प्रख्यात आर्थिक समूह एडलवेस ग्रुपने रानी रामपाल आणि[११] ऑलिम्पियन जिम्नॅस्ट दीपा कर्माकर यांच्यासोबत एक करार केला, जेणेकरून या समूहाचे क्रीडा क्षेत्राशी नाते निर्माण व्हावे, आणि तरुणींना क्रीडा क्षेत्रात येण्यास प्रोत्साहन मिळावे.[१२]

व्यावसायिक कारकीर्द[संपादन]

जून २००९ मध्ये रशिया झालेल्या चॅम्पियन्स चॅलेंज टूर्नामेंटमध्ये राणीने अंतिम सामन्यात चार गोल करत, ‘टॉप गोल स्कोअरर’ आणि ‘यंग प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ पुरस्कार जिंकले. [१३]


वयाच्या १४व्या वर्षी ऑलिम्पिक पात्रता सामन्यासाठी राष्ट्रीय संघात स्थान मिळाल्यावर राणी रामपाल भारताकडून खेळणारी आतापर्यंतची सर्वात तरुण हॉकीपटू ठरली.


२०१०च्या राष्ट्रकुल स्पर्धेत तिला एफआयएचच्या (फेडरेशन इंटरनेशनाल डे हॉकी) ‘यंग वुमन प्लेयर ऑफ द इयर’ पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. २०१०च्या आशियाई स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर राणीची आशियाई हॉकी फेडरेशनच्या ऑल-स्टार हॉकी संघात निवड झाली होती.[१४]


२०१०मध्ये तिच्या विश्वचषक पदार्पणातच भारताने केलेल्या ७ गोल्सपैकी पाच गोल तिनेच केले होते. त्यामुळे तिला 'यंग प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' हा पुरस्कारही मिळाला. २०१३च्या ज्युनियर विश्वचषकात राणीने पुन्हा हाच पुरस्कार पटकावला, शिवाय भारतीय संघाला कांस्य पदक जिंकवून दिले.

२०१४ मध्ये तिने आशियाई स्पर्धेत भारताला कांस्यपदक जिंकण्यास मदत केली.


२०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये, जिथे भारत ३६ वर्षानंतर खेळत होता, रानीने पाचही साखळी सामने खेळले, आणि जपानविरुद्ध पहिल्याच सामन्यात दोन गोल केले. [१५]


रिओवरून परत आल्यानंतर तिला भारतीय संघाची कर्णधार घोषित करण्यात आले. भारतीय संघाने २०१८च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकले, परंतु अंतिम सामन्यात पराभूत झाल्यामुळे २०२०च्या टोकियो ऑलिम्पिकसाठीची थेट पात्रता गमावली. तथापि, २०१९मध्ये अमेरिकेविरुद्धच्या ऑलिम्पिक पात्रता सामन्यात रानीचा गोल निर्णायक ठरला, ज्यामुळे भारताचे ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित झाले.

तिच्या नेतृत्वात भारतीय संघाने २०१९ वर्ल्ड कपमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठली आणि त्याच वर्षी राष्ट्रकुल खेळांमध्ये चौथा क्रमांकावर राहिला. [१६] [१७]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Rani Rampal Biography, Olympic Medals, Records and Age". Olympic Channel. 2021-02-19 रोजी पाहिले.
  2. ^ "Rani Rampal Becomes First Hockey Player to Win 'World Games Athlete of the Year' Award". in.news.yahoo.com (इंग्रजी भाषेत). 2021-02-19 रोजी पाहिले.
  3. ^ "Rani Rampal Biography, Olympic Medals, Records and Age". Olympic Channel. 2021-02-19 रोजी पाहिले.
  4. ^ "Asian Games 2018: Rani Rampal Named India's Flag-Bearer For Closing Ceremony | Asian Games News". NDTVSports.com (इंग्रजी भाषेत). 2021-02-19 रोजी पाहिले.
  5. ^ "Rani Rampal Becomes First Hockey Player to Win 'World Games Athlete of the Year' Award". in.news.yahoo.com (इंग्रजी भाषेत). 2021-02-19 रोजी पाहिले.
  6. ^ "Rani Rampal Biography, Olympic Medals, Records and Age". Olympic Channel. 2021-02-19 रोजी पाहिले.
  7. ^ "Exclusive: How a Cart-Puller's Iron-Willed Daughter Became India's Beloved Hockey Captain". The Better India (इंग्रजी भाषेत). 2019-03-11. 2021-02-19 रोजी पाहिले.
  8. ^ "Fearlessness is what makes people look up to you". The Bridge (इंग्रजी भाषेत). 2018-03-18. 2021-02-19 रोजी पाहिले.
  9. ^ "Fearlessness is what makes people look up to you". The Bridge (इंग्रजी भाषेत). 2018-03-18. 2021-02-19 रोजी पाहिले.
  10. ^ Mishra, Shinjinee (2017-11-07). "Meet The Players Of The Indian Women's Hockey Team". Feminism In India (इंग्रजी भाषेत). 2021-02-19 रोजी पाहिले.
  11. ^ "Rani Rampal Biography, Olympic Medals, Records and Age". Olympic Channel. 2021-02-19 रोजी पाहिले.
  12. ^ Bureau, Adgully. "Edelweiss Group signs on Dipa Karmakar & Rani Rampal as Sports Champions". www.adgully.com (इंग्रजी भाषेत). 2021-02-19 रोजी पाहिले.
  13. ^ "Exclusive: How a Cart-Puller's Iron-Willed Daughter Became India's Beloved Hockey Captain". The Better India (इंग्रजी भाषेत). 2019-03-11. 2021-02-19 रोजी पाहिले.
  14. ^ "Exclusive: How a Cart-Puller's Iron-Willed Daughter Became India's Beloved Hockey Captain". The Better India (इंग्रजी भाषेत). 2019-03-11. 2021-02-19 रोजी पाहिले.
  15. ^ "Rani Rampal Biography, Olympic Medals, Records and Age". Olympic Channel. 2021-02-19 रोजी पाहिले.
  16. ^ "Rani Rampal Biography, Olympic Medals, Records and Age". Olympic Channel. 2021-02-19 रोजी पाहिले.
  17. ^ "Exclusive: How a Cart-Puller's Iron-Willed Daughter Became India's Beloved Hockey Captain". The Better India (इंग्रजी भाषेत). 2019-03-11. 2021-02-19 रोजी पाहिले.

पुरस्कार[संपादन]

प्रतिनिधित्व: भारत

रौप्य: २०१८ एशियन गेम्स, जकार्ता

कांस्य: २०१४ आशियाई खेळ, इंचेऑन

कांस्य: २०१३ ज्युनियर विश्वचषक मँचेन्ग्लॅडबॅच

राणी रामपाल
वैयक्तिक माहिती
जन्म ४ डिसेंबर १९९४
शहाबाद मार्कंड, हरियाणा
Sport
खेळ हॉकी
Position स्ट्रायकर, मिड-फील्डर
Coached by सरदार बलदेव सिंह