संदीप लामिछाने
Appearance
(संदीप लामिच्चने या पानावरून पुनर्निर्देशित)
संदीप लामिछाने (२ ऑगस्ट, २००० - हयात) हा नेपाळच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करतो. संदीप लामिछाने हा भारताच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळणारा नेपाळचा पहिला खेळाडू ठरला. त्याला दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने २०१८ मध्ये विकत घेतले.
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पदार्पण - नेदरलँड्स विरुद्ध १ ऑगस्ट २०१८ रोजी ॲमस्टलव्हिन येथे.
- आंतरराष्ट्रीय टी२०त पदार्पण - वेस्ट इंडीज विरुद्ध ३१ मे २०१८ रोजी लंडन येथे विश्वसंघाकडून.
- आंतरराष्ट्रीय टी२०त पदार्पण (नेपाळ राष्ट्रीय संघाकडून - नेदरलँड्स विरुद्ध २९ जून २०१८ लंडन येथे.