Jump to content

संतोष घंटे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
संतोष घंटे
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
जन्म तारीख११ ऑगस्ट 1982 संपादन
जन्मस्थानलातूर संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाहिंदी, मराठी, इंग्लिश भाषा संपादन
व्यवसायharmonium player, संगीतकार, accompanist संपादन
चे शिष्यआप्पा जळगावकर संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1999 संपादन
धर्महिंदू धर्म संपादन
गट-प्रकारहिंदुस्तानी शास्त्रीय संगीत संपादन

संतोष घंटे (११ ऑगस्ट, १९८२:लातूर, महाराष्ट्र - ) हे भारतीय हार्मोनियम वादक, एकलवादक, अनेक प्रसिद्ध गायक आणि वादकांबरोबर साथ संगत करणारे वादक आणि संगीतकार आहेत .

जीवन

[संपादन]

घंटे यांचा जन्म लातूरमधील निम्न मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. त्यांनी आपले शालेय शिक्षण लातूर आणि चिंचवड येथे पूर्ण केले व पुणे शहरातील गोडसे वाद्य विद्यालयात आपल्या संगीत शिक्षणास सुरुवात केली. संगीत क्षेत्रातील आपल्या कामाबरोबरच त्यांनी लोक कलाकारांच्या प्रश्नांना मुख्यप्रवाही माध्यमांद्वारे समोर आणण्याचे कामही ते सातत्याने करत असतात.[]

कारकीर्द

[संपादन]

ते पं. आप्पासाहेब जळगावकर यांचे शिष्य आहेत.[] १० ते ३० सप्टेंबर २००६ दरम्यान त्यांनी शालेय मुलांसह अनेक कार्यशाळा केल्या, लातूर जिल्ह्यातील ५० शाळांना ते शिकवू शकले. शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी या कार्यशाळा होत्या.[] घंटे यांनी 22 देशांमध्ये आपले कार्यक्रम केले आहेत.[][] वेगवेगळ्या प्रयोगांसह त्याने हार्मोनियम या वाद्याला साथ-सोबतच्या वाद्यापासून ते एकल वाद्य म्हणून वापरण्या पर्यंत आणले आहे.[] लोकसंगीत लोकप्रिय करण्याचा आणि संगीताच्या दुर्लक्षित प्रकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.[][][][१०] त्यांनी २०११ मध्ये सूरसाखा नावाने आपल्या गुरू आप्पासाहेब जळगांवकर यांना पुस्तकरूपाने श्रद्धांजली वाहिली.[११][१२][१३]

संवादिनी कला मंच

[संपादन]

हार्मोनिअम लोकप्रिय करण्यासाठी त्यांने एक संस्था स्थापन केली आहे, या संस्थेच्या सहकार्याने त्यांनी कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे, मुलांना हार्मोनियमचे प्रशिक्षण दिले जात आहे.[१४][१५]

संदर्भ

[संपादन]
  1. "नाट्य, चित्रपट कलावंतांसमोर अडचणींचा डोंगर कायम". Dainik Prabhat (इंग्रजी भाषेत). 2020-09-29. 2020-10-09 रोजी पाहिले.
  2. Suhasini, Lalitha; Jun 2, Pune Mirror | Updated:; 2019; Ist, 08:44. "On a solo trip: Musician from Pimpri- Chinchwad touring Italy, Germany and स्वित्झर्लंड to promote harmonium as a solo instrument". Pune Mirror (इंग्रजी भाषेत). 2020-08-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-02-27 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
  3. "युवा कलाकाराची अनोखी संगीत यात्रा". Sakal Papers. 2006-10-20.
  4. "विदेशामध्ये शास्त्रीय संगीताचा मोठा चाहता वर्ग". Dainik Prabhat (इंग्रजी भाषेत). 2019-11-02. 2020-02-27 रोजी पाहिले.
  5. "संवादिनीचे सप्त सूर सातासमुद्रापार". Lokmat Paper. 2018-01-12.
  6. "हार्मोनियमचा प्रसार हेच उद्दिष्ट". Maharashtra Times. 2019-09-14. 2020-02-27 रोजी पाहिले.[permanent dead link]
  7. "अखिल भारतीय तिसरे मराठी लोककला संमेलन". www.lokmat.com. 2020-02-27 रोजी पाहिले.
  8. "भारतीय संगीतास परदेशात उत्कट दाद - Marathi News | Indian musical fame abroad | Latest pune News at Lokmat.com". www.lokmat.com. 2020-02-27 रोजी पाहिले.
  9. "सूर निरागस हो...ने रसिक मंत्रमुग्ध". Lokmat. 2016-03-09. 2020-02-27 रोजी पाहिले.
  10. "सवाई महोत्सवातील स्वरानंद!". Lokmat. 2014-12-13. 2020-02-27 रोजी पाहिले.
  11. "अभिजात संगीत जपण्याचा प्रयत्न". www.lokmat.com. 2020-02-27 रोजी पाहिले.
  12. "'सूरसखा' चे आज सवाईमध्ये प्रकाशन". Maharashtra Times. 2020-06-17 रोजी पाहिले.
  13. Santosh Ghante, Parmeshwar Kamle, (2011). Surasakha. Pune: Kshitij Prakashan, Pune.CS1 maint: extra punctuation (link)
  14. "पिंपरीत संवादिनी कला मंचाची स्थापना". Sakal Papers. 2010-10-03.
  15. Khan, Alifiya (2015-01-26). "Repaying His Guru's debt". Indian Express.

बाह्य दुवे

[संपादन]