श्रीनिवास रघुनाथ कावळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रा.श्रीनिवास रघुनाथ कावळे(१३ सप्टेंबर, इ.स. १९३०:पुणे, महाराष्ट्र - ३१ जानेवारी, इ.स. १९९०:पुणे) हे मराठी लेखक होते. ते स.प. महाविद्यालय, पुणे येथे तत्त्वज्ञान विभाग प्रमुख आणि या महाविद्यालयाची पालकसंस्था शिक्षण प्रसारक मंडळी, पुणे या संस्थेचे आजीव सदस्य होते.

प्रा. श्रीनिवास रघुनाथ कावळे

निवृत्तीपूर्वी आठ महिने आधी प्रा. कावळे यांचे निधन झाले.

नौरोसजी वाडिया महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, विभागप्रमुख आणि प्राचार्य प्रभाकर रामचंद्र दामले हे त्यांचे गुरू होते.

आधार दिल्याशिवाय मोघम विधाने करावयाचे नाही, अशी प्रा. कावळे यांची शिस्त होती.[१].

कौटुंबिक माहिती[संपादन]

त्यांचे मूळचे नाव दत्तात्रय लक्ष्मण जोशी होते. त्यांना १६ व्या वर्षी त्यांचे वडील लक्ष्मण बाळकृष्ण जोशी यांच्या मामी जानकीबाई रघुनाथ कावळे यांनी दत्तक घेतले. दत्तकविधानानंतर त्यांचे नाव श्रीनिवास रघुनाथ कावळे असे झाले.[२]

श्रीनिवास कावळे यांचे घरगुती नाव 'दादा' असे होते, ते परिचितांमध्ये त्याच नावाने ओळखले जात होते.[३]

प्रा. श्रीनिवास रघुनाथ कावळे यांचा विवाह १३ मे १९५५ रोजी झाला. त्यांच्या पत्‍नीचे नाव शांता असे आहे.[४]

पत्नी सौ. शांताबाई यांच्या बरोबर प्रा. कावळे १९८७

श्रीनिवास कावळे यांना माजी सनदी अधिकारी जयंत श्रीनिवास कावळे, प्रा. रोहित श्रीनिवास कावळे आणि अमिता कावळे-सिद्धये ही तीन मुले आहेत. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे निवृत्त ग्रंथपाल (दिवंगत)अनंत लक्ष्मण जोशी हे त्यांचे धाकटे बंधू होते.

शिक्षण[संपादन]

 1. मॅट्रिक : १९४८ सरस्वती विद्या मंदिर, पुणे - प्रथम वर्ग
 2. इंटरमीजिएट: १९५० स. प. महाविद्यालय,पुणे, प्रथम वर्ग - तर्कशास्त्र या विषयात प्रथम
 3. बी.ए. तत्त्वज्ञान: १९५२ स. प. महाविद्यालय,पुणे,
 4. एम.ए. तत्त्वज्ञान: १९५४ स. प. महाविद्यालय,पुणे, प्रथम वर्ग प्रथम क्रमांक
 5. पीएच.डी. : १९५९, पुणे विद्यापीठ,पुणे (प्रबंधाचा विषय : Nature and Implications of Value: A Philosophical Analysis)

अध्यापन[संपादन]

 1. १९५२-५३ : ट्यूटर फेलो - स. प. महाविद्यालय,पुणे
 2. १९५३-५४ : ट्यूटर फेलो - फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे
 3. १९५४-५५ : लेक्चरर आणि ट्यूटर स. प. महाविद्यालय,पुणे
 4. १९५६ ते १९६४ : प्राध्यापक, स. प. महाविद्यालय,पुणे
 5. १९६५ पासून : प्राध्यापक आणि विभागप्रमुख, तत्त्वज्ञान विभाग, स. प. महाविद्यालय, पुणे
 6. १९७० पासून : पीएच.डी. मार्गदर्शक.
 7. १९९० : निवृत्तीपूर्वी निधन

पारितोषिक[संपादन]

सामाजिक शास्त्रात (एम.ए.तत्त्वज्ञान) प्रथम वर्ग प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल सुधाताई ढवळे सुवर्णपदक.

शिष्यवृत्ती[संपादन]

 • १९६१-६२ : 'डॅनफोर्थ फाउंडेशन'तर्फे कोलगेट विद्यापीठ, अमेरिका येथे अभ्यागत प्राध्यापक
 • १९८० : पुणे विद्यापीठ, पुणे येथे अभ्यागत प्राध्यापक

ग्रंथलेखन[संपादन]

 • १९५९ : सुगम तर्कशास्त्र आणि वैज्ञानिक पद्धती (सहलेखक)(इतर लेखक :श्रीकृष्ण गोपाळ हुल्याळकर; श्रीकृष्ण वासुदेव काळे)[५]
 • १९६६ : सामाजिक मानसशास्त्र (सहलेखक)
 • १९७७ : तर्कशास्त्र
 • १९९० : पंडित जवाहरलाल नेहरूंचे तत्त्वचिंतन (सहलेखक) [६][७][८]

कारकीर्द[संपादन]

 • १९६५ : सचिव, पूना फिलॉसॉफी असोसिएशन
 • १९७५ : अध्यक्ष, पूना फिलॉसॉफी असोसिएशन
 • १९५९ पासून : शिक्षण प्रसारक मंडळी, पुणे या संस्थेचे आजीव सदस्य
 • १९६६-७१ : मुख्याध्यापक - नूतन मराठी विद्यालय, पुणे
 • १९६९-७१ : सचिव, शिक्षण प्रसारक मंडळी, पुणे
 • १९६०-६६: ग्रंथालय प्रमुख
 • १९७८-७९ : उपप्राचार्य

प्रा.कावळे स्मृतिग्रंथ[संपादन]

 • डॉ. श्री.र. कावळे: व्यक्ती आणि विचार : संपादक-अनंत लक्ष्मण जोशी, प्रकाशक-रोहित श्रीनिवास कावळे, : प्रथमावृत्ती प्रकाशन : ३१ जानेवारी २००२

साहित्यिक प्रा. डॉ. हे.वि. इनामदार यांनी या स्मृतिग्रंथास ’दर्शन एका देवमाणसाचे’ ही प्रस्तावना लिहिली आहे. या ग्रंथात एकूण तीस लेख असून प्रा. कावळे यांनी लिहिलेले एकवीस आणि इतरांनी त्यांच्या स्मरणार्थ लिहिलेले नऊ लेख आहेत. ग्रंथाचे पाच विभाग आहेत. प्रा. कावळे यांच्या लेखनातून त्यांची लेखनशैली, चिंतनपद्धती आणि तात्त्विक भूमिका स्पष्ट होते. तात्त्विक चिंतनाबरोबरच 'मलावरोध : प्रतिबंधक उपाय' आणि 'निसर्गोपचारातील आहार आणि उपवास' सारख्या त्यांच्या लेखनातून त्यांची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी स्पष्ट होते. साधे विषय तात्त्विक पातळीवर कसे हाताळता येतात, याचा त्यातून प्रत्यय येतो.

पाच विभाग : प्रा. कावळे यांचे लेखन[संपादन]

व्यक्तिलेख[संपादन]

 1. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
 2. स्वामी विवेकानंद
 3. गांधीजी आणि भारतीय स्वातंत्र्य
 4. आमचे ज्येष्ठ सहकारी: डॉ. पु.ग. सहस्रबुद्धे
 5. श्रेष्ठ विचारवंत : प्राचार्य प्र.रा. दामले
 6. श्रद्धांजली: प्राचार्य कमलिनी दामले
 7. M.N. Roy and J.P. on Social Change

नभोवाणीवरील भाषणे[संपादन]

 1. आधुनिक धर्मचिंतन
 2. अमेरिकन दृष्टिकोनातून विश्व आणि मानव
 3. जेम्स मिल : तत्त्वचिंतक आणि इतिहास-संशोधक
 4. थोर विचारवंत : सिग्मंड फ्रॉईड
 5. विचारगाथा : स्पिनोझा
 6. विचारगाथा : पतञ्जली
 7. The State of Mind : Narcissism

विचारमंथन[संपादन]

 1. श्री समर्थांचे 'मनाचे श्लोक'
 2. गुरुदेव रानडे : ग्रंथ परिचय
 3. शैक्षणिक प्रबोधन आणि स्थानिक स्वराज्य संस्था
 4. ज्ञानेश्वरीतील अध्यात्म

आहार आणि आरोग्य[संपादन]

 1. योग आणि मानसिक उपाय
 2. मलावरोध : प्रतिबंधक उपाय
 3. निसर्गोपचारातील आहार आणि उपवास

आदरांजली[संपादन]

 1. डॉ. कावळे : आदर्श व्यक्तिमत्त्व : डॉ. स.म. परळीकर
 2. व्रत हे ज्ञानसाधनेचे  : डॉ. समीता टिल्लू
 3. तत्त्वज्ञान जगणारे कावळे  : डॉ. शोभना तीर्थळी
 4. अध्यापन ही जीवन निष्ठा मानणारे कावळे सर : सौ. विनया बापट

दहाव्या स्मृतिवर्षात[संपादन]

 1. भेटकार्ड - अनिल अंतुरकर
 2. तत्त्वज्ञान जगलेले दादा - जयंत कावळे
 3. दादा : माझे शिक्षक - वडील - रोहित कावळे
 4. दादा : अमिता कावळे
 5. आदरांजली - अनंत जोशी

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. ^ डॉ. हे. वि. इनामदार : दर्शन एका देवमाणसाचे (प्रस्तावना), डॉ.श्री.र. कावळे: व्यक्ती आणि विचार, संपादक-अनंत लक्ष्मण जोशी, प्रकाशक- रोहित श्रीनिवास कावळे ई-४, साईसदन सोसायटी, तुळशीबागवाले कॉलनी, सहकारनगर, नं.२ पुणे ४११००९, प्रथमावृत्ती ३१ जानेवारी २००२
 2. ^ कावळे यांचा जीवनक्रम, डॉ.श्री.र. कावळे: व्यक्ती आणि विचार, संपादक-अनंत लक्ष्मण जोशी, प्रकाशक-रोहित श्रीनिवास कावळे, ई-४, साईसदन सोसायटी, तुळशीबागवाले कॉलनी, सहकारनगर नं. २ पुणे ४११००९, पान १८०, प्रथमावृत्ती ३१ जानेवारी २००२
 3. ^ अनंत लक्ष्मण जोशी, संपादकीय मनोगत, डॉ. श्री.र. कावळे : व्यक्ती आणि विचार, संपादक-अनंत लक्ष्मण जोशी, प्रकाशक-रोहित श्रीनिवास कावळे, ई-४, साईसदन सोसायटी, तुळशीबागवाले कॉलनी, सहकारनगर, नं.२ पुणे ४११००९,प्रथमावृत्ती ३१ जानेवारी २००२
 4. ^ अनंत लक्ष्मण जोशी, संपादकीय मनोगत, डॉ. श्री.र.कावळे: व्यक्ती आणि विचार, संपादक-अनंत लक्ष्मण जोशी, प्रकाशक-रोहित श्रीनिवास कावळे, ई-४, साईसदन सोसायटी, तुळशीबागवाले कॉलनी, सहकारनगर, नं.२ पुणे ४११००९, प्रथमावृत्ती ३१ जानेवारी २००२, पान १८२
 5. ^ http://120.63.216.208/W27/Result/Dtl/W21OneItem.aspx?xC=119629,किंमत रु. ०८-००, अनाथ विद्यार्थी गृह प्रकाशन,1959
 6. ^ "पंडित जवाहरलाल नेहरूंचे तत्त्वचिंतन / संपादक, गजानन नारायण जोशी, श्रीनिवास रघुनाथ कावळे". ७ सप्टेंबर, २०१५ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 7. ^ "Nehru Centre". ७ सप्टेंबर, २०१५ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 8. ^ "पंडित जवाहरलाल नेहरूंचे तत्त्वचिंतन". ७ सप्टेंबर, २०१५ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)