शुभा मुद्गल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शुभा मुद्गल

शुभा मुद्गल (पूर्वाश्रमीच्या शुभा गुप्ता; १९५९:अलाहाबाद, उत्तर प्रदेश, भारत - ) या भारतीय शास्त्रीय गायिका आहेत. या खयाल, ठुमरी आणि दादरा हे प्रकार गातात. त्यांनी गंधर्व महाविद्यालयाचे संस्थापक विनय चंद्र मौद्गल्य यांच्याकडून संगीत शिक्षण घेतले आहे. यांचे पती मुकुल मुद्गल हे विनय चंद्र मौद्गल्य यांचा मुलगा होय. पुढे त्यांचा घटस्फोट झाला. २००० साली त्यांनी प्रसिद्ध तबलावादक अनीश प्रधान यांच्याशी विवाह केला.

भारत सरकारने २००० साली शुभा मुद्गल यांना पद्मश्री पुरस्कार दिला.