शिव मंदिर, मस्कत
शिव मंदिर, मस्कत | |
---|---|
Geography | |
Coordinates | 23°36′35″N 58°35′18″E / 23.609729°N 58.588217°E |
Country | ओमान |
Province | मस्कत |
Locale | मुत्तरह, पुराना मस्क़त |
मोतीश्वर शिव मंदिर हे ओमान देशातील जुन्या मस्कत शहराच्या मुताराह भागात अल आलम पॅलेस जवळील एक हिंदू मंदिर परिसर आहे. हे पर्शियन आखाती प्रदेशातील सर्वात प्राचीन हिंदू मंदिरांपैकी एक आहे. मंदिरात वसंत पंचमी, रामनवमी, हनुमान जयंती, श्रावण महिना आणि गणेश चतुर्थी असे अनेक हिंदू सण साजरे करतात. महाशिवरात्रीच्या सणाच्या वेळी या मंदिरात सुमारे २०,०००हून अधिक भाविक दर्शनासाठी येतात व पूजा अर्चना करतात.
इतिहास
[संपादन]असे मानलेजाते कि ओमानमधील गुजराती व्यापारी समुदायाद्वारे हे मंदिर वर्ष १८९२ ते १९०९ च्या दरम्यान बांधले गेले असावे. त्यानंतर १९९९ मध्ये मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले. १५०७ मध्ये कच्छचे भाटिया व्यापारी समुदाय बारत सोडुन मस्कत येथे स्थायिक झाला. ऐतिहासिक कागदपत्रांवरून असे दिसून येते की १९व्या शतकाच्या सुरुवातीस गुजराती कुटुंबांचा येथे इतका अधिकार होता की त्यांनी ओमानच्या सुलतान सय्यद सय्यदला (१७९१ - १८५६) आपली राजधानी मस्कत येथून झांझीबार येथे हलवण्यासाठी राजी केले. रत्नासी पुरुषोत्तम या व्यावसायिकाने बांधलेली मस्कतच्या अल-बानयन प्रदेशात दोन हिंदू मंदिरेही होती. रत्नासी ओमानमध्ये शस्त्रे व खजूरांचा व्यापार करीत असे. वर्ष १९७४ मध्ये मंदिरांसह त्यांची स्वतःची हवेली नष्ट केली गेली.[१] २०१८ मध्ये असे वृत्त आले होते की ओमानमध्ये विशाल भारतीय समुदाय आहे जो ओमानमधील सर्वात मोठा परदेशी समुदाय पण आहे.[२]
मंदिर
[संपादन]हे मंदिर मस्कट आंतरराष्ट्रीय विमानतळ (सियाब आंतरराष्ट्रीय विमानतळ) पासून सुमारे ३५ कि.मी. अंतरावर सुलतानच्या अल आलम पॅलेसजवळ आहे. मस्कतच्या दर्सेट भागात एक कृष्णा मंदिर देखील आहे. हे कृष्ण मंदिर मोतीश्वर शिव मंदिरापासून सुमारे १० किमी अंतरावर आहे. या मंदिरात भगवान शिव आणि हनुमानाच्या मूर्त्या आहेत. जरी मस्कट हे वाळवंट असले आणी पाऊस कमी पडत असला तरी असं म्हणतात की मंदिरातील विहीर वर्षभर पाण्याने भरली असते. मंदिरामध्ये तीन पुजारी, तीन सहाय्यक कर्मचारी आणि चार प्रशासकीय कर्मचारी आहेत. याखेरीज सण व उत्सवाच्या वेळी अनेक स्वयंसेवकांमार्फत मंदिरास मदत होते आणी मंदिराचे काम चालते. हे मंदिर हिंदू धर्माचे अनुसरण करणाऱ्या ओमानमधील लोकांच्या समाजासाठी एक सांस्कृतिक केंद्र बनले आहे.
भारतीय पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी १२ फेब्रुवारी २०१८ रोजी ओमानच्या राज्य दौऱ्यादरम्यान या मंदिरास भेट दिली. तेथे त्यांनी मंदिर व्यवस्थापन समितीच्या सदस्यांशी संवाद साधला आणि पूजासह अभिषेक देखील केला.[३][४]
संदर्भ
[संपादन]- ^ John Peterson (२००७). Historical Muscat: An Illustrated Guide and Gazetteer. BRILL. pp. ११३. ISBN 9789004152663.
- ^ "PM Modi to visit 200-year old Shiva temple in Muscat". DNA. 12 February 201812 February 2018. 15 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ Report, Staff (12 February 2018). "Modi visits 125-year-old Shiva temple". GulfNews. 15 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.
- ^ "This is the temple PM Narendra Modi will visit in Oman". The Indian Express. 12 February 2018. 15 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.