शिवणी बुद्रुक (लातूर)
?शिवणी बु. महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | लातूर |
लोकसंख्या | ५,६२५ (2001) |
सरपंच | वैशाली पवार |
कोड • पिन कोड • दूरध्वनी |
• 413531 • +०२३८३ |
शिवणी बु. हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्याच्या दक्षिणेस वसलेले एक छोटेसे गाव आहे. या गावात गोदावरी नदीची उपनदी मांजरा व तावरजा या नद्यांचा संगम आहे.
धार्मिक स्थळे
[संपादन]शिवणी बु. गावात महादेव मंदिर, मारुती मंदिर, विठ्ठल मंदिर अंबाबाई मंदिर, दर्गा ही काही मुख्य धार्मिकस्थळे आहेत.
परंपरा
[संपादन]शिवणी बु. गावात दरवर्षी खंडोबा मंदिर येथे यात्रा भरते.
शैक्षणिक स्थान
[संपादन]शिवणी बु. गावात एक जिल्हा परिषद शाळा आहे. त्याशिवाय या गावात बळीराजा शिक्षण संस्था कार्यरत आहे. बळीराजा शिक्षण संस्थेचे माध्यमिक शाळा व अध्यापक महाविद्यालय आहे.
उद्योग
[संपादन]गावात साईबाबा शुगर्स लि. हा साखर कारखाना आहे. गावापासून ५ कि.मी. अंतरावर आहे.
त्याशिवाय गावात विकासजी ही आय.टी. कंपनी आहे. कंपनी वेब डेव्हलपमेंट, वेब होस्टिंग, ग्राफिक डिझाईनिंग क्षेत्रात कार्यरत आहे.
आर्थिक
[संपादन]गावात साईबाबा बँक, बळीराजा पतसंस्था आहे.
बाह्य दुवे
[संपादन]- latur1.com लातूर विषयी माहिती देणारे संकेतस्थळ Archived 2012-03-30 at the Wayback Machine.
- VikasG Web Solutions Archived 2012-11-29 at the Wayback Machine.
राजकीय स्थान
[संपादन]राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लातूर जिल्हा कार्याध्यक्ष श्री. बबन भोसले हे शिवणी बु. गावचे आहेत.