Jump to content

शासकीय तंत्रनिकेतन (कराड)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(शासकीय तंत्रनिकेतन, कराड या पानावरून पुनर्निर्देशित)

महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामधील शासकीय तंत्रनिकेतन, कराड ही एक जुनी नावाजलेली संस्था असून महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतरावजी चव्हाण यांच्या दृष्ट्या शैक्षणिक धोरणाच्या फलस्वरूप सदर संस्थेची स्थापना झाली आहे.

राष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात तंत्रशिक्षणाचे महत्त्व अनन्य साधारण आहे. उद्योग क्षेत्राची उभारणी व अस्तित्त्व हे पूर्णपणे हे कुशल मनुष्यबळाच्या उपलब्धतेवर अवलंबून असून सदरचे बहुमितीय कौशल्य धारक मनुष्यबळ उद्योगधंद्याची चाके अविरत फिरत ठेवण्यासाठी आवश्यक आहे.   

कृष्णा आणि कोयना या नद्यांच्या नयनरम्य संगमावर वसलेल्या कराड शहरात ही संस्था विद्यानगर येथील शैक्षणिक संकुलात इ. स. १९५७ पासून दिमाखात उभी आहे.  राष्ट्रीय महामार्ग सुवर्ण चतुष्कोणाच्या रा. म. क्रमांक ०४ लगत कराड शहर वसलेले आहे.

शासकीय तंत्रनिकेतन कराड ही संस्था पुणे आणि मुंबई या महानगरांपासून अनुक्रमे १६५ किमी आणि ३३० किमी अंतरावर आहे. येथे पोहचण्यासाठी आपण रस्ते मार्ग, लोहमार्ग अथवा हवाई मार्ग यांचा अवलंब करू शकता.