शारदा मुखर्जी
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | फेब्रुवारी २४, इ.स. १९१९ मुंबई | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | जुलै ६, इ.स. २००७ | ||
नागरिकत्व |
| ||
शिक्षण घेतलेली संस्था | |||
व्यवसाय | |||
पद |
| ||
| |||
शारदा मुखर्जी (१९१९-२००७ ) ह्या एक भारतीय समाजवादी आणि राजकारणी होत्या ज्या १९६० च्या दशकात लोकसभेच्या सदस्या होत्या. नंतर त्यांनी आंध्र प्रदेश आणि गुजरात राज्यांचे राज्यपाल म्हणून काम केले.
चरित्र
[संपादन]शारदा यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९१९ रोजी एका महाराष्ट्रीयन कुटुंबात शारदा पंडित म्हणून झाला. त्यांचे वडील होते प्रताप पंडित. त्यांचे काका रणजीत एस पंडित यांचा विवाह भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या बहिणी विजयालक्ष्मी पंडित यांच्याशी झाला होता. त्यांची आई सरस्वतीबाई पंडित यांची बहीण दिग्गज अभिनेत्री आणि चित्रपट व्यक्तिमत्त्व दुर्गा खोटे होती. त्या सुब्रोतो मुखर्जी यांना भेटल्या, जे नंतर पहिले भारतीय एर चीफ मार्शल बनले. १९३९ मध्ये त्यांचे लग्न झाले आणि त्यांना एक मुलगा झाला. १९६० मध्ये पतीच्या अकाली निधनानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला.[१]
त्या महाराष्ट्रातील रत्नागिरी (लोकसभा मतदारसंघ) मधून १९६२ ते १९७१ च्या तिसऱ्या आणि चौथ्या लोकसभेच्या सदस्य होत्या व काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व करत होत्या. [२] त्यांनी १९७१ ची निवडणूक लढवली नव्हती.
शारदा मुखर्जी मे १९७७ ते ऑगस्ट १९७८ पर्यंत आंध्र प्रदेशच्या राज्यपाल आणि १९७८ ते १९८३ पर्यंत गुजरातच्या राज्यपाल होत्या. २००७ मध्ये त्यांचा मृत्यू झाला.
संदर्भ
[संपादन]- ^ Gita Vittal (२००७). Reflections: Experiences of a Bureaucrat's Wife. Academic Foundation. pp. ६३-६६. ISBN 9788171884711.
- ^ "1962 India General (3rd Lok Sabha) Elections Results".