Jump to content

शांता रंगास्वामी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(शांता रंगस्वामी या पानावरून पुनर्निर्देशित)

शांता रंगास्वामी (१ जानेवारी, १९५४:मद्रास, भारत - हयात) ही भारतचा ध्वज भारतच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७६ ते १९९१ दरम्यान १६ महिला कसोटी आणि १९ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.

शांता ही भारताच्या महिला कसोटी संघाची पहिली कर्णधार आहे. इ.स. १९७६ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्धच्या भारताच्या सर्व ६ कसोटींचे शांताने नेतृत्व केले. इ.स. १९७६ मध्येच भारत सरकारने शांताला अर्जुन पुरस्कार देऊन गौरविले. प्रथमच एका महिलेला अर्जुन पुरस्कार देण्यात आला. तर इ.स. २०११ मध्ये क्रिकेटमधील अतुल्य योगदानाकरता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शांताला जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले.