शांघाय टॉवर
Appearance
| शांघाय टॉवर 上海中心大厦 | |
|---|---|
|
| |
| सर्वसाधारण माहिती | |
| प्रकार | मिश्र |
| ठिकाण |
पुडोंग, शांघाय 31°14′7.8″N 121°30′3.6″E / 31.235500°N 121.501000°E |
| बांधकाम सुरुवात | २९ नोव्हेंबर २००८ |
| पूर्ण | ६ सप्टेंबर २०१४ |
| ऊंची | |
| वास्तुशास्त्रीय | ६३२ मी (२,०७३.५ फूट) |
| छत | ६३२ मी (२,०७३.५ फूट) |
| वरचा मजला | ५८७.४ मी (१,९२७.२ फूट) |
| एकूण मजले | १२८ (+५ तळमजले) |
| क्षेत्रफळ | ३८०,००० चौ.मीटर |
| बांधकाम | |
| वास्तुविशारद | जून झिया |
शांघाय टॉवर (चिनी: 上海中心大厦) ही चीनच्या शांघाय शहरातील एक गगनचुंबी इमारत आहे. शांघायच्या पुडोंग परिसरात असलेल्या ह्या १२८ मजली इमारतीची उंची तब्बल ६३२-मीटर (२,०७३ फूट) इतकी असून ती (दुबईच्या बुर्ज खलिफा खालोखाल), २०१८मध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या उंचीची इमारत होती. शांघाय टॉवरच्या १२१व्या मजल्यावरील गच्चीचा वापर दृष्य न्याहळण्यासाठी केला जातो व ही जगातील सर्वात उंच गच्ची आहे. तसेच ह्या इमारतीमधील सुमारे ७४ किमी/तास इतक्या वेगाने चालणाऱ्या लिफ्ट या जगातील सर्वात जलद लिफ्ट आहेत. शांघाय टॉवरचे बांधकाम नोव्हेंबर २००८ मध्ये चालू झाले व सप्टेंबर २०१४ मध्ये ते पूर्ण करण्यात आले. २६ एप्रिल २०१७ रोजी शांघाय टॉवरची गच्ची सर्वसाधारण पर्यटकांसाठी खुली करण्यात आली.
चित्र दालन
[संपादन]- जून २००९ मधील दृष्य
- गच्चीवरून शांघाय शहराचे दृष्य
- शांघाय शहरामधील गगनचुंबी इमारती
बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ Archived 2016-11-28 at the वेबॅक मशीन.

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत