बुर्ज खलिफा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
बुर्ज खलिफा
विश्वविक्रमी उंची
इ.स. २०१० पासून पर्यंत जगातील सर्वाधिक उंचीची इमारत [I]
आधीची ताइपेइ १०१
सर्वसाधारण माहिती
ठिकाण दुबई, संयुक्त अरब अमिराती
बांधकाम सुरुवात जानेवारी, इ.स. २००४
पूर्ण इ.स. २०१०
ऊंची
वास्तुशास्त्रीय ८२८ मी (२,७१७ फूट)
छत ८२८ मी (२,७१७ फूट)
वरचा मजला ५८४.५ मी (१,९१८ फूट)
एकूण मजले १६३


बुर्ज खलिफा (जुने नाव बुर्ज दुबई [१]) ही संयुक्त अरब अमिरातीच्या दुबई शहरामधील एक गगनचुंबी इमारत आहे. एकूण 829.84 मी (2,723 फूट) इतकी उंची असणारी बुर्ज खलिफा ही सध्या जगातील सर्वात उंच मानवनिर्मित इमारत आहे. ह्या इमारतीचे बांधकाम सप्टेंबर २००४ मध्ये सुरू झाले व ४ जानेवारी २०१० रोजी तिचे उद्घाटन करण्यात आले. ह्या इमारतीत १६३ मजले व १०४४ सदनिका आहेत.[२] याच्या एकूण मजल्यांपैकी ३८ मजल्यांत हॉटेले व कार्यालये इत्यादी आहेत. प्रति सेकंद १० मीटर वेगाने जाणाऱ्या एकूण ५७ लिफ्ट यात आहेत, तर ८ शीघ्र गती एस्कलेटर आहेत. या इमारतीचे एकूण क्षेत्रफळ ३५,९५,१०० वर्ग फूट इतके आहे. बुर्ज खलिफ्याच्या बांधकामासाठी ४.१ अब्ज डॉलर्स खर्च आला आहे.

बांधकाम क्रियेचे अ‍ॅनिमेशन

संदर्भ[संपादन]


हेही पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

चित्र दालन[संपादन]

१ फेब्रुवारी २००६
 
२९ ऑगस्ट २००६
 
२१ मार्च २००७
 
४ डिसेंबर २००७
 
१० डिसेंबर २००७
 
११ मार्च २००८