शंतनू मोइत्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
शंतनू मोइत्रा

शंतनू मोइत्रा (जन्म: २२ जानेवारी, इ.स. १९६८, लखनौ) हा एक भारतीय संगीतकारबॉलिवूडमधील संगीत दिग्दर्शक आहे. इ.स. २००५ सालच्या विधू विनोद चोप्राच्या परिणीता चित्रपटामधील संगीतासाठी मोइत्रा प्रसिद्धीझोतात आला. ह्या चित्रपटासाठी त्याला नव्या संगीत दिग्दर्शकाचा फिल्मफेअर आर.डी. बर्मन पुरस्कार मिळाला.

मोइत्राने आजवर लगे रहो मुन्ना भाई, लागा चुनरी में दाग, वेलकम टू सज्जनपूर, ३ इडियट्स, पी.के. इत्यादी अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये संगीत दिले आहे.

बाह्य दुवे[संपादन]

  • "अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  • इंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील शंतनू मोइत्राचे पान (इंग्लिश मजकूर)