शंकर पुणतांबेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शंकर पुणतांबेकर
जन्म इ.स. १९२३
राष्ट्रीयत्व मराठी, भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा हिंदी (साहित्य)
मराठी (मातृभाषा)
साहित्य प्रकार कथा
कादंबरी
पुरस्कार 'व्यंग्यश्री', 'चकल्लस' व 'मुक्तिबोध'

डॉ. शंकर पुणतांबेकर (इ.स. १९२३ - हयात) हिंदी भाषेतील मराठी साहित्यिक आहेत. कथा, कादंबरी, एकांकिका, समीक्षा, व्यंगकोश यासारखे बहुविध लिखाण करणारे व्यंगकार म्हणून पुणतांबेकर प्रसिद्ध आहेत.

साहित्यिक कारकीर्द[संपादन]

पुणतांबेकरांनी हिंदीतील जवळपास ९५०० शब्द निवडून त्यावर आपल्या व्यंगात्मक शैलीने प्रहार करत 'व्यंग्यकोश' सिद्ध केला. पुणतांबेकरांनी व्यंग कादंबरी हाही एक वेगळा प्रकार हिंदीत आणला आणि एक मंत्री स्वर्गलोक मेंजहाँ देवता मरते है। या दोन कादंबऱ्या लिहिल्या. जगात चालू असलेल्या घडामोडींना स्वर्गाच्या पार्श्वभूमीवर रेखाटून केलेले कल्पनारंजन व राजकारणावरील व्यंगात्मक टीका एक मंत्री स्वर्गलोक में या कादंबरीत आहे. या कादंबरीचा ओमप्रकाश शर्मा यांनी एक मंत्री स्वर्गलोकात या नावाने मराठी भाषेत अनुवाद केला आहे.

पुरस्कार व गौरव[संपादन]

पुणतांबेकरांना 'व्यंग्यश्री'सह 'चकल्लस' व 'मुक्तिबोध' यांसारख्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यांच्यावर एक कलम की कहानी हा लघुपट तयार करण्यात आला आहे[१].

संदर्भ[संपादन]

  1. ^ भंडारी,चंद्रकांत. "ध्यानस्थ 'व्यंगश्री'". ३० ऑक्टोबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)