शंकर पुणतांबेकर
शंकर पुणतांबेकर | |
---|---|
जन्म | इ.स. १९२३ |
राष्ट्रीयत्व | मराठी, भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य |
भाषा |
हिंदी (साहित्य) मराठी (मातृभाषा) |
साहित्य प्रकार |
कथा कादंबरी |
पुरस्कार | 'व्यंग्यश्री', 'चकल्लस' व 'मुक्तिबोध' |
डॉ. शंकर पुणतांबेकर (इ.स. १९२३ - हयात) हिंदी भाषेतील मराठी साहित्यिक आहेत. कथा, कादंबरी, एकांकिका, समीक्षा, व्यंगकोश यासारखे बहुविध लिखाण करणारे व्यंगकार म्हणून पुणतांबेकर प्रसिद्ध आहेत.
साहित्यिक कारकीर्द
[संपादन]पुणतांबेकरांनी हिंदीतील जवळपास ९५०० शब्द निवडून त्यावर आपल्या व्यंगात्मक शैलीने प्रहार करत 'व्यंग्यकोश' सिद्ध केला. पुणतांबेकरांनी व्यंग कादंबरी हाही एक वेगळा प्रकार हिंदीत आणला आणि एक मंत्री स्वर्गलोक में व जहाँ देवता मरते है। या दोन कादंबऱ्या लिहिल्या. जगात चालू असलेल्या घडामोडींना स्वर्गाच्या पार्श्वभूमीवर रेखाटून केलेले कल्पनारंजन व राजकारणावरील व्यंगात्मक टीका एक मंत्री स्वर्गलोक में या कादंबरीत आहे. या कादंबरीचा ओमप्रकाश शर्मा यांनी एक मंत्री स्वर्गलोकात या नावाने मराठी भाषेत अनुवाद केला आहे.
पुरस्कार व गौरव
[संपादन]पुणतांबेकरांना 'व्यंग्यश्री'सह 'चकल्लस' व 'मुक्तिबोध' यांसारख्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यांच्यावर एक कलम की कहानी हा लघुपट तयार करण्यात आला आहे[१].
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ
[संपादन]- ^ भंडारी,चंद्रकांत. "ध्यानस्थ 'व्यंगश्री'". ३० ऑक्टोबर, इ.स. २०११ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]