व्हिक्टोरिया मेमोरियल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोलकाता शहरातील व्हिक्टोरिया मेमोरियल

व्हिक्टोरिया मेमोरिअल हॉल ही कोलकाता शहरामधील एक लोकप्रिय वास्तू आहे. ब्रिटिश राजवटीदरम्यान ही संगमरवरी इमारत व्हिक्टोरिया राणी हिच्या स्मरणाप्रिथ्यर्थ बांधली गेली. ह्या स्मारकाची कल्पना राणी व्हिक्टोरियाच्या निधनानंतर सर्वप्रथम लॉर्ड कर्झनने इ.स. १९०१ मध्ये मांडली. इ.स. १९०६ मध्ये झालेल्या पायाभरणीनंतर हे स्मारक इ.स. १९२१ मध्ये पूर्ण झाले.

संपूर्ण संगमरवरी दगडाने बांधले गेलेले हे स्मारक भारतातील जगप्रसिद्ध मुघल स्मारक ताज महालसोबत साधर्म्य दर्शवते. आजच्या घडीला व्हिक्टोरिया मेमोरियल कोलकात्यातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक मानले जाते.

बाह्य दुवे[संपादन]