वृंदा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

वृंदा ही हिंदू पुराणांमध्ये उल्लेख असलेली, जालंधर नामक दैत्याची पत्नी होती. पातिव्रत्य सती प्रथा विषयक पुराणातील प्रथमतम उल्लेख असलेली हिंदू धर्मात पूजनीय समजली जाणारी स्त्री व्यक्तिरेखा असावी [ संदर्भ हवा ].

आख्यायिका[संपादन]

जालंधर नामक दैत्याने कठोर तप करून वर मिळवले. यानंतर तो उन्मत्त आणि अनियंत्रित बनला. त्याची पत्नी वृंदा ही पतिव्रता असून तिची पुण्याई त्याच्या पाठीशी होती. यामुळे त्याचा वध करणे कोणास शक्य होत नव्हते. एक दिवस त्याची मजल पार्वतीकडे वाईट दृष्टीने पाहण्यापर्यंत पोहोचली. शंकराने त्याच्याशी घनघोर युद्ध आरंभले. जालंधराचा वध करण्यासाठी त्याची पतिव्रता पत्नी वृंदा हिच्या पातिव्रत्याचा भंग करणे आवश्यक होते. ही कामगिरी विष्णूवर सोपविण्यात आली. विष्णूने जालंधराचे रूप धारण करून आपले कार्य पार पाडले. हे जेव्हा वृंदेला समजले, तेव्हा तिने देहत्याग केला. परंतु देहत्याग करते समयी तिने विष्णूला दगड - शाळिग्राम होण्याचा शाप दिला. विष्णूनेही तिला तुळशीचे रोप होण्याचा प्रतिशाप दिला. परंतु वृंदेच्या पातिव्रत्यामुळे संतुष्ट होऊन विष्णूने तिला वरही दिला, की तुळशीची पूजा केली जाईल आणि या घटनेची स्मृती म्हणून शाळिग्रामाशी, म्हणजेच विष्णूशी, तुळशीचे लग्न लावले जाईल.[१]

हेही पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Google's cache of http://www.vrindavan-dham.com/vrinda/tulasi-story.php. It is a snapshot of the page as it appeared on 5 Mar 2011 22:37:58 GMT.