विष्णू मनोहर
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल. |
इवलेसे|बल्लवाचार्य(शेफ) विष्णू मनोहर |320x320px १८ फेब्रुवारी १९६८ला जन्मलेले विष्णू मनोहर हे एक भारतीय बल्लवाचार्य अर्थात शेफ, उद्योजक, पाककलेवर आधारित पुस्तके लिहिणारे लेखक, दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमांचे सूत्रसंचालक, तसेच निर्माते रेस्टॉरंटर आहेत. ते सध्या manover हॉस्पिटॅलिटी पीव्हीटी.लिमिटेड येथे कार्यकारी शेफ म्हणून काम करीत आहेत. ते ललित कला शाखेचे पदवीधर असून उद्योजकसुद्धा आहेत. एक प्रशिक्षित व्यावसायिक कलाकार असणाऱ्या विष्णू यांनी ललितकलेचे क्षेत्र सोडले असून पाककलेचे क्षेत्र निवडले. कारण त्यांना बहुधा हे माहित होते की - माणसाच्या हृदयाचा मार्ग हा त्याच्या पोटातून जातो. त्यांनी परदेशातसुद्धा खाद्यक्षेत्रासंबंधी काम केले आहे.१९८८ पासून मनोहर ग्रुपसोबत कार्य करतच पुढे ते २०१० मध्ये कार्यकारी शेफ तसेच दिग्दर्शक म्हणून हॉस्पिटॅलिटी पीव्हीटी.लिमिटेड मध्ये रुजू झाले.त्यांनी पाककलेसंबंधी ५० हून अधिक पुस्तके लिहिली आहेत.
विष्णू यांनी सर्वात मोठा पराठा, ५ फ़ूटलांब व ५ फूट रुंद आणि ३५किग्र असे मापन असणारा तयार करून विश्वविक्रम रचला.
विष्णू यांनी अविरत ५३ तास स्वयंपाक करून नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे.
त्यांच्याकडे अनेकपाककलेविषयक कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करण्याचे श्रेय जाते :
- : इंडिअन रोड काँग्रेस येथे सलग दोन वर्षे मुख्य अधिकारी.
- १९८८ डिसेंबर : ढाबा फूड फेस्टिव्हल.
- १९९९ ऑगस्ट : भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित राष्ट्रीय परिषद (येथे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासमवेत १०,००० विशेष पाहुण्यांनी चविष्ट मेजवानीचा आस्वाद घेतला.)
- : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित राष्ट्रीय परिषद (येथे एकाचवेळी ४०,००० पाहुण्यांसाठी जेवण करण्यात आले.)
- २००० डिसेंबर : आंतरराष्ट्रीय पनीर महोत्सव.
- : कुरारा पराठा महोत्सव(विश्वविक्रमी पराठा हे या महोत्सवाचे ठळक वैशिष्ट्य)
- :' पुणे येथील कुरारा पराठा महोत्सव.
- : कुरारा पराठा महोत्सव.
- : हंगामा बारीश फूड फेस्टिव्हल आणि बरच काही.
- २००४ ऑक्टोबर : प्राण्यांसाठी संपूर्ण जेवण.
- : सावजी वराडी फूड फेस्टीव्हल.
- : मुंबई येथील हॉटेल ऑर्चिड येथे विदर्भ फूड फेस्टिव्हल.
- : ' गोवा कोकण फूड फेस्टीव्हल.
- : अमेटार चित्रपट निर्माते यांच्याकरिता लघुचित्रपट महोत्सव.
- २००५, २००९ आणि २०१२ ऑक्टोबर : ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित 'इनोव्हेटिव फॅशन शो'.
विष्णुजी हे प्रसिद्ध व लोकप्रिय बल्लवाचार्य अनेक पाककलास्पर्धांचा हिस्सा आहेत. ते ई टीव्ही मराठी व कलर्स मराठी या वाहिन्यांवरील 'मेजवानी परिपूर्ण '(मागील १४ वर्षे व ४००० भाग ) या कार्यक्रमाचे परीक्षक होते. त्यांनी झी २४ तास, सामना, लोकमत सखी मंच आणि रामबंधू मसाले आणि साम टीव्ही, दावत-ई-खाला (उर्दू दूरदर्शन) या प्रसारमाध्यमांसाठी लाईव्ह अर्थात थेट प्रक्षेपणाद्वारे पाककला स्पर्धांचे कार्यक्रम केले. विष्णू यांनी सुपरमार्केट व विमान संस्थाना मार्गदर्शन केले आहे. नुकतेच ते भारतीय अन्न महामंडळाचे (फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया)सदस्य म्हणून निवडले गेले आहेत. त्यांनी पाककलेवर आधारित ३६ पुस्तके व उपहारगृह चालवण्यामागील तंत्र यावर लेखन केले आहे. विष्णू मनोहर यांनी भारत व परदेशात (भूतान, दुबई, सिंगापूर,नेपाळ) ४५००हून अधिक कार्यक्रम केले आहेत. याद्वारे त्यांनी ४ लाखांहून अधिक महिलांना प्रशिक्षित केले आहे.
ते दूरदर्शनवर पाककलेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत असतात. भारत आणि संयुक्त अरब अमिराती या देशांत त्यांची मूलभूत भारतीय आमटीवर आधारित CD(सांद्रमुद्रिका) आणि ध्वनिचित्रफीत प्रकाशित करण्यात आली आहे. यास प्रसिद्ध परिचयात्मक अमीन सयानी यांचा आवाज असून तीत उत्तमोत्तम पाककृती आहेत. त्यांनी त्यांचे स्वतःचे संकेतस्थळ www.vishnumanohar.com हे तयार केले असून,यावर त्यांच्या साऱ्या पाककृती व त्यांवर आधारित कौशल्ये आहेत. तसेच त्यांचे मूलभूत भारतीय आमटीवर आधारित पुस्तक प्रकाशित होणार आहे.त्यांनी रेडीओ मिरचीवरील सीधे तवा से या कार्यक्रमाचे,तसेच विविधभारतीवरील चूल्हा चौका या कार्यक्रमाचे सुद्धा संचालन केले.
- त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण पार्श्वभूमी असणारी ''विष्णुजी की रसोई'' ही उपहारगृहांची (restaurant) शृंखला स्थापन केली आहे. या उपहारगृहात विदेशी मात्र अस्सल अन्न, पंजाबी व महाराष्ट्रीयन (मराठी) खाद्यपदार्थ केले जातात. त्यांच्या उपहारगृहाच्या शाखा नागपूर, पुणे, औरंगाबाद, इंदूर, ठाणे आणि कल्याण या शहरांत आहेत. तसेच मुंबईमध्येही या उपहारगृहाच्या शाखेचा आरंभ होणार आहे.
- ते स्वतःची आवड जोपासणारे,मनोरंजक तसेच प्रेरणादायक वक्ते आहेत. अभिनेता म्हणून त्यांनी २ मराठी चित्रपट तर १ हिंदी चित्रपट केला आहे.त्यांना प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मधू कांबीकर यांच्या सोबत काम केले. चित्रपटांची नावे :- १)झुंज एकाकी. २)हंबरडा. ३)हॉली बास्टर्ड (हिंदी चित्रपट).
- त्यांनी लहान मुलांकरिता ''बारू द वंडर किड'' हा अनिमेटेड(सजीव भासणारी चित्रे) चित्रपट दिग्दर्शित आणि निर्मित केला आहे.
'Books Published:-
- १०१ अंडेका फंडा
- खाऊचा डबा
- बिर्याणी आणि पुलाव
- बेकरी बेकरी
- भारतीय 'करी'चे रहस्य
- रसोई गोडोबा पक्वान्न विशेष
- रसोई - पौष्टिक आणि चटपटीत न्याहारी
- रसोई मराठी खाद्य परंपरा