Jump to content

आचारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

व्यावसायिक स्तरावर स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीस आचारी असे म्हणतात. खानावळीच्या क्षेत्रात "शेफ" आणि "आचारी" वेग-वेगळे असले तरी सर्वसाधारण बोलीभाषेमध्ये ह्या दोन शब्दांची अदलाबदल होते. मोठ्या खानावळीत व हॉटेल मध्ये आचार्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये अन्न तयार करणे, शेगडी/स्वयंपाकाचा ओटा व्यवस्थापित करणे, स्वयंपाकघर साफ करणे आणि शेफला मदत करणे यांचा समावेश होतो.[१] बऱ्याच वेळेस हॉटेल आचार्यांना त्यांच्या नियुक्तीत कामानुसार शीर्षक देतात,[२] ब्रॉयलर आचारी (कुक), फ्राय कुक, पॅन्ट्री कुक आणि सॉस कुक ही काही उदाहरणे आहेत.

संदर्भ[संपादन]

  1. ^ Riley, Rowan (2010). Hospitality, Human Services and Tourism. Infobase Publishing. pp. 2, 3. ISBN 9781438120775.
  2. ^ "Job Titles". National Restaurant Association. Archived from the original on 2018-01-25. 2018-01-29 रोजी पाहिले.