विश्वास नांगरे पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
विश्वास नांगरे पाटील
Vishwas nangare.jpg
जन्म ५ ऑक्टोबर १९७३
कोकरूड, शिराळा तालुका, सांगली जिल्हा
राष्ट्रीयत्व भारतीय
वांशिकत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
शिक्षण बी.ए., एम.बी.ए.
प्रशिक्षणसंस्था कोल्हापूर विद्यापीठ, उस्मानीया विद्यापीठ
पेशा आय.पी.एस्.
धर्म हिंदू धर्म
जोडीदार रुपाली नांगरे पाटील
अपत्ये जान्हवी, रणवीर
पुरस्कार राष्ट्रपती शौर्य पदक (२०१३)


विश्वास नांगरे पाटील (५ ऑक्टोबर, इ.स. १९७३; कोकरूड, शिराळा, सांगली - हयात) हे महाराष्ट्र पोलिसातील अधिकारी आहेत. ते सध्या (२०१९ साली) नासिक पोलिस आयुक्त. मुंबईवर २६ नोव्हेंबर इ.स. २००८ रोजी झालेल्या हल्ल्यांच्या वेळी ताज हॉटेलात शिरणारे ते पहिले पोलीस अधिकारी होते. नांगरे पाटील हे एक हुशार आणि प्रामाणिक अधिकारी आहेत. तसेच ते नवीन विद्यार्थ्यांना UPSC परीक्षेबद्दल वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात.

सुरुवातीचा काळ आणि शिक्षण[संपादन]

विश्वास नांगरे पाटील यांचा जन्म बत्तीस शिराळा या तालुक्यातील कोकरूड गावी झाला. त्यांचे वडील गावाचे सरपंच होते. त्यांनी आपले शालेय शिक्षण तालुक्यातील विद्यालयात पूर्ण केले आणि ते कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून इतिहास विषयात बी.ए. ची परीक्षा सुवर्ण पदक पटकावून उत्तीर्ण झाले. उस्मानिया विद्यापीठातून एम.बी.ए. ची पदवी घेऊन त्यांनी पुढे प्रशासकीय अभ्यासक्रमाला सुरुवात केली.•

कामगिरी[संपादन]

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण[संपादन]

पुणे जिल्हा ग्रामीण पोलीसदलात अधीक्षक असताना पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणी केलेल्या कारवाईमुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले.[१] पुणे ग्रामीण पोलिसांनी सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावातील शेतात सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर ४ मार्च २००७ ला छापा टाकून २८७ तरुण-तरुणींना(२१ तरुणीं) अटक केली होती.[१] प्रयोगशाळेत झालेल्या रासायनिक पृथक्करण अहवालानुसार त्यातील २४९ जणांनी अमली पदार्थांचे सेवन केल्याचे स्पष्ट झाले होते.[१]

२६/११ चा दहशतवादी हल्ला[संपादन]

२६/११च्या मुबंई हल्ल्याच्यावेळी ताजमहाल हॉटेलमध्ये पोहचणाऱ्या पहिल्या अधिकाऱ्यांपैकी ते एक होते. सोबत फक्त दोन कॉन्स्टेबल आणि एक अंगरक्षक तसेच अंगावर सुरक्षाकवच(बुलेटप्रुफ जाकीट) नसतांनाही ते गोळीबार सुरू असलेल्या ताजमध्ये शिरले.[२] प्रतिकारासाठी त्यांनी ९ एमएम पिस्तुलातून गोळीबार केला. दहशतवाद्यांचा पाठलाग करत ते सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचले.[२] त्यांच्या या कारवाईने दहशतवाद्यांना ताजमहाल हॉटेल नवीन इमारतीत जाण्यापासून रोखले. त्यानंतर नांगरे-पाटील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या कंट्रोल रूममध्ये पोहोचले व सीसीटीव्हीच्या मदतीने दहशतवाद्यांच्या हालचालींची माहिती वरिष्ठांना देत राहीले.[२] सकाळी सात वाजता एनएसजीचे कमांडो कारवाईत प्रत्यक्षात सहभागी होईपर्यंत विश्वास नांगरे-पाटील यांची लढाई सुरूच होती.[२]

कारकीर्द[संपादन]

  • अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक(अज्ञात दिनांक - २८ नोव्हेंबर २००५)[३]
  • पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक(२९ नोव्हेंबर इ.स. २००५ - ३ जून इ.स. २००८)[३]
  • मुंबई पोलीसदल उपायुक्त (४ जून इ.स. २००८- ?)[३]
  • ठाणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक
  • अप्पर पोलीस आयुक्त, मुंबई दक्षिण विभाग
  • सद्दस्थितीत नाशिक पोलिस आयुक्त (२ मार्च २०१९ पासून)[४]

पुरस्कार[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. a b c "रेव्ह पार्टीमधील २४८ जणांनी अमली पदार्थाचे सेवन केल्याचे निष्पन्न". लोकसत्ता. ८ एप्रिल २००७. 
  2. a b c d "विश्वास नांगरे-पाटील - नोंद". महाराष्ट्र टाइम्स. १३ डिसें. २००८. 
  3. a b c "सोशल पोलिसिंगमुळे गुन्ह्यांना प्रतिबंध". लोकमत(पुणे आवॄत्ती). ३ जून इ.स. २००८. 
  4. ^ {{स्रोत बातमी|दुवा=http://vishwasnangrepatil.blogspot.com


बाह्य दुवे[संपादन]

मन में है विश्वास लोकसत्ता खित 'मन में है विश्वास' या आत्मकथनपर ...

२२ मे, २०१६ - राजहंस प्रकाशनातर्फे पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील .