"अवेस्ता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
४ बाइट्सची भर घातली ,  ६ महिन्यांपूर्वी
छो
शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो (शुद्धलेखन (अधिक माहिती))
छो (शुद्धलेखन (अधिक माहिती))
अवेस्ता हा शब्द 'अविस्ताक-ज्ञान, ज्ञानदेणारें पुस्तक' या पहलवी भाषेतल्या शब्दावरून बनलेला आहे. अवेस्ता ग्रंथ, हा नष्टप्राय झालेल्या धर्माचा मुख्य ग्रंथ आहे. जगातील इतर कोणत्याही धर्माचा या धर्माच्या इतका कमी प्रसार नसेल हे खरें, तरी पण या अवेस्ता ग्रंथाचे व त्यामध्ये सांगितलेल्या धर्माचे ऐतिहासिकदृष्ट्या फार महत्त्व आहे. या धर्मग्रंथांत खिस्ती शकापूर्वी ५०० वर्षांपूर्वींच्या व ख्रिस्तीशकानंतर ७०० वर्षांच्या अवधींतील इराणी लोकांच्या धर्मकल्पना, समजुती, आचारविचार यांची माहिती सांपडते; इतकेच नव्हे तर या धर्मग्रंथाच्या व त्यांत सांगितलेल्या धर्माच्या साहाय्यानें, पर्शुभारतीय काळावर म्हणजे वैदिक आर्यांच्या भारतप्रवेशापूंर्वीच्या काळावर प्रकाश पडण्याचा पुष्कळ संभव आहे. हल्ली उपलब्ध असलेला अवेस्ता ग्रंथ हा एका काळच्या मोठ्या वाड्मयाचा केवळ अवशेष होय. मूळ अवेस्ताग्रंथाची १२०० प्रकरणें होतीं असें पहलवी दंतकथांवरून समजते. अवेस्ताग्रंथ १२०० गाईंच्या कातड्यावर कोरला होता असे टबरी व मसूदी या इतिहासकारांनी म्हटले आहे. या ग्रंथाच्या विस्ताराबद्दल प्राचीन सीरियन लेखक सुद्धा साक्ष देतात व प्लिनी नावाच्या रोमन पंडित झोरोआस्टरने २० लक्ष कविता रचल्या असे म्हटले आहे. खुद्द उपलब्ध अवेस्ताग्रंथाचे अंतरंगपरीक्षण केले तरी हेच दृष्टोत्पत्तास येते. पण सर्वात बलवत्तर प्रमाण म्हणजे पहलवी भाषेतील डिनकर्त या ग्रंथाचें व पर्शियन रिवायतग्रंथांचें होय. या ग्रंथांत प्राचीन अवेस्ताग्रंथाच्या विस्ताराबद्दल व त्यातील मजकुराबद्दलची संपूर्ण माहिती आलेली आहे.
 
पूर्वकाळी व विशेषत:विशेषतः अकिमेनियन राजांच्या अंमलाखाली या धर्मग्रंथाचे रक्षण मोठ्या आस्थेने होत होते. झोरोआस्टरचा सहाय्यक जो विष्तास्प राजा त्याने अवेस्ता ग्रंथ सोनेरी अक्षरांत लिहून काढवून तो ग्रंथ पर्सेपोलीस येथील आपल्या दफ्तरकचेरीत ठेवला होता असे टबरीने म्हटले आहे, व डिनकर्त ग्रंथावरूनही हीच गोष्ट दिसून येते. या ग्रंथाची दुसरी एक सोन्याच्या विटांवर कोरलेली १२०० प्रकरणात्मक प्रत समरकंदमधील अग्यारी (अग्निगृह) मधील खास खजिन्यांत ठेवली होती असें शात्रोइहा-इ ऐरान या पहलवी ग्रंथावरून समजते. पण या दोन प्रतींचा अलेक्झांडरच्या स्वारीमध्ये ज्यावेळीं पर्सेपोलीस व समरकंद हे ग्रीकांच्या हाती आले त्यावेळी नाश झाला.
 
[[अलेक्झांडर]]च्या मागून [[सेल्युकस]]च्या अंमलाखाली व पार्थियन अमदानींताहि, अवेस्ता ग्रंथाचा पुष्कळ भाग नामशेष झाला. तथापि अशा हालाखीच्या स्थितींतहि अवेस्ताचा बराच भाग शिल्लक होता व काही भाग पारशी उपाध्यायांच्या तोंडात शतकाच्या प्रारंभी शिल्लक राहिलेल्या अवेस्ता ग्रंथाचें एकीकरण करण्याचा प्रयत्‍न झाला. वष्कश राजानें उपलब्ध अवेस्ता ग्रंथ लिहून काढण्यांत यावे, अशी आज्ञा जाहीर केली. सस्सानियन घराण्याच्या संस्थापकाने हीच परंपरा सुरू ठेवली. त्यामुळे या एकत्रीकरणाच्या प्रश्नाला चालना मिळाली व दुसऱ्या शापूरच्या कारकीर्दीत (३०९-३८०) आदरबाद मारसपंद या मुख्य प्रधानाच्या देखरेखीखाली या उपलब्ध ग्रंथाने एकत्रीकरण झाले; व हा तयार झालेला ग्रंथ प्रमाण ग्रंथ म्हणून मानण्यांत येऊं लागला. पण अलेक्झांडरच्या स्वारीने जे पारशांचे व त्यांच्या धर्मग्रंथांचे नुकसान झाले नाही ते [[मुसलमान]]ांच्या प्रशियावरील स्वारीने झाले. मुसलमानांनी इराण पादाक्रांत केल्यावर त्यांनी आपल्या नेहमींच्या पद्धतीप्रमाणें धर्मच्छल करण्यास सुरूवात केली. ज्या ज्या ठिकाणी [[धर्मग्रंथ]] सांपडतील ते सर्व गोळा करून त्यांचा नाश करावा असे फर्मान काढण्यांत आले व पारशांचा फार छळ करण्यांत आला. त्यामुळे पारशी लोकांना देशत्याग करणे भाग पडले. त्यांच्याबरोबर जेवढा अवेस्ता ग्रंथाचा भाग नाशातून वाचला तेवढा रक्षिला गेला. पारशी लोकांपैकी बऱ्याच लोकांनी बाटण्याच्या भीतीने [[भारत]]ाचा मार्ग धरला. भारतात असता राखण्यात आलेला अवेस्ता ग्रंथाचा भाग पुन्हा लिहून काढण्यात आला. त्या प्रतींपैकी कांही प्रती १३-१४ व्या शतकामधील असून त्या उपलब्ध आहेत. पण कोणत्याही एका प्रतीत समग्र अवेस्ता ग्रंथ एकत्र असलेला आढळत नाही.
इ.स. १८२५ च्या सुमारास पाश्चात्य संस्कृत पंडितांचे इकडे लक्ष्य वेधले. संस्कृत व अवेस्तन भाषेंत बरेंच साम्य आहे असे डू पेरा वगैरे विद्वानांनी सिद्ध केलेंच होते. पण रस्क नांवाच्या डॅनिश भाषाशास्त्रज्ञानें या दोन भाषांत काय साम्य आहे हें सप्रमाण दाखवून दिलें. हा पंडित स्वतःइराणमध्ये गेला होता व तेथून त्यानें अवेस्ता ग्रंथाच्या प्रती व पहलवी भाषांतरें जमवून आणलीं. १८२६ सालीं त्यानें एक छोटासा ग्रंथ लिहून त्यांत, अवेस्तन भाषा फार प्राचीन असून तिच्यामध्ये व संस्कृतमध्ये बरेंच साम्य आहे. ती भाषा संस्कृताहून भिन्न पण, निकटसंबद्ध आहे असें सिद्ध केलें व अवेस्ता ग्रंथांतील लिपीसंबंधाचेहि त्यानें बरेच शोध केले.
 
यानंतर बर्नाफ नांवाच्या फ्रेंच पंडितानें अवेस्ताचा अभ्यास चालविला होता. डू पेराच्या भाषांतरांत बऱ्याच चुका त्याला आढळल्यामुळें त्यानें नर्योसंघाच्या संस्कृत रूपांतराच्या सहाय्यानें अवेस्ता वाचला व डू पेराच्या भाषांतरांतील पुष्कळ चुका दुरुस्त केल्या. यानंतर या दिशेनें व विशेषत:विशेषतः अवेस्तन लिपीसंबंधानें वॉप, हॉग, विंडीशमन, वेस्तरगार्ड, रोट, स्पीजेल इत्यादि पंडितांनीं फार प्रयत्‍न केले. या पंडितांमध्ये, अवेस्ता ग्रंथाची माहिती करून घेण्याच्या कामीं, प्राचीन टीकाग्रंथाचा व तत्कालीन इतर उल्लेखांचा आश्रय करावयाचा अगर तौलनिक भाषाशास्त्राचें साहाय्य घ्यावयाचें यासंबंधीं वाद माजला होता. पण दोन्ही साधनें सापेक्ष व परस्परसाहाय्यकारी आहेत व त्या दोहोंचाहि उपयोग करून घेणें जरूर आहे हें मत हल्लीं प्रस्थापित झालें आहे.
 
== हे सुद्धा पहा ==
८२,४४५

संपादने

दिक्चालन यादी