"रोख पत खाते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: बँकेत उघडल्या जाणाऱ्या व्यावसायिक प्रकारच्या खात्यामधील एक प्...
 
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
खूणपताका: अमराठी मजकूर
ओळ १२: ओळ १२:


५) व्यवसायातील माल , देणेकरी अथवा अचल मालमत्ता [[तारण]] ठेवून रोख पत खाते उघडता येते.
५) व्यवसायातील माल , देणेकरी अथवा अचल मालमत्ता [[तारण]] ठेवून रोख पत खाते उघडता येते.

[[वर्ग:बँकिंग]]

१६:१०, ७ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

बँकेत उघडल्या जाणाऱ्या व्यावसायिक प्रकारच्या खात्यामधील एक प्रकार म्हणजे रोख पत खाते (इंग्लिश - Cash Credit Account). रोख पत खाते हे एकप्रकारचे कर्ज खाते असते. ज्या व्यावसायिकाला रोजच्या कामासाठी अचानक पैशाची गरज लागू शकते असा व्यावसयिक बँकेकडे रोख पत खाते उघडण्यासाठी अर्ज करू शकतो. या अर्जाची तपासणी करून बँक ग्राहकालाखात्यातून ठराविक रक्कम काढण्याची मर्यादा ठरवून देते. रोख पत खाते असणारा ग्राहक खात्यामध्ये शिल्लक नसली तरी आपल्या खात्यावर दिलेल्या मर्यादेपर्यंत रक्कम नावे करून काढू शकतो.

रोख पत खात्याची वैशिष्ट्ये

१) रोख पत खाते व्यवसायामध्ये लागणाऱ्या तरल भांडवलाच्या पूर्तीसाठी दिले जाते

२) रोख पत खातेधारकास दिलेल्या मर्यादेपर्यंतच रक्कम काढता येते.

३) रोख पत खात्यामध्ये जमा असणाऱ्या रकमेवर व्याज दिले जात नाही.

४) रोख पत मर्यादा ठराविक रक्कम आणि कालावधीसाठी असते

५) व्यवसायातील माल , देणेकरी अथवा अचल मालमत्ता तारण ठेवून रोख पत खाते उघडता येते.