"शहापूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ १४: ओळ १४:


==दळणवळण==
==दळणवळण==
शहापूर हे तालुक्याचे मुख्यालय असून या तालुक्यामध्ये जवळजवळ ६० गावे येतात. त्यांपैकी [[किन्हवली]], [[डोळखांब]], शेणवा, वासिद ही बाजाराची प्रमुख ठिकाणे आहेत. तालुक्यात खरीड[गगे], [[गुंड्याचा पाडा]], चोंढा, नेहरोली, गेगाव अशी अनेक छोटी खेडी आहेत
शहापूर हे तालुक्याचे मुख्यालय असून या तालुक्यामध्ये जवळजवळ ६० गावे येतात. त्यांपैकी [[किन्हवली]], [[डोळखांब]], शेणवा, वासिद ही बाजाराची प्रमुख ठिकाणे आहेत. तालुक्यात खरीड[गगे], [[गुंड्याचा पाडा]], टेंभूर्ली, माणगाव, धसई, अंदाड, खर्डी,कसारा, चोंढा, नेहरोली, गेगाव अशी अनेक छोटी खेडी आहेत


[[वर्ग:ठाणे जिल्हा]]
[[वर्ग:ठाणे जिल्हा]]

१९:१८, ९ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

शहापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातल्या ठाणे जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे. शहापूर हे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मुंबई पासून ९० कि. मी. अंतरावर वसले आहे. आसनगाव हे सर्वात जवळचे रेल्वे स्थानक असून ते मुंबईच्या व्हीटी-कसारा या उपनगरीय रेल्वेमार्गावर मुंबई सी.एस.टी पासून ८५ कि. मी. अंतरावर आहे.

शहापूर हा ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे. शहापूर तालुक्यात मुंबईला पाणी पुरवठा करणारी तानसा, वैतरणा आणि भातसा ही तीन धरणे आहेत. सह्याद्रीने वेढलेल्या शहापूर गावालगत किल्ले माहुली व आजोबा डॊंगर ही गिर्यारोहणाची ठिकाणे आहेत.

२००१ च्या जनगणनेनुसार शहापूरची लोकसंख्या १०,४९० असून, ह्यात ५,५७१ पुरुष व ५,११९ स्त्रियांचा समावेश होतो.

भूगोल

शहापूर १९.४५ अ़क्षांश उत्तरेस व ७३.३३३ रेखांश पूर्वेस असून समुद्र सपाटीपासून ४५ मी. उंचीवर वसले आहे.

शहापूरकर

विविध जाती धर्माचे लोक वर्षानुवर्षे शहापूरमध्ये एकत्र सुखाने नांदत आहेत. ह्यात प्रामुख्याने हिंदू, जैन, बौद्ध व मुस्लीम धर्मीय लोकांचा अंतर्भाव होतो. हिंदूंमध्ये प्रामुख्याने कुणबी(मराठा), ब्राह्मण, वाणी, मराठा, लेवा पाटील इत्यादी जातींचे लोक आहेत.

नोकरी हे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असल्याने रोज कामानिमित्त मुंबईस ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. उपनगरीय रेल्वे हे दळणवळणाचे प्रमुख साधन आहे. काही लोकांचा शेती हा व्यवसाय आहे. येथे प्रामुख्याने भात शेती केली जाते.

दळणवळण

शहापूर हे तालुक्याचे मुख्यालय असून या तालुक्यामध्ये जवळजवळ ६० गावे येतात. त्यांपैकी किन्हवली, डोळखांब, शेणवा, वासिद ही बाजाराची प्रमुख ठिकाणे आहेत. तालुक्यात खरीड[गगे], गुंड्याचा पाडा, टेंभूर्ली, माणगाव, धसई, अंदाड, खर्डी,कसारा, चोंढा, नेहरोली, गेगाव अशी अनेक छोटी खेडी आहेत