"विनायक सीताराम आठल्ये" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: '''आठल्ये गुरुजी''',संपूर्ण नाव विनायक सीताराम आठल्ये (जन्म : भडकंबा,... खूणपताका: प्रथम-द्वितीय पुरुष--लेखन तृतीयपुरूषात बदला |
(काही फरक नाही)
|
२२:२२, १८ मे २०१२ ची आवृत्ती
आठल्ये गुरुजी,संपूर्ण नाव विनायक सीताराम आठल्ये (जन्म : भडकंबा, फ़ेब्रुवारी १, इ.स.१९१४;मृत्यू : रत्नागिरी, मे ६, इ.स.२०१२) हे वेदविद्याविभूषित, प्रकांड पंडित आणि घनपाठी होते.
ऋग्वेदाच्या शाकल शाखेतून दशग्रंथांसह घनान्त पदवीपर्यंत त्यांनी वेदमूर्ती नरसिंहभट्ट कानिटकर, वेदमूर्ती महादेवभट्ट पुरोहित व वेदमूर्ती काशिनाथभट्ट केळकर या गुरूंकडून वेदादि दशग्रंथांचे ज्ञान मिळवले. पुण्यातील वेदशास्त्रोत्तेजक सभेची परीक्षा, बडोद्यातील श्रावणमास दक्षिणा परीक्षा, पंढरपूर येथील गर्गगुरू विद्यापीठाची परीक्षा व गुजरातच्या अंबाजी देवस्थान येथील अखिल भारतीय वेदस्पर्धा आदींमध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले होते. घनपाठ करणे अतिशय कठीण समजले जाते. आठल्ये गुरुजींनी त्यात आपले स्थान निर्माण केले. नऊ घनपारायणांचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.
त्यांनी २५ वर्षे सांगलीतील श्री गणपती संस्थान वेदपाठशाळेत, तर १६ वर्षे रत्नागिरीतील वेद-पाठशाळेत अध्यापन करून अनेक विद्यार्थी घडवले आहेत. घनपाठांद्वारा वेदवाङ्मयाची मौखिक परंपरा टिकवण्यासाठी आठल्ये गुरुजींनी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे.