विनायक सीताराम आठल्ये

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विनायक सीताराम आठल्ये
जन्म विनायक सीताराम आठल्ये
फेब्रुवारी १, इ.स. १९१४
भडकंबा, रत्‍नागिरी जिल्हा, महाराष्ट्र
मृत्यू मे ६, इ.स. २०१२
रत्‍नागिरी
निवासस्थान रत्‍नागिरी
राष्ट्रीयत्व भारतीय
टोपणनावे आठल्ये गुरूजी
नागरिकत्व भारतीय
मूळ गाव भडकंबा
धर्म हिंदू ब्राह्मण


विनायक सीताराम आठल्ये, अर्थात आठल्ये गुरुजी, (जन्म : भडकंबा, फेब्रुवारी १, इ.स. १९१४; - रत्‍नागिरी-महाराष्ट्र, मे ६, इ.स. २०१२) हे वेदविद्याविभूषित प्रकांड पंडित आणि घनपाठी होते.

वेदविद्या[संपादन]

आठल्ये गुरुजींनी वेदमूर्ती नरसिंहभट्ट कानिटकर, वेदमूर्ती महादेवभट्ट पुरोहित व वेदमूर्ती काशिनाथभट्ट केळकर या गुरूंकडून ऋग्वेदाच्या शाकल शाखेतून वेदादि दशग्रंथांसह घनान्त पदवीपर्यंत ज्ञान मिळवले. पुण्यातील वेदशास्त्रोत्तेजक सभेची परीक्षा, बडोद्यातील श्रावणमास दक्षिणा परीक्षा, पंढरपूर येथील गर्गगुरू विद्यापीठाची परीक्षा व गुजरातच्या अंबाजी देवस्थान येथील अखिल भारतीय वेदस्पर्धा आदींमध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले होते. घनपाठ करणे अतिशय कठीण समजले जाते. आठल्ये गुरुजींनी त्यात आपले स्थान निर्माण केले. नऊ घनपारायणांचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.

त्यांनी २५ वर्षे सांगलीतील श्री गणपती संस्थान वेदपाठशाळेत, तर १६ वर्षे रत्‍नागिरीतील वेद-पाठशाळेत अध्यापन करून अनेक विद्यार्थी घडवले आहेत. घनपाठांद्वारा वेदवाङ्मयाची मौखिक परंपरा टिकवण्यासाठी आठल्ये गुरुजींनी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]