Jump to content

"मराठी भाषेचा इतिहास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १९: ओळ १९:
==मतभिन्नता==
==मतभिन्नता==
==मराठीचे भाषिक परिवर्तन==
==मराठीचे भाषिक परिवर्तन==
*संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश, महाराष्ट्री असे बदल होत मराठी भाषा बनत गेली. मराठीने संस्कृत भाषेतून अधिकाधिक शब्द घेतले. त्यांना तत्सम शब्द म्हणतात. अनेक मराठी शब्द संस्कृत शब्दांपासून थोडाफार बदल होऊन बनले. अशा शब्दांना तद्भव शब्द म्हणतात. याशिवाय मराठी भाषेने पाली, अर्धमागधी, हिंदी, फारसी, अरेबिक, तुर्की, उर्दू, इंग्रजी, पोर्तुगीज या भाषांतूनही बरेच शब्द घेतले. मराठीतले काही शब्द तर तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, गुजराथी, ओरिया, बंगाली या भाषांमधूनदेखील आले. त्यामुळे संस्कृतपेक्षा मराठीचे वेगळेपण अधोरेखित होते. याउलट मराठी भाषेतून अनेक शब्द इंग्रजी, हिंदी, गुजराथी आणि इतर भारतीय भाषांनी घेतले.
*प्राकृत, अपभ्रंश, पाली, संस्कृत, तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, गुजराथी, ओरिया, हिंदी, आरेबिक, फार्सि, उर्दू, इंग्लिश, पोर्तुगिज, पंचद्रविड, आर्यभाषाकुल संस्कृतचा प्रभाव
मराठी भाषा लोकांना आवडते; कारण ती काळाच्या ओघात स्वतःला बदलवून घेते. मूळ मराठी ही जणू काही संस्कृतच आहे.
संस्कृतपेक्षा वेगळेपण. वरील भाषांतून मूळ मराठी भाषेत असंख्य शब्द आले आहेत, तसेच मराठीतूनही इतर भाषांमध्ये काही शब्दांची देवाणघेवाण झाली आहे.
मराठी भाषा लोकांना आवडते; कारण ती काळाच्या ओघात स्वतःला बदलवून घेते. मूळ मराठी ही जणू संस्कृतच आहे. मराठीत संस्कृतमधून अधिक शब्दप्रवेश झाला आहे.



==ग्रंथ==
==ग्रंथ==

२२:५५, १७ एप्रिल २०१० ची आवृत्ती

मराठी भाषेच्या इतिहासाची उपलब्ध साधने

मराठी भाषेच्या इतिहासाची उपलब्ध साधने ग्रांथिक साधने,कोरीव लेख-शिलालेख,ताम्रपट;लोकसाहित्य, अप्रत्यक्ष साधने

प्रमाण साधने कागदपत्रांचा आधार शासकिय आदेश, राजाने काढलेली फर्माने आज्ञापत्रे, करारनामे, तहनामे आपापसातील पत्रव्यवहार दुय्यम साधने तवारिखा,बखरी,पोवाडे,स्रोत्रे

महाराष्ट्राचा सामाजिक राजकिय इतिहास आणि मराठी भाषा

आर्य आणि द्रविड

मतभिन्नता

मराठीचे भाषिक परिवर्तन

  • संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश, महाराष्ट्री असे बदल होत मराठी भाषा बनत गेली. मराठीने संस्कृत भाषेतून अधिकाधिक शब्द घेतले. त्यांना तत्सम शब्द म्हणतात. अनेक मराठी शब्द संस्कृत शब्दांपासून थोडाफार बदल होऊन बनले. अशा शब्दांना तद्भव शब्द म्हणतात. याशिवाय मराठी भाषेने पाली, अर्धमागधी, हिंदी, फारसी, अरेबिक, तुर्की, उर्दू, इंग्रजी, पोर्तुगीज या भाषांतूनही बरेच शब्द घेतले. मराठीतले काही शब्द तर तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, गुजराथी, ओरिया, बंगाली या भाषांमधूनदेखील आले. त्यामुळे संस्कृतपेक्षा मराठीचे वेगळेपण अधोरेखित होते. याउलट मराठी भाषेतून अनेक शब्द इंग्रजी, हिंदी, गुजराथी आणि इतर भारतीय भाषांनी घेतले.

मराठी भाषा लोकांना आवडते; कारण ती काळाच्या ओघात स्वतःला बदलवून घेते. मूळ मराठी ही जणू काही संस्कृतच आहे.

ग्रंथ

ज्ञानेश्वरी,लीळाचरित्र,विवेकसिंधू,ज्योतिषरत्नमाला, ==शिलालेख ==ताम्रपट

मराठीच्या विकासाचे टप्पे

उगम,पूर्वमराठी काळ

आदिपर्व

मराठीचे मध्ययूग

अर्वाचीन

आधुनिक

भाषाशुद्धी चळवळ

स्वातंत्र्यवीर सावरकर १९२३ पासून १९३७ पर्यंत रत्‍नागिरीला स्थानबद्ध होते.प्रत्यक्ष राजकारणात भाग घ्यायला त्यांना बंदी होती. तेव्हा त्यांनी समाजातील अंधश्रद्धा ,कालबाह्य रूढी यांवर टीका करणारे पुष्कळ लेख 'किर्लोस्कर' मासिकातून लिहिले. १९२४ मध्ये 'केसरीत' 'मराठी भाषेचे शुद्धीकरण' ही लेखमाला लिहिली.याच शीर्षकाची पुस्तिका नंतर प्रकाशित झाली.

ही लेखमाला सावरकरांनी रत्‍मागिरीत स्थानबद्ध असताना लिहिली असल्यामुळे आणि सावरकरांबद्दल सुशिक्षित समाजास आदर आणि कुतूहल वाटत असल्यामुळे त्यांच्या सांगण्याचा अनेकांवर प्रभाव पडला .भाषाशुद्धी करणे हे राष्ट्रकार्यच आहे. त्यामुळे आपण जरी राजकारणात भाग घेऊन इंग्रजी राजवटीचा प्रतिकार करू शकलो नाही तरी सावरकर सुचवितात त्याप्रमाणे आपल्या भाषेचे शुद्धीकरण करून त्या रूपाने इंग्रजीची ह्कालपट्टी करू शकतो अशी सावरकरांच्या अनुयायांची श्रद्धा होती.

अरबी-फारसी आणि इंग्रजी शब्दांच्या ऐवजी मराठी आणि संस्कृत शब्दप्रयोग करावेत असे विनायक दामोदर सावरकर व त्यांच्या अनुयायांचे मत होते. ही सावरकरांची भूमिका माधवराव पटवर्धनांनी थोड्या फरकाने म्हणजे शक्य तिथे संस्कृतसुद्धा टाळावे व मराठी शब्द वापरावे अशा स्वरूपात मांडली(जळगाव साहित्य संमेलन अध्यक्षीय भाषण १९३६).

भाषाशुद्धी भूमिकेच्या मर्यादासुद्धा विविध व्यक्तींनी व्यक्त केल्या तर काहींनी टीकाही केली. १९२७च्या पुणे साहित्य संमेलनात श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी भूमिका अशी घेतली की कोणतीही भाषा अन्य भाषासंपर्कापासून अलिप्त राहू शकत नाही. दीर्घकाळ एकमेकींच्या सहवासात आदान-प्रदान होणे ही स्वाभाविक क्रिया आहे. जे शब्द मराठीशी एकरूप झाले आहेत ते केवळ अन्य भाषांतून आले या कारणासाठी त्यांना बहिष्कृत करणे अव्यवहार्य आहे. मराठीत हवा, जमीन, वकील गरीब, सराफ, महाल, इलाखा, जिल्हा, मुलुख, मसाला, हलवा, गुलकंद, बर्फी, मुद्दा ,अत्तर, तवा ,तपशील, सरबत असे शेकडो अरबी-फारसी शब्द आले आहेत व ते मराठीचा एक भाग झाले आहेत. त्यांना मराठीतून काढून टाकणे अशक्य आहे.

प्राध्यापक श्री.के. क्षीरसागर यांचा विरोध अधिक तीव्र होता."खरी भाषाशुद्धी आणि तिचे खरे वैरी सावरकर आणि पटवर्धन" हा क्षीरसागरांचा आक्रमक शैलीतील लेख त्या वेळच्या सह्याद्री मासिकात प्रकाशित झाला,त्यामुळे बरीच खळबळ निर्माण झाली. 'सह्याद्री' आणि 'लोकशिक्षण' या त्यावेळच्या मासिकांमधून भाषाशुद्धीबद्दलची मतमतांतरे मांडणारे अनेक लेख प्रकाशित झाले.

प्रा. क्षीरसागरांच्या मते भाषाशुद्धिवाद्यांना क्लिष्ट आणि विकृत शब्द निर्मितीचा रोग जडला आहे.भाषाशुद्धीचे कारण पुढे करून हल्ली जो उठतो तो नवे शब्द बनवत सुटला आहे. यामुळे मराठीचे स्वाभाविक सौंदर्य बिघडत असून फारसी आणि इंग्रजी शब्दांचे उच्चाटन व्हायच्या ऐवजी त्यांची आठवण पक्की होत आहे.

गोल्डन मीन साठी 'सुवर्णमध्य' 'क्रोकोडाईल टियर्स' साठी 'नक्राश्रू'; 'रेकॉर्ड ब्रेक' ला 'उच्चांक मोडणे' हे किंवा असले शब्द म्हणजे शब्दाला शब्द ठेवून केलेली भाषांतरे होत. या भाषांतरित शब्दांमुळे मूळ इंग्रजी शब्दच कृत्रिम रूपाने मराठीत येत आहेत. सर्वसामान्य मराठी माणसालाही कोणता शब्द कोठे वापरावयाचा ते स्वभावतःच कळते.'कमाल' शब्द त्याज्य आणि 'पराकाष्ठा' तेवढा स्वीकार्ह असे तो मानणार नाही.तर 'प्रयत्‍नांची पराकाष्ठा' आणि 'मूर्खपणाची कमाल' असा योग्य वापर तो करील.

परभाषांमुळे अधिक पर्याय उपलब्ध होतात. त्यामुळे सूक्ष्म अर्थच्छटा व्यक्त करायला त्यांचा उपयोग होतो हे मत गो.कृ. मोडक यांनीही मांडले आहे. अर्भक, संतान, संतती, मूल, बालक हे सगळे स्वकीय शब्द आहेत. पण कोणता शब्द कोठे वापरावयाचा याचे संकेत वेगळे आहेत. यात औलाद या परकीय शब्दामुळे आणखी भर पडली आहे. सह्याद्री मासिकासाठी एका विस्तृत लेखाद्वारा न.चिं. केळकरांनी भाषाशुद्धीचे स्वागत करूनही तिच्या मर्यादा स्पष्ट केल्या आहेत. त्यांच्या पद्धतीने युक्तिवाद करताना त्यांनी म्हटले आहे, 'तत्त्वात जिंकाल पण तपशिलात हराल'.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 'भाषाशुद्धी' या प्रश्नाची 'चळवळ' होण्यासारखी स्थिती उरली नसली तरी अनेक भाषिक प्रश्नांची गुंतागुंत वाढली आहे असे दिसून येते.