"शीतल साठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ २४: | ओळ २४: | ||
| स्वाक्षरी चित्र = |
| स्वाक्षरी चित्र = |
||
}} |
}} |
||
'''शीतल साठे''' या एक मराठी लोकगीत गायिका, शाहीर, कवयित्री आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या आहेत. त्या [[इ.स. २०००]]च्या सुमारास महाराष्ट्रातील [[कबीर कला मंच]] ह्या कलापथकाच्या त्या एक मुख्य कलाकार होत्या. |
'''शीतल साठे''' या एक मराठी लोकगीत गायिका, शाहीर, कवयित्री आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या आहेत. त्या [[इ.स. २०००]]च्या सुमारास महाराष्ट्रातील [[कबीर कला मंच]] ह्या कलापथकाच्या त्या एक मुख्य कलाकार होत्या. दलित, वंचित, शोषितांच्या व्यथा, त्यांचे प्रश्न शाहिरीच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून लोकांसमोर मांडत असतात. भांडवलदारांविरोधात त्या आवाज उठवतात. |
||
साठे आणि त्यांचे तरूण साथीदार ''विद्रोही शाहीर जलसा'' प्रकारची गीते गातात. त्यात बिहारच्या मजूरांची, पंजाबच्या शेतकऱ्यांची तसेच देशातल्या अनेक वंचित समाजाचे प्रश्न उद्धृत केले जातात. त्यांच्या म्हणण्यानुसार, ''देशात व जगात पसरलेली असमानता आणि शोषणाला नष्ट करण्यासाठी जनतेला जागे करण्यासाठी त्या गीत गायन करतात.'' |
साठे आणि त्यांचे तरूण साथीदार ''विद्रोही शाहीर जलसा'' प्रकारची गीते गातात. त्यात बिहारच्या मजूरांची, पंजाबच्या शेतकऱ्यांची तसेच देशातल्या अनेक वंचित समाजाचे प्रश्न उद्धृत केले जातात. त्यांच्या म्हणण्यानुसार, ''देशात व जगात पसरलेली असमानता आणि शोषणाला नष्ट करण्यासाठी जनतेला जागे करण्यासाठी त्या गीत गायन करतात.'' |
२०:४४, १४ जून २०२० ची आवृत्ती
शीतल साठे | |
---|---|
जन्म: | इ.स. १९८५ कासेवाडी वस्ती, पुणे, महाराष्ट्र |
चळवळ: | आंबेडकरी चळवळ |
संघटना: | कबीर कला मंच नवयान महाजलसा |
धर्म: | नवयान बौद्ध धर्म |
प्रभाव: | डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे |
वडील: | हनुमंत साठे |
आई: | संध्या साठे |
पती: | सचिन माळी |
अपत्ये: | अभंग |
शीतल साठे या एक मराठी लोकगीत गायिका, शाहीर, कवयित्री आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या आहेत. त्या इ.स. २०००च्या सुमारास महाराष्ट्रातील कबीर कला मंच ह्या कलापथकाच्या त्या एक मुख्य कलाकार होत्या. दलित, वंचित, शोषितांच्या व्यथा, त्यांचे प्रश्न शाहिरीच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून लोकांसमोर मांडत असतात. भांडवलदारांविरोधात त्या आवाज उठवतात.
साठे आणि त्यांचे तरूण साथीदार विद्रोही शाहीर जलसा प्रकारची गीते गातात. त्यात बिहारच्या मजूरांची, पंजाबच्या शेतकऱ्यांची तसेच देशातल्या अनेक वंचित समाजाचे प्रश्न उद्धृत केले जातात. त्यांच्या म्हणण्यानुसार, देशात व जगात पसरलेली असमानता आणि शोषणाला नष्ट करण्यासाठी जनतेला जागे करण्यासाठी त्या गीत गायन करतात.
जीवन
पुणे शहरातील कासेवाडी नावाच्या एका दलित वस्तीत साठेंचा जन्म झाला. शीतल साठे व त्यांच्या सहकाऱ्यांचे जीवन खूप संघर्षाचे राहिले आहे, मात्र तरीही त्यांनी कला, विचार आणि माणूसकी यांना समृद्ध करण्याचे कार्य केले आहे.
गायन
शीतल साठेंनी आपले शिक्षण पुण्याच्या फर्ग्यूसन महाविद्यालयातून केले परंतु महाविद्यालयात जाण्यापूर्वीच त्यांनी गायन सुरू केले होते. या दरम्यान सचिन माळी आणि कबीर कला मंचाच्या कलावंतांच्या संपर्कात आल्या. सुरूवातील त्यांना वैचारिक गोष्टींत आकर्षण नव्हते. शीतल साठे केवळ गायनाच्या जगातच काही करू इच्छित होत्या. सचिन माळी आणि कबीर कला मंचाच्या सहकार्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्व विकासात मोठे योगदान दिले."
जय भीम कॉम्रेड
पटवर्धनांचा चित्रपट, 'जय भीम कॉम्रेड' पासून शीतल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार आणि महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला. पुरस्काराच्या रकमेतून ‘कबीर कला मंच डिफेन्स कमेटी’ स्थापन केली गेली.
आरोप
मे २०११ मध्ये महाराष्ट्र एटीस ने तथाकथित नक्षलवादाचे समर्थन करण्याच्या आरोपाखाली दाखल केलेल्या खटल्यामुळे शीतल साठे व त्यांचे पती सचिन माळी आणि त्यांच्या कबीर कला मंचाच्या इतर १५ सहकाऱ्यांना भूमिगत व्हावे लागले होते.[१] याशिवाय या दोघांसह इतर सहकाऱ्यांवर असंवधानिक गतिविधि निवारण अधिनियमाच्या अनेक इतर कलमांनुसार आरोप सुद्धा लावले गेले होते. शीतल व सचिन दोघे स्वतःहून २ एप्रिल २०१३ रोजी मुंबई येथे पोलिसांना शरण गेली, पण त्यांच्यावरील आरोप त्यांनी मान्य करण्यास नाकारले.[२]
शीतल गर्भवती असूनसुद्धा, ४ जून २०१३ रोजी मुंबई सेक्शन न्यायालयाने त्या दोघांचीही जामीनाची विनंती फेटाळली. शेवटी २८ जून २०१३ रोजी बाँबे हायकोर्टद्वारे शीतलला मानवी आधारावर जामीन देण्यात आला.[३]
संदर्भ आणि नोंदी
- ^ "शीतल साठे, सचिन माळी नक्षलवादीच!". Loksatta. 2013-04-22. 2018-05-29 रोजी पाहिले.
- ^ "शीतल साठे आणि सचिन माळी पोलिसांना शरण". Loksatta. 2013-04-03. 2018-05-29 रोजी पाहिले.
- ^ "शीतल साठे यांना जामीन मंजूर". Loksatta. 2013-06-27. 2018-05-29 रोजी पाहिले.