"रूपा कुळकर्णी-बोधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) वर्गात जोडले खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{माहितीचौकट व्यक्ती |
|||
| चौकट_रुंदी = |
|||
| नाव = रुपा कुलकर्णी-बोधी |
|||
| चित्र = |
|||
| चित्र_आकारमान = |
|||
| चित्रशीर्षक = |
|||
| चित्रशीर्षक_पर्याय = |
|||
| जन्मनाव = रुपा कुलकर्णी |
|||
| जन्म_दिनांक = २७ एप्रिल १९४५ |
|||
| जन्म_स्थान = |
|||
| मृत्यू_दिनांक = |
|||
| मृत्यू_स्थान = |
|||
| मृत्यू_कारण = |
|||
| कलेवर_सापडलेले_स्थान = |
|||
| चिरविश्रांतिस्थान = |
|||
| चिरविश्रांतिस्थान_अक्षांश_रेखांश = |
|||
| निवासस्थान = नागपूर |
|||
| राष्ट्रीयत्व = भारतीय |
|||
| टोपणनावे = रुपा बोधी |
|||
| वांशिकत्व = |
|||
| नागरिकत्व = |
|||
| शिक्षण = एम.ए., पीएच.डी. |
|||
| प्रशिक्षणसंस्था = नागपूर विद्यापीठ |
|||
| पेशा = सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका, व विचारवंत |
|||
| कारकीर्द_काळ = |
|||
| मालक = |
|||
| प्रसिद्ध_कामे = महिला कामगारांच्या हक्कांविषयी लढा |
|||
| मूळ_गाव = |
|||
| पगार = |
|||
| निव्वळ_मालमत्ता = |
|||
| उंची = |
|||
| वजन = |
|||
| ख्याती = |
|||
| पदवी_हुद्दा = |
|||
| कार्यकाळ = |
|||
| पूर्ववर्ती = |
|||
| परवर्ती = |
|||
| राजकीय_पक्ष = |
|||
| विरोधक = |
|||
| संचालकमंडळ = |
|||
| धर्म = [[बौद्ध]] |
|||
| जोडीदार = |
|||
| अपत्ये = |
|||
| वडील = |
|||
| आई = |
|||
| नातेवाईक = |
|||
| पुरस्कार = |
|||
| स्वाक्षरी = |
|||
| स्वाक्षरीशीर्षक_पर्याय = |
|||
| संकेतस्थळ = |
|||
| तळटिपा = |
|||
| संकीर्ण = |
|||
}} |
|||
'''रुपा कुलकर्णी-बोधी''' (जन्म : २७ एप्रिल १९४५) ह्या एक मराठी सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका व निवृत्त प्राध्यापिका आहेत. त्यांनी घरकाम कामगारांच्या हक्कांसाठी लढतात. त्यांचा अनेक सामाजिक कार्य व आंदोलनात त्यांचा सहभाग राहिला आहे.<ref>https://www.bbc.com/marathi/india-43620153</ref> |
'''रुपा कुलकर्णी-बोधी''' (जन्म : २७ एप्रिल १९४५) ह्या एक मराठी सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका व निवृत्त प्राध्यापिका आहेत. त्यांनी घरकाम कामगारांच्या हक्कांसाठी लढतात. त्यांचा अनेक सामाजिक कार्य व आंदोलनात त्यांचा सहभाग राहिला आहे.<ref>https://www.bbc.com/marathi/india-43620153</ref> |
||
१३:०७, २८ फेब्रुवारी २०२० ची आवृत्ती
रुपा कुलकर्णी-बोधी | |
---|---|
जन्म |
रुपा कुलकर्णी २७ एप्रिल १९४५ |
निवासस्थान | नागपूर |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
टोपणनावे | रुपा बोधी |
शिक्षण | एम.ए., पीएच.डी. |
प्रशिक्षणसंस्था | नागपूर विद्यापीठ |
पेशा | सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका, व विचारवंत |
प्रसिद्ध कामे | महिला कामगारांच्या हक्कांविषयी लढा |
धर्म | बौद्ध |
रुपा कुलकर्णी-बोधी (जन्म : २७ एप्रिल १९४५) ह्या एक मराठी सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका व निवृत्त प्राध्यापिका आहेत. त्यांनी घरकाम कामगारांच्या हक्कांसाठी लढतात. त्यांचा अनेक सामाजिक कार्य व आंदोलनात त्यांचा सहभाग राहिला आहे.[१]
कारकीर्द
मध्यप्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात २७ एप्रिल १९४५ रोजी रुपा कुलकर्णी यांचा जन्म झाला. त्यांचे वडील कृष्णराव हे शिक्षक होते तर आई प्रमिला या आरोग्य विभागात कार्यरत होत्या. सहाव्या वर्षी कुटुंबासह रूपा या नागपुरात वास्तव्यास आल्या. संस्कृत भाषेत एम.ए. आणि पीएच.डी. या पदव्या प्राप्त केल्यानंतर त्यांनी तत्कालीन नागपूर विद्यापीठात संस्कृतच्या प्राध्यापिका म्हणून कार्य केले. २००५ मध्ये त्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या संस्कृत विभागाच्या विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झाल्या.[२]
धर्मांतर
कुलकर्णी यांचा बौद्ध धम्म व आंबेडकरी विचारांकडे कल होता. यातूनच त्यांनी १९९२ मध्ये वयाच्या ४७ वर्षी हिंदू धर्माचा त्याग करत बौद्ध धर्म स्वीकारला. धर्मांतरानंतर त्यांनी बौद्ध संकल्पनेशी संबंधित 'बोधी' हे आडनाव स्वीकारले. त्यांनी सांगितले की, "मी घरेलू कामगारांबरोबर काम करायला सुरुवात केली होती. ते अशा जातींतून येतात, ज्यांना खालची जात मानली जाते. त्यांची परिस्थिती अंत्यत बिकट असते. त्यामुळे मला माझी जात एक ओझं, एक कलंक वाटायला लागली होती म्हणून ती सोडणंच मला योग्य वाटलं." त्यांच्यामते वृत्तवाहिन्या, वृत्तपत्र आणि फिल्म इंडस्ट्रीच नाही तर टीव्हीवर येणाऱ्या मालिकांमध्येही जातीच्या आधारावर वेगळे राहण्याच्या संस्कृतीला प्रोत्साहन दिले जाते.[३] रुपा कुलकर्णी या बुद्धिवादी विचारवंत म्हणून ओळखल्या जातात. बीड येथे झालेल्या १२व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे.[४] जेव्हा हिंदूत्ववादी संघटनांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'रिडल्स इन हिंदुइझम' पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी झाली. त्यावेळी रुपा कुळकर्णी यांनी पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्यांचा वैचारिक परामर्ष घेतला होता. अखेर सरकारने पुस्तक प्रकाशित केले.[५]
कामगारांसाठी कार्य
असंघटीत कामगारांमध्ये घरकाम करणाऱ्या मोलकरणी हा खूप मोठा वर्ग आहे ज्यांना त्यांच्या हक्कांविषयी माहिती नव्हती. १९८० मध्ये रुपा कुलकर्णी यांनी या मोलकरणींना संघटित करून त्यांना त्यांचे अधिकार प्राप्त करून देण्यासाठी लढा सुरु केला. २८ वर्षांच्या लढ्यानंतर घरकाम कामगारांसाठी २००८ मध्ये महाराष्ट्रात 'घरेलू कामगार कायदा' लागू झाला. असा कायदा तयार करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी एका बोर्डाची स्थापना करण्यात आली. या माध्यमातून राज्यात १ लाख ४८ हजार घरकाम करणाऱ्या महिलांची नोंदणी करण्यात आली. २०१४ मध्ये महाराष्ट्र सरकारने मोलकरणींसाठी अस्तित्वात असलेला बोर्ड बरखास्त केला. हा बोर्ड पुन्हा अस्तित्वात यावा याकरता कुलकर्णी यांचा संघर्ष सुरू आहे.[६] सध्या त्यांनी अडीच कोटी कामगारांना संघटित केले असून, त्यांना ४५ कोटी असंघटितांना एका छताखाली आणायचे आहे.[७]
पुस्तके
रुपा कुलकर्णी यांची विविध विषयांवरील १० पेक्षा अधिक पुस्तके प्रकशित झाली आहेत.[८]
पुरस्कार
- मिलिंद आर्ट कॉलेजतर्फे "मिलिंद समता पुरस्कार" रुपा कुलकर्णी-बोधी यांना १७ जानेवारी २०१६ रोजी येथे प्रदान केला गेला.[११]
- २०१५ मध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विभागीय केंद्राच्यावतीने त्यांना "यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार" ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. १५ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.<ref>https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/rupa-kulkarni-appeals-intellectuals/articleshow/49943251.cms<ref>
संदर्भ
- ^ https://www.bbc.com/marathi/india-43620153
- ^ https://m.etvbharat.com/marathi/maharashtra/state/nagpur/rupa-kulkarni-from-nagpur-is-fighting-for-the-rights-of-unorganized-workers/mh20200103203118988
- ^ https://www.bbc.com/marathi/india-43620153
- ^ https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/articleshow/50537466.cms
- ^ http://prahaar.in/strike-3/
- ^ https://m.etvbharat.com/marathi/maharashtra/state/nagpur/rupa-kulkarni-from-nagpur-is-fighting-for-the-rights-of-unorganized-workers/mh20200103203118988
- ^ https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/rupa-kulkarni-appeals-intellectuals/articleshow/49943251.cms
- ^ https://m.etvbharat.com/marathi/maharashtra/state/nagpur/rupa-kulkarni-from-nagpur-is-fighting-for-the-rights-of-unorganized-workers/mh20200103203118988
- ^ https://www.bookganga.com/eBooks/Books?AID=5283089986281779409
- ^ https://www.bookganga.com/eBooks/Books?AID=5283089986281779409
- ^ https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/articleshow/50537466.cms