"कमर जलालाबादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ ७: | ओळ ७: | ||
याच कार्यकालात क़मर जलालाबादी 'स्टार शाहकार' नावाच्या पत्रिकेचे संपादक झाले. या पत्रिकेचे खूप नाव झाले. त्याकाळी प्रतिष्ठित सज्जनांच्या पंक्तीत पाय रोवायच्या प्रयत्नात असलेले कवी [[साहिर लुधियानवी]], आणि क़तील शिफ़ाई यांनीही क़मर जलालाबादी यांना मोठेपणा दिला. त्यांनी क़मर यांना पुरेपूर मदत केली. [[साहिर लुधियानवी]] यांनीतर आपल्या काॅलेजातल्या कविसंमेलनासाठी क़मर जलालाबादी यांना लाहोरहून लुधियानाला बोलावून घेतले होते. |
याच कार्यकालात क़मर जलालाबादी 'स्टार शाहकार' नावाच्या पत्रिकेचे संपादक झाले. या पत्रिकेचे खूप नाव झाले. त्याकाळी प्रतिष्ठित सज्जनांच्या पंक्तीत पाय रोवायच्या प्रयत्नात असलेले कवी [[साहिर लुधियानवी]], आणि क़तील शिफ़ाई यांनीही क़मर जलालाबादी यांना मोठेपणा दिला. त्यांनी क़मर यांना पुरेपूर मदत केली. [[साहिर लुधियानवी]] यांनीतर आपल्या काॅलेजातल्या कविसंमेलनासाठी क़मर जलालाबादी यांना लाहोरहून लुधियानाला बोलावून घेतले होते. |
||
याच दिवसांमध्ये 'चचा छक्कन' आणि 'अनारकली'चे प्रसिद्ध लेखक सैय्यद इम्तियाज़ अली 'ताज' यांच्या मार्फत क़मर हे लाहोरचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते दलसुख पंचोलींपर्यंत पोचले आणि त्यांनी पंचोली पिक्चर्सच्या चित्रपटात गीतकाराचे काम मिळवले. पंचोली पिक्चर्सच्या सन १९४२मध्ये निघालेल्या |
याच दिवसांमध्ये 'चचा छक्कन' आणि 'अनारकली'चे प्रसिद्ध लेखक सैय्यद इम्तियाज़ अली 'ताज' यांच्या मार्फत क़मर हे लाहोरचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते दलसुख पंचोलींपर्यंत पोचले आणि त्यांनी पंचोली पिक्चर्सच्या चित्रपटात गीतकाराचे काम मिळवले. पंचोली पिक्चर्सच्या सन १९४२मध्ये निघालेल्या ज़मींदार या चित्रपटात क़मर जलालाबादी यांनी लिहिलेले पहिले चित्रपट गीत 'दुनिया में गरीबों को आराम नहीं मिलता, रोते हैं तो हँसने का पैग़ाम नहीं मिलता' जबरदस्त हिट झाले. या गीताला [[गुलाम हैदर|ग़ुलाम हैदर]] यांनी संगीतबद्ध केले होते. [[शमशाद बेगम]] गायिका होत्या. या गीताच्या शेवटच्या दोन ओळी - जो कोई भी आता है ठोकर ही लगाता है, मर के भी गरीबों को आराम नहीं मिलता - या तत्कालीन च यांनी सुचवल्या होत्या, म्हणून चित्रपटाच्या श्रेयनामावलीत गीतकार म्हणून त्यांचेही नाव आहे. |
||
१९४४ साली त्यांनी [[पुणे|पुण्यातील]] प्रभात चित्रपट संस्थेशी संधान बांधले आणि चाँद चित्रपटाच्या गीतलेखनाबरोबर त्याचे संवादलेखनही केले. प्रभातच्या चार चित्रपटांचे गीतलेखन केल्यानंत क़मर जलालाबादी [[मुंबई]]ला आले. आणि मुंबईचेच होऊन राहिले. पुढची जवळजवळ ५० वर्षे ते चित्रपटांचे गीतलेखन करत होते. |
|||
==क़मर जलालाबादी यांनी लिहिलेली काही गीते== |
|||
* दुनिया में गरीबों को आराम नहीं मिलता, रोते हैं तो हँसने का पैग़ाम नहीं मिलता' या गीताचे सहकवी शायर बहज़ाद लखनवी होते, तर ते गीत [[गुलाम हैदर|ग़ुलाम हैदर]] यांनी संगीतबद्ध केले होते. [[शमशाद बेगम]] गायिका होत्या. या गीतासाठी क़मर जलालाबादी यांना दलसुख पंचोलींकडून २५ रुपये एवढी मोठ्ठी रक्कम बक्षीस म्हणून मिळाली होती. |
|||
* मेरे हाल पे बेबसी रो रही है (सहगीतकार - शायर बहज़ाद लखनवी; चित्रपट - ज़मींदार (१९४२); संगीत - [[गुलाम हैदर|ग़ुलाम हैदर]], गायिका [[शमशाद बेगम]]) |
|||
* 'सहारा' (१९४३) चित्रपटाची गीते, |
|||
* 'पगली' (१९४३) चित्रपटाची गीते, उदा० उम्मीद तडपती है, रोती है तमन्नाएँ, दुनिया का तकाज़ा है, दुनिया से चले जाएं (संगीतकार - गोबिंदराम, गायिका - [[शमशाद बेगम]]) |
|||
* 'चाँद' (प्रभातचा चित्रपट, १९४४). या चित्रपटातील ११ गीते. (संगीतकार [[हुस्नलालभगतराम]]) उदा० दो दिलों को ये दुनिया मिलने ही नहीं देती, आशाओं की कलियों को खिलने ही नहीं देती (गायिका मंजू) |
|||
* 'रामशास्त्री' (प्रभातचा चित्रपट, १९४४). या चित्रपटातील गीते. |
|||
* 'लाखारानी' (प्रभातचा चित्रपट, १९४५). या चित्रपटातील गीते. |
|||
* 'गोकुल' (प्रभातचा चित्रपट, १९४६). या चित्रपटातील गीते. |
|||
* निश्चल (१९९२) चित्रपटाची गीते. संगीतकार - [[ओ.पी. नय्यर]]. चित्रपटात [[विनोद खन्ना]], [[सलमान खान]] आणि [[करिष्मा कपूर]] यांनी कामे केली होती. |
|||
(अपूर्ण) |
|||
{{DEFAULTSORT:कमर जलालाबादी}} |
{{DEFAULTSORT:कमर जलालाबादी}} |
२१:५१, २१ ऑक्टोबर २०१९ ची आवृत्ती
कमर जलालाबादी (जन्म : जलालाबाद-पंजाब, २९ फेब्रुवारी १९१६; मृत्यू : ९ जानेवारी २००३) हे हिंदी चित्रपटांसाठी गीते लिहिणारे हिंदी-उर्दू गीतकार होते. अमृतसरपासून पासून १७६ किलोमीटर दूर असलेल्या जलालाबाद नावाच्या छोट्या गावात त्यांचा जन्म झाला. त्यांचे जन्मनाव ओम प्रकाश आणि वडिलांचे नाव लाला हरजस राय होते. हे भंडारी खत्री पंजाबी होते. इंग्रजी राजवटीत त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता. ते जलालाबाद काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते.
ओम प्रकाश याला अभ्यासात फारसा रस नव्हता. तरी त्याने कसेबसे करून उर्दू शाळेत दहा इयत्ता पास केल्या. वयाच्या सातव्या वर्षी त्यांना शायरीमध्ये रस निर्माण झाला, आणि काही वर्षांत त्यांचे लेखनही सुरू झाले. गावातीलच एका 'अमर' नावाचा एका माणसाला ओम प्रकाशच्या ह्या लिखाणाचे कौतुक वाटे. त्यांनी या मुलाला प्रोत्साहन देऊन पुढचा मार्ग दाखवला. ओम प्रकाशची शायरी वाचून 'अमर' ह्यांनी तो मोठा कवी होईल असे भाकीत केले आणि त्याला स्वत:साठी चांगले टोपणनाव निवडायला सांगितले. ओम प्रकाशने 'अमर'शी मिळते जुळते क़मर हे नाव घेऊन त्याला जलालाबादी हे गावाचे नाव जोडले, आणि ओम प्रकाश भंडारीचा 'क़मर जलालाबादी' झाला. नवीन नाव घेतले आणि त्यांनी उठताबसता, बिछान्यावर पडल्यापडल्या शायरी लिहायला सुरुवात केली. उर्दूमध्ये क़मर म्हणजे चंद्र. त्यांचा पहिला कवितासंग्रह 'रश्क़े-क़मर' या नावाने प्रकाशित झाला. (त्यानंतर अनेक वर्षांनी एका कवीने 'रश्क़े-क़मर' हे नाव घेऊन कविता लिहिल्या!) (उर्दूत रश्क़ म्हणजे ईर्षा, हेवा).
सन १९३५मध्ये क़मर जलालाबादी यांनी रोज़नामा प्रताप नावाच्या उर्दू वर्तमानपत्रात नोकरी सुरू केली. तेथून निघाल्यावर 'मिलाप' नावाच्या वर्तमानपत्रात लागले. काही वर्षातच ते 'निराला' नावाच्या मासिकाचे संपादक झाले. पुढल्या काळात त्यांनी हिंदी चित्रपटात कथा-संवाद-गीते लिहायला सुरुवात केली. पण इतके असले तरी त्यांना देवनागरीचा 'द'ही येत नव्हता.
याच कार्यकालात क़मर जलालाबादी 'स्टार शाहकार' नावाच्या पत्रिकेचे संपादक झाले. या पत्रिकेचे खूप नाव झाले. त्याकाळी प्रतिष्ठित सज्जनांच्या पंक्तीत पाय रोवायच्या प्रयत्नात असलेले कवी साहिर लुधियानवी, आणि क़तील शिफ़ाई यांनीही क़मर जलालाबादी यांना मोठेपणा दिला. त्यांनी क़मर यांना पुरेपूर मदत केली. साहिर लुधियानवी यांनीतर आपल्या काॅलेजातल्या कविसंमेलनासाठी क़मर जलालाबादी यांना लाहोरहून लुधियानाला बोलावून घेतले होते.
याच दिवसांमध्ये 'चचा छक्कन' आणि 'अनारकली'चे प्रसिद्ध लेखक सैय्यद इम्तियाज़ अली 'ताज' यांच्या मार्फत क़मर हे लाहोरचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते दलसुख पंचोलींपर्यंत पोचले आणि त्यांनी पंचोली पिक्चर्सच्या चित्रपटात गीतकाराचे काम मिळवले. पंचोली पिक्चर्सच्या सन १९४२मध्ये निघालेल्या ज़मींदार या चित्रपटात क़मर जलालाबादी यांनी लिहिलेले पहिले चित्रपट गीत 'दुनिया में गरीबों को आराम नहीं मिलता, रोते हैं तो हँसने का पैग़ाम नहीं मिलता' जबरदस्त हिट झाले. या गीताला ग़ुलाम हैदर यांनी संगीतबद्ध केले होते. शमशाद बेगम गायिका होत्या. या गीताच्या शेवटच्या दोन ओळी - जो कोई भी आता है ठोकर ही लगाता है, मर के भी गरीबों को आराम नहीं मिलता - या तत्कालीन च यांनी सुचवल्या होत्या, म्हणून चित्रपटाच्या श्रेयनामावलीत गीतकार म्हणून त्यांचेही नाव आहे.
१९४४ साली त्यांनी पुण्यातील प्रभात चित्रपट संस्थेशी संधान बांधले आणि चाँद चित्रपटाच्या गीतलेखनाबरोबर त्याचे संवादलेखनही केले. प्रभातच्या चार चित्रपटांचे गीतलेखन केल्यानंत क़मर जलालाबादी मुंबईला आले. आणि मुंबईचेच होऊन राहिले. पुढची जवळजवळ ५० वर्षे ते चित्रपटांचे गीतलेखन करत होते.
क़मर जलालाबादी यांनी लिहिलेली काही गीते
- दुनिया में गरीबों को आराम नहीं मिलता, रोते हैं तो हँसने का पैग़ाम नहीं मिलता' या गीताचे सहकवी शायर बहज़ाद लखनवी होते, तर ते गीत ग़ुलाम हैदर यांनी संगीतबद्ध केले होते. शमशाद बेगम गायिका होत्या. या गीतासाठी क़मर जलालाबादी यांना दलसुख पंचोलींकडून २५ रुपये एवढी मोठ्ठी रक्कम बक्षीस म्हणून मिळाली होती.
- मेरे हाल पे बेबसी रो रही है (सहगीतकार - शायर बहज़ाद लखनवी; चित्रपट - ज़मींदार (१९४२); संगीत - ग़ुलाम हैदर, गायिका शमशाद बेगम)
- 'सहारा' (१९४३) चित्रपटाची गीते,
- 'पगली' (१९४३) चित्रपटाची गीते, उदा० उम्मीद तडपती है, रोती है तमन्नाएँ, दुनिया का तकाज़ा है, दुनिया से चले जाएं (संगीतकार - गोबिंदराम, गायिका - शमशाद बेगम)
- 'चाँद' (प्रभातचा चित्रपट, १९४४). या चित्रपटातील ११ गीते. (संगीतकार हुस्नलालभगतराम) उदा० दो दिलों को ये दुनिया मिलने ही नहीं देती, आशाओं की कलियों को खिलने ही नहीं देती (गायिका मंजू)
- 'रामशास्त्री' (प्रभातचा चित्रपट, १९४४). या चित्रपटातील गीते.
- 'लाखारानी' (प्रभातचा चित्रपट, १९४५). या चित्रपटातील गीते.
- 'गोकुल' (प्रभातचा चित्रपट, १९४६). या चित्रपटातील गीते.
- निश्चल (१९९२) चित्रपटाची गीते. संगीतकार - ओ.पी. नय्यर. चित्रपटात विनोद खन्ना, सलमान खान आणि करिष्मा कपूर यांनी कामे केली होती.
(अपूर्ण)