"धूळपाटी/गोटा, टक्कल आणि चित्रपट" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: हिंदू पुरोहित आणि बौद्ध भिक्षू यांच्या केसांचा गोटा असतो. बहुते... |
(काही फरक नाही)
|
२२:०१, १४ ऑक्टोबर २०१९ ची आवृत्ती
हिंदू पुरोहित आणि बौद्ध भिक्षू यांच्या केसांचा गोटा असतो. बहुतेक प्रकारचे हिंदू संन्यासी गोेटेवाले असतात. शेंडी ठेवणारे दक्षिणी आणि उत्तर हिंदुस्तानी ब्राह्मण यांची शेंडी वगळल्यास केसांचा गोटाच असतो. मौंजीबंधनाच्या वेळी मुंज्या मुलाच्या केसांचा गोटा करायचा प्रघात आहे. हिंदुधर्मीय बाळाला जन्मत: आलेले जावळ (केस), 'जावळ काढणे' नावाचा धार्मिक विधी करून काढतात आणि त्या केसाचा गोटा करतात.
श्यामची आई चित्रपटात श्यामचा गोटा दाखवला आहे. अभिनेत्री शबाना आझमीने तिच्या वाॅटर नावाच्या चित्रपटासाठी केसांचा गोटा केला होता. ती बरेच दिवस हा गोटा मिरवत फिरत होती.
चित्रपटांतील टकलू माणसाची भूमिका करणारा पहिला प्रसिद्ध नट म्हणजे डेव्हिड. त्याचे टक्कल नैसर्गिक होते. बूट पाॅलिश चित्रपटातील जेलमध्ये अनेक कैदी टक्कलवाले दाखवले आहेत. त्यांच्यापैकी एकाच्या टकलावर तबला वाजवत डेव्हिडने 'लपक झपक तू आ रे बदरवा, सर की खेती सूख रही है' हे बहारदार गाणे म्हटले आहे. दरबारी कानडा रागातले हे गाणे मन्ना डेने गायले आहे. संगीत शंकर जयकिशन यांचे होते.
अंकुर चित्रपटात
(अपूर्ण)