Jump to content

"रवि किशन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
प्रस्तावना
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १०: ओळ १०:
==राजकीय कारकीर्द==
==राजकीय कारकीर्द==
सन २०१४मध्ये रविकिशनने काँग्रेसच्या तिकिटावर जौनपूर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली, पण तीत त्याला भारतीय जनता पक्षाच्या के.पी. सिंह यांनी मतांच्या फार मोठ्या फरकाने हरवले. त्यानंतर रविकिशनने भारतीय जनता पक्षाच्या (भाजपच्या) राष्ट्रीय अध्यक्षांच्या, अमित शहांच्या, उपस्थितीत १९ फेब्रुवारी २०१७ रोजी 'भाजप'त प्रवेश केला. लगेचच्या २०१९ सालच्या सार्वत्रिक निवडणुकीत गोरखपूर मतदार संघातून निवडून येऊन रविकिशन १७व्या लोकसभेचे खासदार झाले.

==रविकिशनचे हिंदी चित्रपट==
* अमृतसागर
* बाटला हाऊस
* मुक्काबाज

==पुरस्कार==
==पुरस्कार==

१३:५३, १८ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती

रविकशन (१७ जुलै, १९७१:सांताक्रुझ, मुंबई, महाराष्ट्र - ) हा भोजपुरी आणि हिंदी चित्रपटांत काम करणारा अभिनेता आहे. वयाच्या १०व्या वर्षी घरच्या दूध व्यवसायात मतभेद झाल्याने त्याचे कुटुंब मुंबई सोडून उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे आले.

अभिनयाची कारकीर्द

रविकिशन लहानपणी रामलीेलेमध्ये छोटीछोटी कामे करीत असे. मोठा झाल्यावर त्याने भोजपुरी व हिंदी चित्रपटांत कामे करण्यास सुरुवात केली. रिॲलिटी शो बिग बाॅसच्या ६व्या सीझनमध्ये त्याने भाग घेतला होता.

रविकिशनचा आणि अजितसिंहचा अभिनय असलेला भोजपुरी चित्रपट-जला देब दुनिया तुहरा प्यार में-हा एका अमेरिकन कंपनीने बनवला होता. कान्स चित्रपट महोत्सवात तो प्रदर्शित झाला होता.

रविकिशन याने काही भोजपुरी दूरचित्रवाणी मालिका प्रायोजित केल्या आहेत. त्यांपैकी 'बाथरूम सिंगर एक से एक बढकर' ही विशेष गाजली. सलमान खानचा अभिनय असलेल्या व २००३ साली आलेल्या 'तेरे नाम' या हिंदी बोलपटामधील भूमिकेमुळे रविकिशन याला बरीच प्रसिद्धी मिळाली.

राजकीय कारकीर्द

सन २०१४मध्ये रविकिशनने काँग्रेसच्या तिकिटावर जौनपूर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली, पण तीत त्याला भारतीय जनता पक्षाच्या के.पी. सिंह यांनी मतांच्या फार मोठ्या फरकाने हरवले. त्यानंतर रविकिशनने भारतीय जनता पक्षाच्या (भाजपच्या) राष्ट्रीय अध्यक्षांच्या, अमित शहांच्या, उपस्थितीत १९ फेब्रुवारी २०१७ रोजी 'भाजप'त प्रवेश केला. लगेचच्या २०१९ सालच्या सार्वत्रिक निवडणुकीत गोरखपूर मतदार संघातून निवडून येऊन रविकिशन १७व्या लोकसभेचे खासदार झाले.

रविकिशनचे हिंदी चित्रपट

  • अमृतसागर
  • बाटला हाऊस
  • मुक्काबाज

पुरस्कार